महिला बालविकास विभाग
…या गावी,’जागतिक महिला दिन’उत्साहात संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जागतिक महिला दिनानिमित्त कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत येथे गावातील महिलांना वाणाचे वितरण करून त्यांचा मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर प्रसंगी प्रास्तविक जवळके ग्रामपंचायत अधिकारी सतीश दिघे यांनी केले आहे.त्यावेळी त्यांनी सरकार व जवळके ग्रामपंचायत महिलांसाठी राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली आहे.
सन -१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय महिला कामगार संघटनेच्या परिषदेत क्लारा झेटकीन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची हाक दिली आणि तेव्हापासून दरवर्षी ०८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून भारतासह जगभर साजरा केला जातो.कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत हद्दीत तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

सदर प्रसंगी राज्य शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे,जलसंपदाचे माजी उपअभियंता एस.के.थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,इंदुबाई नवनाथ शिंदे,मुख्याध्यापक दत्तात्रय मैड,निवृत्ती बढे,रवींद्र गोसावी,सुरेखा उगले,कोमल बागुल,ग्रामपंचायत अधिकारी सतीश दिघे,आरोग्य सेविका,अंगणवाडी सेविका सौ.नेहे,ज्योती पन्हाळे,वाळूबाई गोविंद थोरात,तेजस्वीनी शिंदे,सोनाली पन्हाळे,मनीषा सरवार,प्रीती पोकळे,सोनाली थोरात,आशा सेविका,अल्पबचत गटाच्या महिला,ग्रामपंचायत कर्मचारी व इतर गावातील महिला उपस्थित होत्या.
दरम्यान सदर प्रसंगी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीमती हिराबाई थोरात यांचे हस्ते करण्यात आले आहे.यावेळी महिलांचे हळदी कुंकू संपन्न झाले आहे.
यावेळी प्रास्तविक ग्रामपंचायत अधिकारी सतीश दिघे यांनी केले आहे.त्यावेळी त्यांनी सरकार व जवळके ग्रामपंचायत महिलांसाठी राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली आहे तर सूत्रसंचालन जानका देवकर यांनी केले आहे.तर उपस्थितांना मार्गदर्शन नानासाहेब जवरे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार सरपंच सारिका थोरात यांनी केले आहे.त्यावेळी त्यांनी जवळके ग्रामपंचायत ग्रामस्थासाठी राबवित असलेल्या विविध सामाजिक योजनांची माहिती दिली आहे.या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.