कोपरगाव शहर वृत्त
‘पांडुरंग सावली’ उपक्रम,शहराच्या वैभवात भर घालणारा-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील निवारा उपनगरात असलेला,’पांडुरंग सावली’ या बहुउद्देशीय सभा मंडप हा निवारासह शहर परिसराच्या सौंदर्यात भर घालणारा असून सदा सर्वकाळ या सभा मंडपाद्वारा नगरवासियांना सावली मिळणार असल्याचे प्रतिपादन कुंभारी येथील महंत राघवेश्वरानंद महाराज यांनी नुकतेच केले आहे.
“निवारा उपनगरात आपण १९८४ मध्ये १० बाय १० चा गाभारा बांधला त्यात महादेवाच्या पिंडीची प्राणप्रतिष्ठा करून तत्कालीन भजनी मंडळाने धार्मिक वातावरण तयार केले.दररोज होणाऱ्या धार्मिक सोपस्कारामुळे निवारा परिसरात धार्मिकतेचा सुगंध ३८ वर्षानंतर ही दरवळत असून त्यात कांतीलाल जोशिंच्या दातृत्वाने या परिसराला पूर्णत्व आले आहे”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,समता,नागरी सहकारी पतसंस्था,कोपरगाव.
कोपरगाव शहरातील गुळाचे व्यापारी व समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक कांतीलाल हरलाल जोशी यांच्या देणगीतून निवारा परिसरातील महादेव मंदिर व हनुमान मंदिर येथे साकार झालेले पांडुरंग सावली या सभा मंडपाचे लोकार्पण कुंभारी येथील महंत राघवेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.त्या वेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक चांगदेव शिरोडे,व्यापरी बद्रीनाथ डागा,बाळासाहेब बजाज,जेष्ठ नागरिक संघाचे विजय बंब,पदाधिकारी,श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या अध्यक्षा पुष्पलता सुतार,कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमॅन असोसीएशनचे अध्यक्ष युवराज गांगवे,नगरसेविका दिपा गिरमे,निवारा परिसरातील लक्ष्मीनारायण भट्टड,सुरेंद्र व्यास,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान यावेळी ९६ दिवसात पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल निवारा परिसरातील ह.भ.प.बाळकृष्ण महाराज सुरासे व बापूसाहेब इनामके आदींसह सेवानिवृत्त शिक्षक,विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविणारे नागरिक,जेष्ठ आदींचा समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओंमप्रकाश कोयटे,माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे आदींच्या सत्कार करण्यात आला आहे.त्यावेळी ह.भ.प.विकास महाराज गायकवाड यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते.त्यांनी कोयटे दांपत्याच्या कार्याचे कौतुक केले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहासिनीं कोयटे यांनी केले तर सुत्रसंचालन अनंत बर्गे यांनी केले आहे.सदर कार्यक्रम सोहळा यशस्वीतेसाठी समता पतसंस्था,महादेव मंदिर व्यवस्थापन समिती,निवारा भजनी मंडळाचे पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.तर उपस्थितांचे आभार कोपरगाव नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती जनार्दन कदम यांनी मानले आहे.