जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
महसूल विभाग

ग्रा.पं.सदस्य अपात्रता प्रकरण,अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील ग्रामपंचायत सदस्य यशवंत विठ्ठल आव्हाड यांच्या अपात्रतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आलेल्या दाव्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली असून यात कोपरगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना स्थळ निरीक्षण पंचनामा करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल आगामी सुनावणी पूर्वी सादर करण्यास सांगितले असल्याने या सुनावणीकडे कोपरगाव तालुक्यातील राजकीय निरीक्षकांच्या लक्ष लागून आहे.

सरकारी जमिनीत अतिक्रमण केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(१) (ज-३) व १६ प्रमाणे ग्रामपंचायत सदस्या विरोधात अपात्रतेचा अर्ज काशिनाथ रंगनाथ वक्ते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सहा महिण्यापूर्वी केलेला आहे.त्याची सुनावणी नुकतीच दि.२८ डिसेंबर रोजी संपन्न झाली आहे त्यात हा आदेश दिला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायद्याने ज्याप्रमाणे,ग्रामपंचायतीला बळकटी देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना अधिकार प्रदान केले आहेत.त्याचप्रमाणे,ग्रामपंचायतीचा कारभार सुव्यवस्थेचा व्हावा म्हणून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असेलेले सरपंच,उपसरपंच,सदस्य यांना कायद्याच्या चौकटीत राहून व कायद्याने निर्गमित केलेले पात्रतेचे निकष कायम ठेवून आपले कर्तव्य,जबाबदाऱ्या पार पाडावी लागतात.असे कर्तव्य पार पाडत असताना सरपंच,उपसरपंच,सदस्य यांनी कसूर केल्यास संबंधितास अपात्रतेची तरतूद देखील कायद्यात करून ठेवली गेली आहे.

शासकीय जमिनीवर किंवा मालमत्तेवर अतिक्रमण केले असल्यास अशा व्यक्तीस (ग्रामपंचायत सदस्य अपात्र नियम अतिक्रमण) (कलम १४ ज) नुसार अपात्र ठरविण्यात येते.जेऊर कुंभारी येथील सदस्य यांच्या कुटुंबाने सरकारी जमिनीत अतिक्रमण केले असल्याने हा तक्रारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यामुळे हा दोषारोप सिद्ध झाल्यास वरीलपैकी संबधीत ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसपंच व ग्रामपंचायतीचे सदस्य यांना त्यांच्या अधिकारपदापासून दूर करता येते.याबाबतचे अंतिम निर्णय जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडे असतात.यापूर्वी वेस ग्रामपंचायतीत तीन वर्षांपूर्वी असा निकाल सरपंच यांचे विरुद्ध काळे गटाने मिळवला होता.त्यात सरपंचपद गमवावे लागले होते.हि घटना फार जुनी नाही.अशीच घटना आता कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या म्हत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत घडली असून तेथील सदस्य यशवंत आव्हाड यांनी सरकारी गट क्रं.१३४ मधील सुमारे नऊ एकर क्षेत्रातील जमिनीत अतिक्रमण केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(१) (ज-३) व १६ प्रमाणे ग्रामपंचायत सदस्या विरोधात अपात्रतेचा अर्ज काशिनाथ रंगनाथ वक्ते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सहा महिण्यापूर्वी केलेला आहे.त्याची सुनावणी नुकतीच दि.२८ डिसेंबर रोजी संपन्न झाली आहे.त्यावेळी तक्रारदार काशिनाथ वक्ते व विरुद्ध यशवंत विठ्ठल आव्हाड हे दोन्ही पक्षाचे वादी प्रतिवादी नागरिक उपस्थित होते.

आता आगामी १० जानेवारी रोजी आगामी सुनावणी संपन्न होणार आहे.त्यासाठी सदर प्रकरणात कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी याना स्थळनिरीक्षण पंचनामा करून स्वयंसष्ट अभिप्रायासह अहवाल सुनावणी पूर्वी तहसीलदार,सामान्य प्रशासन,जिल्हाधिकारी कार्यालय अ.नगर त्यांचेकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यामुळे या प्रकरणाकडे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close