लोकसभा कामकाज
… शहरात बिबट्या,खा.वाकचौरे यांची घटनास्थळी भेट !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातील येसगाव शिवारात आपल्या जनावरांना घास कापत असलेल्या महिलेवर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक ६२ वर्षीय महिला शांताबाई निकोले ही जागीच ठार झाली असताना आज रात्री 8.30 च्या सुमारास कोपरगाव शहरातील गिरमे सिटी या ठिकाणी बिबट्या आढळून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान आज सायंकाळी 7.30 च्या सुमारास शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी येसगाव येथील मयत महिलेच्या कुटुंबास भेट दिली असून त्यांचे सांत्वन करून आगामी हिवाळी अधिवेशनात सदर प्रश्न आपण उपस्थित करणार असल्याचे आश्वासन उपस्थित ग्रामस्थांना दिले आहे.

“बिबट्यापेक्षा नागरिकाचे प्राण महत्वाचे असून बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली आहे.कोपरगाव तालुक्यात नव्हे तर अन्य तालुक्यातील बरेच बिबटे असून त्यांना या तालुक्यांतून हटविण्यात यावे”-संदिप वपे,अध्यक्ष,जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट)
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या भास्कर वस्तीजवळ आज सकाळी १० वाजेच्या सुमारास येसगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली महिला शांताबाई निकोले या आपल्या पशुधनास घास कापण्यासाठी गेलेल्या असताना व आपल्या कामात मग्न असताना त्यांच्यावर नजीकच्या कापूस पिकात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला असून त्यात त्या जागीच मृत्युमुखी पडल्या आहे.ही वार्ता नजीकच्या महिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांच्या हा धक्कादायक प्रकार लक्षात आला होता.मात्र त्या पोहचेपर्यंत उशीर झाला होता.त्या घटनेने संतप्त नागरिकांनी आहे.वन विभागास दोषी धरून जो पर्यंत नरभक्षक बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत आपण नगर-मनमाड महामार्ग बंद करत असल्याची घोषणा करत आंदोलने सुरू केले होते.मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करून वाहतूक पूर्ववत सुरू केली आहे.तर सायंकाळी सुरेगाव शिवारात एका कापूस वेचणाऱ्या महिलेवर आजच पुन्हा एका बिबट्याने हल्ला चढविला होता.मात्र अन्य सहकारी मजूर महिलांनी धावा बोल करून तिला कसेबसे वाचवले असल्याचे लक्षात आले आहे.

दरम्यान सदरच्या घटनेचे वृत्त शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना समजल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून सदर निकोले कुटुंबाचे सांत्वन केले आहे.व सदर प्रश्न आपण आगामी एक डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे माहिती दिली आहे.मागील हिवाळी लोकसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता व राज्यातील वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात किती नागरिक बळी गेले याची माहिती मागितली होती.

कोपरगाव शहराच्या वायव्येस साधारण दिड कि.मी.अंतरावर असलेल्या गिरमे सिटी या ठिकाणी आज कार्यकर्ते वैभव गिरमे यांच्या गाडीला सायंकाळी 7.30 वाजता बिबट्या आडवा गेल्याचे आढळून आल्याने नागरिकांनी बिबट्याची चांगलीच धास्ती घेतली आहे.
दरम्यान घटनास्थळी भेट दिली असता येसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र निकोले यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून सदर बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.सदर ठिकाणी आलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे कोणतेही हत्यार असल्याचे दिसून आले नाही अशा तक्रारी नागरिकांनी खा.वाकचौरे यांचेकडे केल्या आहेत.वन विभागाचे कर्मचारी कमी आहेच पण आहे त्यांना हत्यारे नाही.त्यांच्या हाती साधी विजेरी (बॅटरी)आढळून आली नाही अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.यावेळी खा.वाकचौरे यांनी जिल्हा वन अधिकारी यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.त्यावेळी जिल्हा वनाधिकारी श्री.सालविठ्ठल यांनी नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले असून शूटर यांना पाचारण केले असल्याचे सांगून आपण या भागातील अन्य बिबटे ‘ वनतारा ‘या प्रकल्पात स्थलांतरित करू असे आश्वासन दिले आहे.

यावेळी शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष संदीप वर्पे यांनी,”बिबट्या पेक्षा नागरिकाचे प्राण महत्वाचे असून बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली आहे.कोपरगाव तालुक्यात नव्हे तर अन्य तालुक्यातील बरेच बिबटे असून त्यांना या तालुक्यांतून हटविण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.यावेळी शिवसेना उबाठाचे जिल्हा समन्वयक मुकुंद सिनगर हेही घटनास्थळी उपस्थित होते.
——————————
*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.



