जाहिरात-9423439946
महसूल विभाग

लाचखोरांच्या तक्रारी करा,मुसक्या आवळू-जिल्हाधिकारी

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव तालुक्यातील शासनाच्या विविध विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून नागरिक हैराण झाले आहे.लोकप्रतिनिधींनी हात टेकले असताना आज आमच्या प्रतिनिधीने याबाबत जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना आज दुपारी 03 वाजता सवाल विचारला असता त्यांनी असे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या थेट लाच लुचपत विभागाकडे किंवा आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी कराव्या त्यांचा बंदोबस्त करून आपण मुसक्या आवळू असे इशारा दिला आहे.त्यामुळे लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  

“शासनाने वाळू मिश्रित वाळूचा लिलाव करण्याचा आदेश दिला असल्याचे पाहून सुरेगाव येथील नदीपात्रात वाळूमिश्रित वाळू असल्याचा खोटा अहवाल तेथील संस्थेने न्यायालय आणि शासनाला दिला आहे.शिवाय महसूल विभागांच्या तहसीलदार आणि अधिकाऱ्यांना वाळूचोरीचे चलचित्रण वारंवार देऊनही त्यावर वरिष्ठ अधिकारी कारवाई करत नसल्याचा आरोप केला आहे.वाळूचोरांना लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचे अभय आहे” -गोदावरी बचाव संघर्ष कृती समिती,कोपरगाव.

   एकीकडे देशभर भ्रष्टाचारविरोधी वातावरण पसरले असताना सरकारी खात्यांतील भ्रष्टाचाराची गंगा मात्र खळाळून वाहत असताना दिसत आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केलेल्या एकूण कारवायांचा तपशील पाहता गेल्या काही महिन्यांत महसूल खात्याने पोलिस खात्याला मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला असल्याचे वारंवार उघड झाले आहे.त्यातच महसुल महत्त्वाच्या विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी यापुढे ‘भ्रष्टाचार बंद’ असे खणखणीत धोरण राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागील वर्षात फेब्रुवारीत जाहीर केले होते मात्र महसूल मंत्र्यांची आणि लोकप्रतिनिधींची हि घोषणा कोपरगाव तहसील विभागाने कचरा कुंडीत टाकून नवनवे विक्रम स्थापित करत असल्याचे दोन दिवसापूर्वी उघड झाले होते.यात अंजना पवार या महसूल सहाय्यक महिलेने एका अर्जदाराकडून सात हजारांची लाच घेताना त्यांना लाच लुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षक छाया देवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक केली होती.त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि त्यांचे आदेशाना अधिकारी आणि कर्मचारी केराची टोपली दाखवत असल्याचे उघड होऊन ही भ्रष्टाचाराची ही गंगा मोठ्या प्रमाणात खळखळत असल्याचे उघड झाले होते.या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचा कोपरगाव तालुक्यातील विविध विभागांचा आढावा घेण्यासाठी बैठक तहसील कार्यालयात आयोजित केली होती.त्यावेळी ते बोलत होते.

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील वनविभागाच्या जमिनीचा दुरुपयोग वाळूचोर करत होते त्यामुळे त्या ठिकाणी नाली खोदून प्रतिबंध करताना वनाअधिकारी मेहबूब शेख दिसत आहेत.

  सदर प्रसंगी शिर्डी येथील प्रांताधिकारी माणिक आहेर,कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आदीसह अनेक नागरिक,पत्रकार उपस्थित होते.

   सदर प्रसंगी पत्रकारांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना कोपरगाव तालुक्यातील विविध प्रश्न विचारले त्यात प्रामुख्याने महसूल विभागातील भ्रष्टाचारावर लक्ष केंद्रित केले होते.त्यावेळी यांनी कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना हे आवाहन केले आहे.त्यात पुढे बोलताना म्हणाले की,”कायद्याने असे चुकीचे काम करणे गुन्हा आहे.आणि आम्ही वेळोवेळी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देत असतोच.पण तरीही कोणी असे काम करत असेल तर ते चुकीचेच आहे.मात्र असे कोणी नागरिकांना लुबाडण्याचे काम करत असेल तर त्यांच्या तक्रारी जिल्हा लाच लुचपत विभागाकडे कराव्या व त्यांना लाच घेताना पडकून द्यावे.या शिवाय आमचेसह प्रांताधिकारी,अपर जिल्हाधिकारी आदींकडे तक्रारी कराव्या निश्चित नागरिकांना न्याय मिळेल असा दावा त्यांनी केला आहे.

कोपरगाव नगरपरिषद अंतर्गत सुरू असलेल्या ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियान’ अंतर्गत भूमिगत गटारीचे निकृष्ट काम सुरू आहे.

“कोपरगाव नगरपरिषद अंतर्गत सुरू असलेल्या ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियान’ अंतर्गत 227 कोटींची भूमिगत गटारीचे निकृष्ट आणि सदोष काम सुरू असून त्याबाबत आपण दि.20 जानेवारी रोजी आंदोलन केले होते.त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी आपल्याला कनिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून लेखी आश्वासन दिले होते.मात्र त्याला नगरपरिषद प्रशासनाने केराची टोपली दाखवली असल्याने पुन्हा एकदा विनय भगत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.

  दरम्यान तालुक्यातील अवैध वाळूचे प्रमाण आणि गावठी कट्टे,अवैध वाळूचोऱ्यांच्या टोळ्या आणि वाळूचोर आदी मोठ्या प्रमाणावर वाढले आहे आणि महसूल आणि पोलिस एकमेकाकडे बोट दाखवून मोकळे होत असल्याकडे त्याने लक्ष वेधले असता त्यांनी आपण नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.त्याबाबत पोलिस आणि महसूल विभाग आहे.त्यांनी संयुक्तपणे कारवाई करणे अपेक्षित आहे.त्यांना आपण सूचना देऊ व आगामी काळात त्यांचेवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याने सक्तीने (मोका) प्रतिबंध केला जाईल असा विश्वास दिला आहे.

झगडे फाटा ते वडगाव पान निकृष्ट रस्त्यांमुळे अंजनापूर येथील बारा वर्षीय अल्पवयीन बालक गुरुत्व कैलास गाढे याचा बळी गेला त्यावेळी केलेले,’रास्ता रोको आंदोलन.

“मुंबई,नाशिक,ठाणे,गुजरात आदी ठिकाणाहून शिर्डी येथे येणाऱ्या साई पालख्या आणि भक्तांसाठी शिर्डी साठी जवळके,सायाळे मार्गे जवळचा रस्ता असतानाही सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आर्थिक अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद केली नाही.शिवाय शिर्डी बाह्यवळण रस्ता होण्याच्या आधी पुणतांबा-झगडेफाटा-जवळके-तळेगाव दिघे या पर्यायी मार्गाचा अवलंब केल्याने या रस्त्यावरून अवजड वाहतूक केल्याने रस्त्याची वाट लागली आहे.त्यामुळे अनेक अपघात होऊन त्यात गेल्या वीस वर्षात पन्नास-साठहून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे.मात्र त्यावर कोणी लोकप्रतिनिधी,बांधकाम विभागाचे अधिकारी आर्थिक तरतूद करत नाही”-गंगाधर रहाणे,माजी तालुकाध्यक्ष,शिवसेना.

   दरम्यान यावेळी जवळके येथील जनमंगल ग्रामविकास कार्यकर्त्यांनी मुंबई,नाशिक,ठाणे,गुजरात आदी ठिकाणाहून शिर्डी येथे येणाऱ्या साई पालख्या आणि भक्तांसाठी शिर्डी साठी जवळके,सायाळे मार्गे जवळचा रस्ता असतानाही सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आर्थिक अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद केली नाही.शिवाय शिर्डी बाह्यवळण रस्ता होण्याच्या आधी पुणतांबा-झगडेफाटा-जवळके-तळेगाव दिघे या पर्यायी मार्गाचा अवलंब केल्याने या रस्त्यावरून अवजड वाहतूक केल्याने रस्त्याची वाट लागली आहे.त्यामुळे अनेक अपघात होऊन त्यात गेल्या वीस वर्षात पन्नास-साठहून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे.मात्र त्यावर कोणी लोकप्रतिनिधी आर्थिक तरतूद करत नाही.तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.गत सप्ताहात एका अल्पवयीन बालकाचा अपघातात बळी गेला आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी अंजनापूर या ठिकाणी चार तास ‘रास्ता रोको’ आंदोलन केले होते.त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने डागडुजी करण्याचे नाटक केले आणि आंदोलन संपल्यावर पुन्हा काम बंद केले असल्याची बाब जिल्हाधिकारी आशिया यांचे लक्षात आणून दिली आहे.त्यावर त्यांनी आपण या प्रकरणी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे.

  दरम्यान सुरेगाव येथील गोदावरी बचाव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी गोदावरी नदीतून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्याची गंभीर बाब जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचे लक्षात आणून दिली असून सदर वाळूचोर महसुली अधिकारी,कर्मचारी,पत्रकार,नागरिकांवर गावठी कट्टे रोखत असून ते मुजोर बनले असल्याची बाब त्यांचे लक्षात आणून दिली आहे.शिवाय वाळूचोरांविरुद्ध कारवाई करताना महसूल अधिकाऱ्यांना स्वतंत्र पोलिस पथक निर्माण करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे.वाळूच्या अवजड वाहतुकीमुळे ग्रामीण रस्त्यांची वाट लागली आहे.निधी आणून ही उपयोग होत नाही.त्यामुळे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.त्यावेळी समितीचे कार्यकर्ते मोतीराम एकम,सिद्धार्थ मेहेरखांब,अक्षय निकम,ज्ञानेश्वर माळवे,मतीन शेख,रमेश मेहेरखांब,राजेंद्र मेहेरखांब,भाऊसाहेब कदम,संतोष वाबळे,बापूसाहेब कदम,शिवाजी वाबळे, शिवाजी कदम आदीं उपस्थित होते.

सुरेगाव येथील गोदावरी बचाव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी गोदावरी नदीतून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी केल्या तो क्षण.

   दरम्यान यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात राज्य शासनाने वाळू मिश्रित वाळूचा लिलाव करण्याचा आदेश दिला असल्याचे पाहून सुरेगाव येथील नदीपात्रात वाळूमिश्रित वाळू असल्याचा खोटा अहवाल न्यायालय आणि शासनाला दिला असल्याचा आरोप गोदावरी बचाव कृती समितीने केला आहे.व संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.शिवाय महसूल विभागांच्या तहसीलदार आणि अधिकाऱ्यांना वाळूचोरीचे चलचित्रण वारंवार देऊनही त्यावर वरिष्ठ अधिकारी कारवाई करत नसल्याचा आरोप केला आहे.वाळूचोरांना लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचे अभय आहे असा गंभीर आरोप केला आहे.शिवाय कोळगाव थडी,सांगवी भुसार,सुरेगाव आदी गावात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा झाल्याने भूजल पातळी खोलवर गेली असून नजिकचे कृषी क्षेत्र धोक्यात आले आहे.त्यामुळे नदीपात्रात वाळूचे लिलाव होऊ नये अशी मागणी शेवटी केली आहे.त्यामुळे आगामी काळात याबाबत जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.की आगामी काळात पुन्हा एकदा,”येरे माझ्या मागल्या…आणि ताक कण्या चांगल्या…!  म्हणण्याची तक्रारदारांवर आणि ग्रामस्थांवर वेळ येऊ नये म्हणजे कमावली !अशी चर्चा सुरू झाली आहे.

   दरम्यान कोपरगाव येथील,’माझा गाव,माझा अभिमान संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कोपरगाव नगरपरिषद अंतर्गत सुरू असलेल्या ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियान’ अंतर्गत 227 कोटींची भूमिगत गटारीचे निकृष्ट आणि सदोष काम सुरू असून त्याबाबत आपण दिनाक 20 जानेवारी रोजी आंदोलन केले होते.त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी आपल्याला कनिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून लेखी आश्वासन दिले होते.मात्र त्याला नगरपरिषद प्रशासनाने केराची टोपली दाखवली असून या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली नाही तर आपण पुन्हा एका तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा कार्यकर्ते विनय भगत यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close