महसूल विभाग
‘ई-पीक पाहणी’ नोंद करण्याचे…या तहसीलदारांचे शेतकऱ्यांना आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत पीक पाहणी नोंदवली नाही अशा शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते.तेव्हा शेतकऱ्यांनी तात्काळ ‘ई-पीक पाहणी’ अॅपद्वारे पीक पाहणी नोंदवावी असे आवाहन राहाता तहसीलदार विजय बोरुडे यांनी एका प्रसिद्धी प्रत्रकान्वये केले आहे.
“पीक पाहणी मोबाईल द्वारे नोंदविण्याची अंतिम मुदत आगामी १५ ऑक्टोबर आहे.आपण पीक पाहणी न नोंदविल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते.आज पर्यंत केवळ ३० टक्के पीक पाहणी नोंदवली गेली आहे.हि जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाची आहे.तरीही अधिकची पीक पाहणी नोंदणी होणे गरजेचे आहे.ती करताना अडचण आल्यास मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी संपर्क साधावा”-विजय बोरुडे,तहसीलदार कोपरगाव.
शेतकऱ्यांनी आपल्या शेताची ‘ई- पीक पाहणी’ नोंदवावी.पीक पाहणी मोबाईल वरून करण्याची सुविधा शासनाने दिलेली आहे. ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप तयार करण्यात आलं आहे.स्थानिक पातळीवरुन आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.
तरी अद्याप पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी मोबाईल वरून आपल्या शेतातील पिकाची नोंदणी केली नाही. अशा शेतकऱ्यांनी प्ले स्टोअरवर जाऊन ही ई- पीक पाहणी व्हर्जन २ हे अॅप डाऊनलोड करून तात्काळ ई-पीक पाहणी करण्यात यावी असे आवाहनही शेवटी तहसीलदार बोरुडे यांनी केले आहे.
पिकांची नोंद करण्याची प्रक्रिया
ई-पीक पाहणी अॅप डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला प्ले-स्टोअरवर जायचं आहे. तिथं E-Peek Pahani असं सर्च करायचं आहे.त्यानंतर इन्स्टॉल वर क्लिक करायचं आहे.इस्टॉलेशन कम्प्लीट झालं की ओपन या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर ई-पीक पाहणी नावाचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख कार्यालय,महसूल विभाग,महाराष्ट्र शासन.
ई-पीक पाहणी प्रकल्प संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे.असं तिथं नमूद केलेलं असेल.याला डावीकडे सरकवल्यास हे अॅप वापरण्यासाठी लागणारी माहिती तिथं दिलेली असेल.पुन्हा एकदा डावीकडे सरकवल्यास पिकांची नोंदणी करण्यासाठी ज्या बाबींची मदत होऊ शकेल, त्या दिलेल्या असतील. जसं की सातबारा उतारा,८-अ इत्यादी.इथं असलेल्या पुढे या पर्यायावर क्लिक करायचं आहे.मोबाईल नंबर टाकून पुढे वर क्लिक करायचं आहे.जिल्हा,तालुका गाव निडून पुढेवर क्लिक करायचं आहे.त्यानंतर खातेदार निवडायचा आहे.पहिलं,मधलं किंवा आडनाव,तसंच गटक्रमांक टाकून तुम्ही खातेदार निवडू शकता.गटक्रमांक टाकून शोधावर क्लिक करायचं आहे.मग त्या गटातील खातेदार तुम्हाला निवडायचा आहे.मग नोंदणी अर्जासाठी आपण निवडलेली माहिती तपासून पाहायची आहे.
त्यानंतर पुढे या पर्यायावर क्लिक करायचं आहे.आता तुम्ही जो मोबाईल क्रमांक सुरुवातीला दिला त्यावर तुमची नोंदणी करण्यात येत आहे,असा मेसेज तिथं येईल.तुम्हाला नंबर बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे बटण दाबा किंवा पुढे वर क्लिक करा.या नंबरवर एक सांकेतांक क्रमांक पाठवला जाईल.हाच नंबर या अॅपवर शेतकऱ्यांना लॉग इन करण्यासाठी वापरावा लागणारा आहे.