रेल्वे सेवा
‘वंदे मातरम’ गाडीला…या शहरात थांबा द्या-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
‘वंदे भारत’ या दहा फेब्रुवारी पासून सुरू होत असलेल्या ट्रेनचे कोपरगाव प्रवासी संघटना,साईभक्त व कोपरगावकरांकडून स्वागत करण्यात येत असून कोपरगाव शहराचे ऐत्याहसिक महत्व समजून घेऊन रेल्वे प्रशासनाने सदर गाडीला कोपरगावात थांबा द्यावा अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल पुंडे यांनी केली आहे.
“शिर्डीला येण्यापूर्वी साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध ठिकानासह कोपरगाव येथील जनार्दन स्वामी आश्रम जंगली महाराज आश्रम,बेट येथील शुक्राचार्य मंदिर,कोकमठाण,संवत्सर आदी धार्मिक आणि पौराणिक स्थळांना भेटी देण्याची इच्छा असते.ते शिर्डीला जाण्यापूर्वी कोपरगाव येथे येतात नंतर ते शिर्डीला जातात.तेव्हा वंदे भारत या ट्रेनला कोपरगाव येथे थांबा मिळावा”-विमल पुंड,अध्यक्ष,जिल्हा महिला आघाडी,बाळासाहेब शिवसेना,
‘वंदे मातरम’ एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक अर्ध-द्रुतगती रेल्वे सेवा आहे.संपूर्ण भारतीय बनावटीची ही रेल्वेगाडी चेन्नई येथील इंटिग्रल कोच कारखान्यामध्ये उत्पादित करण्यात आली.भारत सरकारच्या मेक इन इंडिया ह्या उपक्रमाअंतर्गत १८ महिन्यांच्या कालावधीत १०० कोटी रुपये खर्चून ह्या रेल्वेगाडीची संकल्पना,विकास व निर्मिती केली गेली. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिली वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते वाराणसी ह्या शहरांदरम्यान धावली. आजच्या घडीला नवी दिल्ली-वाराणसी व नवी दिल्ली-कटरा ह्या दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या कार्यरत आहेत. वंदे भारत एक्सप्रेसचा कमाल वेग १३० कि.मी.तास इतका असून २०२३ सालापर्यंत ७५ गाड्या चालवण्याचा भारतीय रेल्वेचा विचार आहे.वार्तमानात मुंबई-शिर्डी हि गाडी येत्या दहा फेब्रुवारी पासून सुरु होत आहे.त्याबाबत प्रवाशांकडून प्रतिक्रिया येत आहेत.या पार्श्वभूमीवर विमल पुंड यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ दोन ट्रेन मंजूर असताना त्यापैकी एक शिर्डी कोपरगाव साठी देण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.मुंबईवरून शिर्डी कोपरगाव कडे येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांना या ट्रेनचे अनेक लाभ मिळणार आहेत.या ट्रेनला कोपरगावला थांबा मिळावा अशी प्रवाशांकडून मोठी मागणी केली जात आहे.शिर्डीला येण्यापूर्वी साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोपरगाव येथील अनेक धार्मिक स्थळांना भेटी देण्याची साई भक्तांची इच्छा असते. त्याचप्रमाणे कोपरगाव येथील जनार्दन स्वामी आश्रम जंगली महाराज आश्रम,बेट येथील शुक्राचार्य मंदिर,कोकमठाण,संवत्सर आदी धार्मिक आणि पौराणिक स्थळांना भेटी देण्याची इच्छा अनेक साईभक्त व्यक्त करतात.ते शिर्डीला जाण्यापूर्वी कोपरगाव येथे येतात नंतर ते शिर्डीला जातात.तेव्हा वंदे भारत या ट्रेनला कोपरगाव येथे थांबा मिळावा अशी मागणी प्रवासी संघटना कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल पुंडे यांनी रेल्वे प्रशासनाला एका यांनी एका निवेदनाद्वारे शेवटी केली आहे.