महिला बालविकास विभाग
एकल महिलांना बालसंगोपन निधी द्या-…यांची मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर यांनी काल शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली असून कोरोना काळात एकल झालेल्या महिलांसाठी मालमत्ता हक्क तसेच अंदाजपत्रकामध्ये ठरल्याप्रमाणे बाल संगोपन योजनेचे २ हजार २०० रुपये करावेत,कोरोना काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना शिक्षण हमी कायद्यानुसार २५ टक्के प्रवेश आरक्षण योजनेचा लाभ मिळावा आदी मागण्या केल्या आहेत.
“या बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या बालकांना ०१ हजार १०० रुपये दरमहा अनुदान दिले जाते.या योजनेमुळे राज्यातील अनाथ आणि कमजोर बालकांना आपल शिक्षण अर्धवट सोडण्याची गरज पडणार नाही.या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते”-संगीता मालकर,अध्यक्ष,सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान,कोपरगाव.
शिर्डी येथे नुकतीच साईबाबा समाधी मंदिरात डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेतले आहे.त्यावेळी काही काळ त्यांनी शिर्डी येथील शासकीय विश्राम गृहात थांबल्या होत्या त्या वेळी हा संपर्क साधला आहे.त्यावेळी हि मागणी केली आहे.
सदर प्रसंगी त्यांनी पुढे बोलताना त्यांनी हि मागणी केली आहे की,”शिवाय तो नियमाने इयत्ता पहिली पासून आहे हा नियम शिथिल करून पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना तो लाभ द्यावा व तशी आर्थिक तरतूद करावी आदी मागण्या केल्या आहेत.
सदर निवेदन स्वीकारून याबाबत नक्कीच सकारात्मक चर्चा घडवून आणू असे आश्वासन नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे. तसेच कोरोना काळात एकल झालेल्या शितल रायकर यांनी देखील दिवंगत झालेल्या पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून शासनाने सन्मान करावा अशी मागणी त्यांनी शेवटी केली आहे.या मागणी बाबत राज्यातील ऐकलं महिला आणि पत्रकार यांनी समाधान व्यक्त केले आहे.