मनोरंजन
डॉ.मेहता कन्या विदयालयाचा चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल शतप्रतिशत
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मुंबई येथील महाराष्ट्र शासन कला संचलनालया मार्फत घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा इलेमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षा २०१९ चा निकाल नुकताच जाहीर झाला असुन विदयालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
या परीक्षेत ‘अ’ श्रेणी मध्ये एकुण २ विदयार्थीनी, ‘ब’, श्रेणी मध्ये २४ विदयार्थीनी व ‘क’, श्रेणी मध्ये ७४ विदयार्थीनी यश संपादन केले ‘अ’ श्रेणी मध्ये विशेष प्राविण्यासह-कु.पंडोरे अनुष्का,सातव प्राजक्ता तसेच ‘ब’ श्रेणी मध्ये- कु चव्हाण मृण्मयी,गायकवाड भूमी,हंडी श्रद्धा,जाधव आरती,जाधव संजना,मोरे पल्लवी,मोरे मयुरी,बोरूडे नेहा,भुजबळ ऋतुजा,दाभाडे उन्नती,गाडेकर प्राजक्ता,जंगम सृष्टी,केकाण साक्षी,मोरे प्रतिक्षा,पंडोरे प्रांजल,सहाणे श्रृतिका,सांबारे कुमुद,सोनवणे तनया,शेख मिसबा,शिंदे शुभांगी,टपाल अमृता,उदावंत श्रेया,वाबळे संस्कृती,वायकर साक्षी आदी विदयार्थीनीनीं यश संपादन केले आहे.या विदयार्थिनीना कला शिक्षक प्रवीण निळकंठ व अमोल निर्मळ यांचे मार्गदर्शन लाभले होते.
सदर विदयार्थिनीचे स्थानिक स्कुल कमिटी व सल्लागार समिती सदस्य ,प्राचार्या मंजुषा सुरवसे ,उपमुख्याध्यापक नानासाहेब नळे , पर्यवेक्षक मंगला राजेभोसले व गोऱ्हे अरूण आदींनी अभिनंदन केले आहे.