शैक्षणिक
आ.डॉ.तांबे यांची…या शाळेला सदिच्छा भेट

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यातील जवळके येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयास नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ.डॉ.सुधीर तांबे साहेब यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली असता यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डी.आर सोनवणे यांनी डॉ.तांबे यांचा सत्कार केला आहे.
“कोपरगाव,जवळके तसेच चासनळी येथे सुरू केलेल्या महाविद्यालयाद्वारे तालुक्यातील अनेक विद्यार्थी घडले असून ते आज देशासह जगभरातील विविध नामांकित कंपन्या मध्ये उच्च पदावर कार्यरत असून रोहमारे परिवाराने सुरू केलेल्या या शिक्षण संस्थेमुळे नक्कीच तालुक्याच्या विकासाला चालना मिळत आहे”-आ.डॉ.सुधीर तांबे,नाशिक पदवीधर मतदार संघ.
सदर प्रसंगी डॉ. तांबे यांनी बोलतांना सांगितले की,”कोपरगाव तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात रोहमारे परिवाराचा मोलाचा वाटा असून त्यांनी तालुक्यातील गरीब विद्यार्थी,विद्यार्थिनींचे उच्च शिक्षण मिळावे या उद्देशाने कोपरगाव,जवळके तसेच चासनळी येथे सुरू केलेल्या महाविद्यालयाद्वारे तालुक्यातील अनेक विद्यार्थी घडले असून आहे. आज देशासह जगभरातील विविध नामांकित कंपन्या मध्ये ते उच्च पदावर कार्यरत असून रोहमारे परिवाराने सुरू केलेल्या या शिक्षण संस्थेमुळे नक्कीच तालुक्याच्या विकासाला चालना मिळत असल्याचे गौरवोद्गार आमदार तांबे यांनी या भेटी प्रसंगी व्यक्त केले.महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षिका यांचे शैक्षणिक कार्य बघून डॉ.तांबे यांनी समाधान व्यक्त केले आहे.