रंगीला चित्रपट फेम प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना बुधवारी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण बुधवारी काँग्रेसच्या मिलिंद देवरा, संजय निरुपम आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना पक्षाकडून दिल्लीला बोलवण्यात आलं आहे. त्यामुळे उद्या उर्मिला मातोंडकर काँग्रेस पक्षात प्रवेस करतील अशीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, उत्तर मुंबई उमेदवारीसाठी उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा पक्ष विचार करत असल्याचं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे.
उत्तर मुंबई लोकसभा भाजपाकडून या आधीच गोपाळ शेट्टी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आता काँग्रेस उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा करत असल्य़ाचं सांगण्यात येत आहे. उर्मिला मातोंडकर यांचा काॅग्रेस प्रवेश करून तिकीट देण्यासाठी काॅग्रेस पक्षाच्या हालचाली सुरू झाला असल्याचंही सांगण्यात येत आहे. पण याच मतदार संघातून आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे या उमेदवारीसाठी आग्रही आहे अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.