महसूल विभाग
कोपरगाव तालुक्यात भूमापनसाठी …या योजनेचा शुभारंभ

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शासनाच्या जमाबंदी प्रकल्प ग्रामविकास विभाग,राज्याचे जमाबंदी आयुक्त व भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामित्व योजने अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन व जी.आय.एस.आधारित रेखांकन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.या कार्यक्रमाचा शुभारंभ कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर येथे आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे.
स्वामित्व योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे.दिनांक २४ एप्रिल २०२१ रोजी पंचायती राज दिनानि्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व (प्रधानमंत्री स्वामित्व योजना) योजना सुरू केली.पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील सर्व सरपंचांशी संवाद साधला व त्यावेळी स्वामित्व योजना सुरू केल्याची घोषणा केली होती.त्याचे उदघाटन कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर येथे नुकतेच आ.काळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
देशातील सर्वच भागात जमिनी बाबतच्या मालकी हक्काबद्दल नेहमीच वाद उद्भवत असतात. तसेच, गरिबांच्या जमिनींवर जबरदस्तीने कब्जा केल्याची प्रकरणे देखील पहायला मिळतात. इत्यादी सारख्या गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने देशपातळीवर स्वामित्व योजना राबविण्याचा संकल्प केला आहे. स्वामित्व योजने अंतर्गत देशातील सर्व ग्रामीण भागातील जमिनींचे ड्रोनद्वारे मोजमाप केले जाईल आणि गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार केला जाईल. उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यानुसार संबंधित मालकाला-शेतकऱ्याला त्याच्या जमीन मालकीचे प्रमाणपत्र (ई-प्रॉपर्टी कार्ड) दिले जाणार आहे.
स्वामित्व योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे.दिनांक २४ एप्रिल २०२१ रोजी पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व (प्रधानमंत्री स्वामित्व योजना) योजना सुरू केली.पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील सर्व सरपंचांशी संवाद साधला व त्यावेळी स्वामित्व योजना सुरू केल्याची घोषणा केली होती. त्याचे उदघाटन कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर येथे नुकतेच करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी इंद्रभान ढोमसे,पांडुरंग ढोमसे,विठ्ठल वाबळे,अल्ताफ पटेल,उपसरपंच शोएब पटेल,बाळासाहेब ढोमसे,मच्छिन्द्र देशमुख,दत्तात्रय बोरसे,गणपत बोरसे,संजय सूर्यवंशी,सागर वाबळे,सुनील देशमुखविश्वास देशमुख,नानासाहेब वाबळे,राजेंद्र वाबळे,राजेंद्र माळी,प्रविण सपकळ,अरुण वाबळे,सीताराम बोरसे,मुश्ताक पटेल,भूमी अभिलेख उपअधीक्षक संजय भास्कर,मुख्यालय सहाय्यक सुनील कडू,सर्वे अधिकारी संदीप कदम,निमतानदार नितीन जगधने,भूमापक भास्कर हराळ,तलाठी गोविंद खैरनार,ग्रामसेविका श्रीमती आरती टोरपे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”राज्यातील अनेक ग्रामपंचायतींकडे हद्दीचे नकाशे उपलब्ध नाहीत त्यामुळे गावांतील सरकारी जमिनीवर झालेली अनधिकृत अतिक्रमणे,याबाबतची माहितीही आजमितीला बहुतांश ग्रामपंचायतींकडे उपलब्ध नाही.गावठाणांचे बिनचूक भूमापन केल्यावर ही माहिती ग्रामपंचायतींना उपलब्ध होणार आहे.त्यासाठी गावाकडे उपलब्ध असलेल्या गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे मोफत करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.हि योजना प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी व त्या त्या गावातील नागरिकांना देखील अत्यंत फायदेशीर आहे. स्वामित्व योजनेच्या माध्यमातून गावठाण मिळकतींची मोजणी करून संबंधितांना मिळकत पत्रिका दिल्या जाणार आहेत.या योजनेमध्ये राज्यातील सिटी सर्व्हे अंतर्गत येणाऱ्या गावांची निवड करण्यात आली आहे.दोन ऑक्टोबरपर्यंत मिळकत पत्रिकांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट भूमी अभिलेख विभागाकडून ठेवण्यात आले आहे.
स्वामित्व योजनेनुसार मालमत्तेच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र दिले जाणार असल्याने मालमत्तेवरुन होणारे वाद मिटणार आहेत.तसेच संबंधित नागरिकांना कर्ज मिळण्याचा मार्ग देखील सुलभ होणार आहे.ज्याप्रमाणे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी होत आहे त्याप्रमाणे शेतीच्या बांधावरून होणारे वाद कायमस्वरूपी मिटले जावे यासाठी शेतीची देखील मोजणी ड्रोनच्या माध्यमातून होण्यासाठी शासनाने व्यापक मोहीम हाती घ्यावी अशी अपेक्षा आ.काळे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.