महसूल विभाग
आकारपडीत जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील-माहिती
न्यूजसेवा
संवत्सर (शिवाजी गायकवाड)
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे कोपरगांव तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांना आकारपडीत शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडातर्फे निवेदन देण्यात आले होते त्यावेळी ना.विखे यांनी निवेदनाचा स्विकार करुन हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी आमचे महायुतीचे सरकार प्रयत्नशील आहे असे आश्वासन शिष्टमंडळास दिले असल्याची माहिती हाती आली आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून आकारपडीत जमिनीचा प्रश्न प्रलंबीत आहे.खंडकऱ्यांच्या अनेक पिढ्या संपल्या तरी हा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही.महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे महसूलमंत्री झाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल अशा आशा निर्माण झाल्या असून आकारीपडीत शेतकरी संघटनेच्यावतीने त्यांना निवेदन देण्यात येवून या प्रश्नात मंत्रीमहोदयांनी लक्ष घालावे आणि वंचित असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.मंत्री विखे पाटील यांनी निवेदनाचा स्विकार करुन सदर आकारपडीत जमिनीचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयाकडून सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन शिष्टमंडळास दिले. मागील सरकारच्या काळात जे काही चुकीचे काम झाले होते ते आमच्या सरकारने दुरुस्त केले आहे.
ना. विखे पाटील यांना भेटलेल्या शिष्टमंडळात जिल्हा अध्यक्ष अनिल औताडे,सुदामराव औताडे,आकारपडीत संघर्ष समितीचे गिरिधर आसने,बाबासाहेब गोसावी,शरद आसने,बाळासाहेब आसने,सोपानराव नाईक,गोविंद वाघ,डॉ. दादासाहेब आदिक,डॉ.शंकरराव मुठे,बबनराव नाईक,विजय ताके,सुभाष गाडेकर,डॉ.विकास नवले,हरिभाऊ बांद्रे, नानासाहेब नाईक,सुनिल आसने,शिवाजी गायकवाड आदीचा समावेश होता.