जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
वन व पर्यावरण

…या ग्रामपंचायत हद्दीत वृक्ष लागवड उत्साहात संपन्न

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत हद्दीत नुकतीच मोठ्या उत्साहात माजी उपसरपंच आण्णासाहेब भोसले व युवा कार्यकर्ते कानिफनाथ थोरात यांचे शुभ हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

जवळके हद्दीत वृक्षलागवड  करताना कानिफनाथ थोरात दिसत आहे.

   

“वृक्षारोपण तुम्हाला सहज श्वास देऊ शकते.जशी जंगले ही आपल्या भूमीची फुफ्फुसे आहेत.झाडे हानिकारक वायू शोषून घेतात आणि ऑक्सिजन उत्सर्जित करतात.अधिक वृक्ष लागवडीमुळे ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होऊ शकते म्हणून वृक्ष लागवड महत्वाची आहे”-आण्णासाहेब भोसले,माजी उपसरपंच,जवळके ग्रामपंचायत.

  वृक्षारोपण म्हणजे एखाद्याला जीवनदान देण्यासारखे आहे.आपण लावलेले प्रत्येक झाड समाजाचे तारणहार बनेल.पावसाळा चालू आहे, झाडे लावण्यासाठी आणि आपली परिसंस्था टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.वृक्षारोपण तुम्हाला सहज श्वास देऊ शकते.जशी जंगले ही आपल्या भूमीची फुफ्फुसे आहेत.झाडे हानिकारक वायू शोषून घेतात आणि ऑक्सिजन उत्सर्जित करतात.अधिक वृक्ष लागवडीमुळे ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होऊ शकते.म्हणूनच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे ग्रामपंचायत,कृषी,वन,लघुपाटबंधारे,जलसंपदा आदी विभागांकडून केली जातात.ग्रामपंचायत व कृषी विभागाच्या माध्यमातून प्रामुख्याने वैयक्तिक लाभाची कामे घेतली जातात.कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत हद्दीत नुकतीच मोठ्या उत्साहात वृक्ष लागवड करण्यात आली आहे.कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ नेते एस.के.थोरात हे उपस्थित होते.

 

जवळके हद्दीत वृक्षलागवड करताना अरुण थोरात दिसत आहे.

  सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,दत्तात्रय थोरात,जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका थोरात,माजी उपसरपंच आण्णासाहेब भोसले,प्रल्हाद जवरे,विजय थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,इंदुबाई नवनाथ शिंदे,अरुण थोरात,विजय शिंदे,गणेश थोरात,कानिफनाथ मारुती थोरात,ग्रामसेवक सतीश दिघे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close