लोकसभा कामकाज
…या मार्गासाठी ३८ हजार लक्ष रुपयांची केंद्रात मागणी
न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
शिर्डी लोकसभा मतदार संघातील महत्वाचे व वर्दळीच्या रस्त्यांचा समावेश केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत करून त्या साठी केंद्रीय रस्ते निधीतून ३७ हजार,९०० लक्ष रुपयांची मागणी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी एका पत्राद्वारे देशाचे रस्ते व परिवहन विकास मंत्री नितीन गडकरी यांचे कडे समक्ष भेटून केली आहे.त्यास त्यांनी लक्ष घालून कार्यवाही करतो असे आश्वसन दिले असल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील रस्त्यांची गेल्या काही दशकात वाट लागली आहे.नेते निवडून येतात आणि ठेकेदारांना आपल्या तक्क्यासाठी वेठीस धरण्याची अनेक उदाहरणे आहे.त्यामुळे रस्त्यांची अवस्था होट्याची नव्हती होते.त्यामुळे अनेक अपघात होऊन अनेकांना आपल्या जीवास हकनाक गमवावे लागत आहे.देशात वर्षाकाठी जवळपास पावणे दोन लाख बळी या अपघातात जात असल्याची कबुली खुद्द नितीन गडकरी या केंद्रीय रस्ते विकास मंत्र्यांनी दिली आहे.त्यामुळे अलीकडील काळात कोरोनात इतके बळी गेले नाही इतके बळी रस्ते अपघातात जात आहे ही चिंताजनक बाब आहे.त्याबाबत त्यांनी लोकसभेतील चर्चेत खेद व्यक्त केला असून आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या कार्यक्रमात आपल्याला तोंड लपवावे लागत असल्याची प्रांजळ कबुली दिली आहे.त्यासाठी नव्याने निवडून आलेले शिर्डीचे उबाठा सेनेचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोकसभेत नगर-मनमाड या रस्त्याचा प्रश्न मांडलाच पण या मतदार संघातील रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.त्यासाठी जवळपास अडतीस हजार लक्ष रुपये निधीची मागणी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
त्यानी आपल्या निवेदनात लेखी मागण्या करताना म्हंटले आहे की,” राहाता शिर्डी बायपास रोड चार पदरी करण्यासाठी (राज्य मार्ग ६७ सी) किमी १/००० ते २१/०००, मागणी केली आहे.
दरम्यान याच बरोबर राहाता अहिल्यानगर हा रस्ता अहिल्यानगर-मनमाड रोड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-१६० वरील जड वाहतुकीसाठी महत्त्वाचा बायपास समजला जात आहे.हा रस्ता जड वाहनांची वाहतूक शिर्डीच्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शहरात जाण्यापासून रोखत असून त्यासाठी रक्कम रु.१६,००० लक्ष रुपयांची मागणी केली आहे.
याशिवाय निळवंडे कौठे-कमळेश्वर-काकडी-शिर्डी पर्यंत रस्ता (जिल्हा प्रमुख मार्ग क्रं.१०) किमी ०/०० ते १२/५०० हा रस्ता श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ ते शिर्डी शहराला जोडतो.या रस्त्यावरून स्थानिक शेती उत्पादनांची वाहतूक होते.या रस्त्याची सुधारनेसाठी रक्कम रु.३,००० लक्ष रुपयांची मागणी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग-२२२ ते तोलारखिंड-कोतुळ-सावरचोळ-संगमनेर-तळेगाव दिघे -कोपरगाव-उक्कडगाव रस्ता (राज्य मार्ग क्र.-६५) किमी ६९/०००ते ७३/००, हा रस्ता श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ ते शिर्डी शहराला जोडतो.या रस्त्यावरून स्थानिक शेती उत्पादनांची वाहतूक होते.रक्कम रु.१५०० लक्ष सुधारणा करणे.
जिल्हा सीमेवरील घाटघर शेंडी राजूर अकोले संगमनेर लोणी श्रीरामपूर नेवासा रस्ता (राज्य मार्ग-५०) किमी ३३/८०० ते ५९/९००,ता.अकोले,जिल्हा.अहिल्यानगर हा रस्ता भंडारदरा या लोकप्रिय पर्यटन स्थळाला जोडतो आणि दुर्गम आदिवासी भागांना महत्त्वाच्या स्थानिक बाजारपेठांशी जोडतो.रक्कम रु.१५०० लक्ष
शहापूर-घोटी-राजूर-अकोले-संगमनेर-लोणी-श्रीरामपूर-नेवासा रस्ता (राज्य मार्ग क्र.-५०) किमी ९३/००० ते ९८/९००,चारपदरी करणे.हा मार्ग समनापूर ते वडगावपान फाटा हा रस्ता संगमनेर शहर ते शिर्डी आणि लोणी शहराला जोडतो.या रस्त्यावरून स्थानिक शेती उत्पादनांचा माल वाहून नेणाऱ्या वाहनांची वाहतूक होते.या रस्त्यावरून ऊस वाहून नेणाऱ्या वाहनांचीही मोठी वाहतूक होते.रक्कम रु.५०००लक्ष.
पाथरे बु.ते लोणी पिंपरी-निर्मळ-चोळकेवाडी-वाकडी-चितळी रस्ता (जिल्हा मार्ग क्रं. ८६) कि.मी.७/५०० ते १३/५०० ता.राहाता,जिल्हा अहिल्यानगर.(भाग लोणी खुर्द मापरवाडी फाटा ते पिंपरी निर्मळ) या रस्त्यावरून स्थानिक शेती उत्पादनांचा माल वाहून नेणाऱ्या वाहनांचीही मोठी वाहतूक होते.या रस्त्यावरून ऊस वाहून नेणाऱ्या वाहनांचीही मोठी वाहतूक होते रक्कम रु.१०४३लक्ष रुपये.
जिल्हा सीमेपर्यंत बारी-राजूर-कोतुळ-ब्राम्हणवाडा पर्यंत बोटा रस्ता (राज्य मार्ग क्रं.-२३) कि.मी.२४९/५०० ते २६४/०००,ता.अकोले, जिल्हा.अहिल्यानगर.हा रस्ता भंडारदरा या लोकप्रिय पर्यटन स्थळाला जोडतो आणि दुर्गम आदिवासी भागांना महत्त्वाच्या स्थानिक बाजारपेठांशी जोडत आहे त्यासाठी रक्कम रु. २०५०लक्ष रुपयांची आवश्यकता आहे.
दरम्यान या व्यतिरिक्त कोल्हार बु.(जिल्हा मार्ग क.२१) राजुरी-गोल्हारवाडी-वाकडी-पुणतांबा रोड (जिल्हा मार्ग क्रं.८७ ) कि.मी.8/00 ते 17/00, ता. राहाता,जिल्हा अहिल्यानगर (भाग राजुरी ते वाकडी या रस्त्याहूंन उसाची जड वाहतूक वाहून नेणारी वाहने.तसेच बाजारपेठ असून त्यासाठी रक्कम रु.१३०७ लक्ष रुपये.
या खेरीज राष्ट्रीय महामार्ग क्रं.६० वर मुळा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम,चंदनपुरी-पिंपळगाव माथा-जवळे बाळेश्वर-चास पिंपळदरी रस्ता (जिल्हा मार्ग क्रं.२२) कि.मी. २३/५०००,ता.अकोले,जि.अहिल्यानगर येथे गरजेचा आहे.तर चास आणि पिंपळदरी मधील अंतर १३.०० कि.मी.या नवीन पुलामुळे कमी होणार आहे हा पूल जिल्हा मार्ग क्रं.२३ आणि राज्य मार्ग क्रं.३२ ला जोडेल परिणामी महत्त्वाच्या बाजारपेठा जोडल्या जातील.त्यासाठी रक्कम रु.७०० लक्ष रुपयांची गरज आहे याकडे खा.वाकचौरे यांनी लक्ष वेधले आहे.
या शिवाय जिल्हा मार्ग क्रं.-२२ ते जांभळे-काळेवाडी-बडगी-आंबी-दुमाला ते राज्य मार्ग क्रं.-२३ रस्त्यावर आंबी दुमाला येथे देव नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे.(ओ.डी.आर.३८) कि.मी.१८/३००,ता.संगमनेर,जिल्हा अहिल्यानगर येथे संगमनेर अहिल्यानगर या रस्त्यावर स्थानिक शेती उत्पादनांची वाहतूक होत असून या रस्त्यावरून ऊस वाहून नेणाऱ्या वाहनांचीही मोठी वाहतूक होते त्यासाठीरक्कम ३०० लक्ष रुपयांची गरज असल्याचे सांगितले आहे.
याशिवाय उंदिरगाव येथील गोदावरी नदीवरील मालेवाडी सरला बेट रोड (जिल्हा मार्ग क्रं.२१०) कि.मी.१०/५००ता.श्रीरामपूर
जि.अहिल्यानगर या प्रमुख पुलाचे बांधकाम या पुलामुळे सरला बेट ते तीर्थक्षेत्र जोडला जाऊन वैजापूर व श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर अहिल्यानगर रक्कम रु.१५०० लक्ष गरज आहे.
तर जिल्हा मार्ग क्रं.२१ ते वळदगाव-अशोकनगर ते टाकळीभान पर्यंत रस्ता (जिल्हा मार्ग क्रं.०६) कि.मी.३/०० ते १७/५००,ता.श्रीरामपूर,जिल्हा-अहिल्यानगर या रस्त्यावरुन उस वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे.त्यासाठी सुधारणा रक्कम र.२००० लक्ष आवश्यक आहे.
शिर्डी मतदार संघातील प्रमुख रस्ते व पुल बांधकाम तातडीने होणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून देऊन केंद्रीय रस्ते निधीमधून समावेश करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी शेवटी केली आहे.त्यांच्या या उपक्रमाचे शिर्डी लोकसभा मतदार संघात सर्वत्र स्वागत होत आहे.