वन व पर्यावरण
…या गावात जागतिक पर्यावरण दिन संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठाणच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रक्तदान शिबिर व वृक्षारोपणचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जून रोजी जगभर साजरा केला जातो.हा दिवस पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन याबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी आणि पर्यावरणाच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रोत्साहन देतो.तो कुंभारी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जून रोजी जगभर साजरा केला जातो.हा दिवस पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन याबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी आणि पर्यावरणाच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रोत्साहन देतो.संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम या दिनाची सुरुवात १९७३ मध्ये केली होती.त्याचा जगभर प्रसार झाला आहे.हा दिवस कोपरगाव तालुक्यातील कुंभा री येथे श्री राघवे श्वर प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत घुले,सरपंच देवयानी प्रशांत घुले,उपसरपंच कविता ललित निळकंठ,वनरक्षक श्रद्धा पडवळ,ग्रामसेवक कहार तसेच श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रशांत घुले,उपाध्यक्ष वाल्मिक निळकंठ,प्रतिष्ठाणचे सचिव श्रीकांत पैठणे,ग्रामपंचायत सदस्य ललित निळकंठ,दिलीप ठाणगे,रामराव चंदनशिव,सुभाष बढे,श्री साईनाथ ब्लड बँक चे डॉक्टर सन्माननीय डाॕ. भारती,टेक्निशियन चंद्रकांत लुटे,रवींद्र शिंदे,वैशाली डांगे,सिस्टर चव्हाण,सचिन साप्ते,शशिकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाल्मीक निळकंठ यांनी केले तर वनरक्षक श्रद्धा पडवळ यांनी वनाचे महत्व अधोरेखित केले आहे.सदर कार्यक्रमाचे शेवटी श्री साई राघवेशवर प्रतिष्ठाणचे सचिव श्रीकांत पैठणे यांनी आभार व्यक्त मानले आहे.