निवडणूक
…या नेत्यांचा नारळ उद्या फुटणार !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील निवडणुकीने आपल्या नामनिर्देशन मागे घेतल्यानंतर आता उद्या सकाळी ०९ वाजता राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार आ.आशुतोष काळे हे आपल्या प्रचाराचा नारळ जुन्या गंगादेवी मंदिरात फोडणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष चारुदत्त शिनगर यांनी दिली आहे.

“कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे अजित पवार गटाचे उमेदवार आ.आशुतोष काळे यांचा प्रचार नारळ सकाळी ०९ वाजता जुन्या गंगेत देवी मंदिरात फुटत असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे”-चारुदत्त शिनगर,तालुकाध्यक्ष,अजित पवार राष्ट्रवादी.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत.वेगवेगळ्या पक्षांनी,उमेदवारांनी राज्यभर जोरदार प्रचार सुरू केला आहे.दरम्यान काल सोमवारी ४ नोव्हेंबर दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे प्रयत्न चालू होते.त्यात सर्वच पक्षांना काही प्रमाणात यश मिळालं आहे.तर,काही बंडखोऱांची समजूत काढण्यात नेते अपयशी ठरले आहेत.आता पुढचे काही दिवस राज्यभर केवळ प्रचार,टोकाच्या राजकीय टिका-टिप्पण्या पाहायला मिळणार आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघ त्याला अपवाद नाही.
कोपरगाव मतदार संघात सात जणांनी आपल्या तलवारी म्यान केल्या असून आता विद्यमान आमदार आशुतोष काळे यांचेसह बारा जण रणांगणात उरले आहेत.पारंपरिक विरोधक माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी आपली तलवार आधीच म्यान केल्याने आता कोपरगाव विधानसभा मतदार संघात विद्यमान दोन राष्ट्रवादीत सामना रंगत आहे.त्यात अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे विरुध्द शरद पवार गटाचे उमेदवार संदीप वपें असा सामना रंगणार आहे.सोबत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे हेही आपले नशीब आजमावत आहेत.त्याचा प्रचार नारळ फुटत असून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन चारुदत्त शिनगर यांनी शेवटी केले आहे.