महिला बाल कल्याण
स्त्रीवाद हा पुरुषविरोधी नाही-प्रा.आहेर

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“स्त्रीवाद हा पुरुषविरोधी विचार नाही तर त्यामध्ये संधीची समानता महत्त्वाची आहे.तो स्त्रियांचा मूलभूत अधिकार आहे,म्हणून विद्यार्थिनींनी विद्यार्थीदशेतच स्वतःला मानसिक,शारीरिक व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवावे असे प्रतिपादन प्रा.वर्षा आहेर यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

भारत सरकारने २००१ हे वर्ष महिला सबलीकरणाचे वर्ष म्हणून घोषित केले.भारतातील स्त्रिया आता शिक्षण,राजकारण,प्रसारमाध्यमे,कला,विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यामुळे महिलांचे सबलीकरण व्हावे यासाठी भारत सरकार अनेक योजना राबवित आहे.
महिला सबलीकरणाचे राष्ट्रीय धोरण २००१ मध्ये मंजूर करण्यात आले.त्यानुसार केंद्र सरकारच्या तर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत.तरीही महिलांचा विकास होताना दिसत नाही. स्त्रीचं सबलीकरण होणं म्हणजे नक्की काय याची एकदा व्याख्या होणे गरजेचे आहे.स्त्रियांंचा सन्मान,रोजगार,आरोग्य,शिक्षण आदी प्रश्न १९७५ नंतर ऐरणीवर आले.या सर्व प्रश्नांची चर्चा सार्वजनिक व्यासपीठावर करावी लागेल,अशी परिस्थिती निर्माण झाली होती.स्त्री चळवळीत शोषणमुक्तीचा आदर्शवादही वारंवार मांडला गेला.त्या आंदोलनात अनेक विचारसरणीच्या प्रवक्त्या,कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे आपले विचार मांडले.स्त्रीमुक्तीची सामूहिक संघर्षाची परिभाषा सोडून सबलीकरणाच्या परिभाषेला मान्यता दिली.सन-१९८० च्या दशकातील मध्यात उदारीकरणाच्या धोरणामुळे सबलीकरणाची परिभाषा समोर आली.त्यानंतर महिला सबलीकरणाची संकल्पना रूढ झाली.
त्यानंतर महिला सबलीकरणाची संकल्पना रूढ झाली.भारत सरकारने २००१ हे वर्ष महिला सबलीकरणाचे वर्ष म्हणून घोषित केले.भारतातील स्त्रिया आता शिक्षण, राजकारण,प्रसारमाध्यमे,कला,विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यामुळे महिलांचे सबलीकरण व्हावे यासाठी भारत सरकार अनेक योजना राबवित आहे. महिलांचा सत्तेत सहभाग म्हणजेच महिलांचे सबलीकरण ही धारणा आता मागासलेल्या देशात वाढत चालली आहे.त्यासाठी हा कार्यक्रम राबवला जात आहे.याच विषयावर
कोपरगाव येथील के.जे.सोमय्या महाविद्यालय येथे महिला सबलीकरण कक्ष अंतर्गत ‘स्व-संरक्षण’ विषयावर व्याख्यान आयोजित केले होते त्यावेळी त्या बोलत होत्या.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महिला सबलीकरण कक्षाच्या प्रमुख डॉ.नीता शिंदे यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांसंदर्भात जसे ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’, ‘महिला हेल्पलाइन योजना’,उज्वला योजना,’सपोर्ट ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट प्रोग्राम’ फॉर महिला शक्ती केंद्र तसेच महिलांसाठी आरक्षण इत्यादी योजना या संदर्भात देखील माहिती दिली आहे.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महिला सबलीकरण कक्षाच्या सदस्य डॉ.सुरेखा भिंगारदिवे यांनी केले,तर सूत्रसंचालन प्रा.मयुरी आहेर यांनी केले.या कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.महिला सबलीकरण कक्षाच्या सदस्य प्रा.नन्नवरे,प्रा.जयश्री खंडेझोड,प्रा.सुवर्णा चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले आहे.