जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
वन व पर्यावरण

…या शहरात बिबट्याचा धुमाकूळ,भीतीचे वातावरण

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


कोपरगाव शहरात काल पहाटे पासून बिबट्याने धुमाकूळ धातला असून त्यात जाकिर कोथंबीरे यास किरकोळ जखमी केले असून त्यामुळे नारीकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वन विभाग व कोपरगाव शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आज दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास सदर बिबट्यास जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस अधिकारी प्रदीप देशमुख यांनी दिली आहे.

“कोपरगाव शहर पोलीस व कोपरगाव वन विभाग यांनी संयुक्त कारवाई करून दोन दिवस दहशत माजवणाऱ्या बिबट्यास आज दुपारी ४.३० वाजता त्यास जेरबंद केले असून त्यास सुरक्षित स्थळी हलवले आहे.दरम्यान यात कोणी जखमी झाले नासल्याचे दावा केला आहे”-प्रतिभा सोंनवणे,वन अधिकारी,कोपरगाव वन विभाग.

दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात.मात्र कोपरगाव शहरात बिबट्या आल्याची घटना दुर्मिळ समजली जात असून ‘तो’ बिबट्या मुर्शतपुर व जेऊर पाटोदा परिसरात जुलै महिन्यात आला होता.त्यामुळे मोठी खळबळ उडवून दिली होती.त्याने अनेक शेळ्या आणि अन्य प्राण्यांचा फडशा पाडला होता.त्यास पकडण्यासाठी मनसेने आंदोलन केले होते.आता काल दि.१६ सप्टेंबर पासून पुन्हा एकदा बिबट्याच्या मादीने कोपरगाव शहरात प्रवेश केला असून नागरिकांना जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आली आहे.

कोपरगाव वन विभाग आणि शहर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून बिबट्यास जेरबंद केले आहे तो क्षण.

दरम्यान त्यास पडण्याची वन विभाग आणि पोलीस विभागाने आपला जीव धोक्यात घालून त्यास पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.मात्र त्यास यश आले नाही.आज मात्र दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास त्यास खंदक नाला डॉ.उंबरकर हॉस्पिटल परिसरात तो जरबंद केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

   दरम्यान त्याच्या हल्ल्यात एक नागरिक जाकिर कोथंबीरे किरकोळ जखमी झाला आहे.केवळ दैव बलवत्तर म्हणून तो वाचला आहे.सदर बिबट्या डुकरे आणि कुत्री याना आपली शिकार बनवत असला तरी तो केंव्हाही नरबळी घेऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यासाठी या बिबट्याचा वन विभागाने कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान या संबंधी आमच्या प्रतिनिधीने वन विभागाच्या अधीकारी प्रतिभा सोनवणे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनीं व कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी कोपरगाव वन विभाग व शहर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून त्यास जेरबंद केले असून त्यास सुरक्षित स्थळी हलवले असल्याची माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close