लोकसभा कामकाज

दूध उत्पादकांना दर वाढून द्या,केंद्राकडे -…या खासदारांची मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

    शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी काल लोकसभेत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणींवर लक्ष केंद्रीत केले असून दुधाच्या किंमतीत सतत घसरण आणि उत्पादन खर्चात वाढ झाल्याने दूध व्यवसाय तोट्याचा ठरत असल्याने केंद्राने दुधाला दूध दरात वाढ करण्याची गरज प्रतिपादन करून भाववाढ करण्याची मागणी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग उर्फ लल्लन सिंग यांच्याकडे केली आहे.या बद्दल राज्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

“गोहत्या बंदी हा राज्य सरकारांच्या अंतर्गत विषय असल्याने यामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करु शकत नाही.दूध किंमत नियंत्रणाबाबत मंत्र्यांनी सांगितले की,”केंद्र सरकार दुधाच्या किंमती निश्चित करत नसल्यामुळे सहकारी व खाजगी दूध संस्था बाजारभाव व उत्पादन खर्चानुसार दर निश्चित करतात.मात्र शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय फायदेशीर राहावा यासाठी केंद्राने राबवलेल्या प्रमुख योजनांचा पाठिंबा दिला जात आहे”-राजीव रंजन सिंह,मंत्री,केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री.

   दूध व्यवसाय सध्या अनेक अडचणींमध्ये आहे,ज्यात पशुखाद्याचे वाढलेले दर,दुधाला मिळणारा कमी भाव,चाराटंचाई,पाणीटंचाई आणि सरकारी धोरणांचा अभाव यांचा समावेश आहे,ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून,अनेकजण हा व्यवसाय सोडून देण्याच्या विचारात आहेत.पशुखाद्य महागल्याने खर्च वाढला आहे,पण दुधाचे दर वाढत नसल्याने तोटा होत आहे,तसेच बाजारात खासगी कंपन्यांची स्पर्धा आणि भेसळीची समस्या देखील या व्यवसायाला हानिकारक ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर काळ हिवाळी अधिवेशनात शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी या विषयावर केंद्र सरकारला संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी घेरले होते.दोन्ही सभागृहांचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू झाले.

   दरम्यान संसदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा होती.सत्ताधाऱ्यांनी एसआयआरवर चर्चा होणार असल्याचं जाहीर केल्यावर दरम्यान यावेळी शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी सभागृहात अतारांकित नसलेल्या प्रश्न क्रमांक ३७६ मध्ये केंद्रीय मत्स्यव्यवसाय,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग उर्फ लल्लन सिंग यांच्याकडे चार मुद्द्यांवर तपशिलवार अहवालाची मागणी केली होती.त्यात खा.वाकचौरे यांनी दुधाच्या किंमतीत सतत घसरण आणि उत्पादन खर्चात वाढ झाल्याने दूध व्यवसाय तोट्याचा ठरत आहे का ? एक लिटर दुधाचा खर्च २७  रुपये असताना शेतकऱ्यांना फक्त १८ ते २२ रुपये मिळतात का ? गायी ६-७ वर्षांतच दूध देणे बंद करतात का ? तसेच गोहत्या बंदीमुळे खाटी जनावरे विकता येत नाही परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढला आहे.ऊस,कापूसासारखा दूध उत्पादकांनाही हमी भाव मिळायाला हवा त्यासाठी केंद्र सरकार काय करत आहे ? असा जाबसाल केला होता.

   दरम्यान त्यावेळी मंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले की,”गेल्या पाच वर्षांत दुधाच्या सरासरी किमतीत कोणतीही घसरण झालेली नाही,उलट त्या सतत वाढत आहेत.द्रव दूध जी.एस.टी.व उत्पादन शुल्कापासून पूर्णपणे मुक्त आहे.मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सन- २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत गाईच्या दुधाची सरासरी खरेदी किंमत २९.४ रुपयांवरून ३६.७ रुपये प्रति लिटर आणि म्हशीच्या दुधाची किंमत ३९.८ रुपयांवरून ४९.२ रुपये प्रति लिटर वाढ झाली असल्याचा दावा केला आहे.दूध उत्पादन ४-५ महिन्यांनंतर कमी होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून भारतातील गाय-म्हशी सरासरी १०-१२ वर्षे दूध देतात.

   दरम्यान गोहत्या बंदी हा राज्य सरकारांच्या अंतर्गत विषय असल्याने यामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करु शकत नाही.दूध किंमत नियंत्रणाबाबत मंत्र्यांनी सांगितले की,”केंद्र सरकार दुधाच्या किंमती निश्चित करत नसल्यामुळे सहकारी व खाजगी दूध संस्था बाजारभाव व उत्पादन खर्चानुसार दर निश्चित करतात.मात्र शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय फायदेशीर राहावा यासाठी केंद्राने राबवलेल्या प्रमुख योजनांचा पाठिंबा दिला जात आहे.यात राष्ट्रीय गोकुळ मिशन,राष्ट्रीय दुग्धविकास कार्यक्रम,दुग्ध सहकारी संस्थांना पाठबळ,पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF),राष्ट्रीय पशुधन अभियान आणि पशुधन आरोग्य व रोग नियंत्रण कार्यक्रम आदींचा समावेश आहे.

   या योजनांमुळे दूध उत्पादकता वाढणे,चाऱ्याची उपलब्धता सुधारणे,पशु आरोग्य सेवा मजबूत होणे आणि एकूण उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे देशभरातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close