वन व पर्यावरण
…या शाळेत वृक्ष लागवड उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव न.पा.शिक्षण मंडळ शाळा क्रमांक ५ वतीने कोपरगांव बेट भागात वन महोत्सव निमित्ताने वृक्षारोपण मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
“वीस वर्षांपूर्वी झाड लावण्याची सर्वोत्तम वेळ होती.दुसरी सर्वोत्तम वेळ आता आहे”ही चिनी म्हण बरेच काही स्पष्ट करते.चांगल्या गोष्टी करण्यासाठी सर्वोत्तम वेळ किंवा विशिष्ट मर्यादा नसते.वृक्षारोपण म्हणजे एखाद्याला जीवनदान देण्यासारखे आहे.आपण लावलेले प्रत्येक झाड समाजाचे तारणहार बनेल.पावसाळा चालू आहे,झाडे लावण्यासाठी आणि आपली परिसंस्था टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.वृक्षारोपण तुम्हाला सहज श्वास देऊ शकते.जशी जंगले ही आपल्या भूमीची फुफ्फुसे आहेत.झाडे हानिकारक वायू शोषून घेतात आणि ऑक्सिजन उत्सर्जित करतात.ही जीव सृष्टीची गरज ओळखून कोपरगांव बेट भागात नगरपालिका शाळा नं.५,कोपरगावच्या परिसरात नगरपालिका व सामाजिक वनीकरण कोपरगावच्या सहभागातून वृक्षारोपनाचा कार्यक्रम मुख्याधिकारी सुहास जगताप यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी निलेश रोडे,महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके,दैत्यगुरु शुक्राचार्य देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,पूनम गगे,वन परिमंडळ अधिकारी सुनीता यादव,वनरक्षक मुस्ताक सय्यद व निर्मला शिंदे,लिलावती जमधडे,विनोद नाईकवाडे,बाबासाहेब आव्हाड, रामभाऊ कदम,वैभव जमधडे,विशाल आव्हाड,वर्षा वाघमारे,भाऊसाहेब शिंदे,अर्चना वाघमारे,अशोक मतकर,प्रकाश साळुंके,सुनिल साळुंके,गट समन्वयक,प्रशांत शिंदे,अमित पराई,ग्रामस्थ,पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी शाळेच्या वृक्ष लागवड व संवर्धनाचे कौतुक केले.जागतिक तापमान वाढीबाबत चिंता व्यक्त करून झाडांची घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी लागवड करून संवर्धन करण्याचे आवाहन केले.तर वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे यांनी अकारण वृक्षावर कुऱ्हाड चालवू नये.असे आज्ञापत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी काढले होते.याबाबत आठवण करून दिली.
यावेळी सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते लिंब,चिंच,आंबा,वड,करंज,भेंडी आदी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी श्रीराम थोरात,मनोजकुमार पापडीवाल -उप मुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे नगरपालिका अधिकारी यांचे सहकार्य लाभले.
सदर प्रसंगी सूत्रसंचलन शिक्षक सुनिल रहाणे यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वी करण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक विलास माळी,सुनील रहाणे,अमोल कडू व नसरीन पठाण यांनी परिश्रम घेतले आहे.