जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
मनुष्यबळ विकास

कोपरगावातील…या महाविद्यालयांत कार्यशाळा संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.जे.सोमैया महाविद्यालयात बी.सी.ए.व पुणे येथील रुबिकॉन स्किल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ ते १६ मार्च रोजी चार दिवसीय,’सॉफ्ट स्किल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’ या कार्यशाळेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.या कार्यशाळेत संभाषण कौशल्य,मुलाखतीची तयारी,ग्रुप डिस्कशन,ई-मेल रायटिंग या विषयावर विविध मान्यवरांचे मार्गदर्शन प्राप्त झाले आहे.

प्रत्येक व्यक्ती जन्मतः वेगळी आणि विशेष आहे.प्रत्येकामध्ये एक वेगळी खासियत आहे जिच्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे असतो.हा वेगळेपणाच ठरवतो कि आपण कोण आहोत कसे आहोत आणि एखाद्या परिस्थितीत आपण कसे वागतो.बहुतेकवेळा ज्या विशेषतांमुळे आपले नुकसान होते त्यांच्या प्रती आपण जागृत असायला हवे तरच आपल्या आंतरिक शक्तींचा विकास होताना दिसतो त्यासाठीच अशा कार्यशाळांची गरज आहे त्यासाठी सोमैय्या महाविद्यालयाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.त्यास चांगला प्रतिसाद लाभला आहे.

या चर्चासत्राचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे,विश्वस्त संदीप रोहमारे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस. यादव यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.सदर प्रसंगी प्रो.डॉ.विजय ठाणगे,प्रा.रईस शेख,प्रा.पंकज पाटील यांच्यासमवेत बी.सी.ए. विभागातील बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते.

कार्यशाळेचे मार्गदर्शक मिर्झा अर्शद बेग यांनी रुबिकॉन स्किल डेव्हलपमेंटची कार्यपद्धती समजून सांगतांनाच उपस्थित विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्य,ग्रुप डिस्कशन,ई-मेल रायटिंग या विषयावर प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विस्तृत मार्गदर्शन केले आहे.

अमृत कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना,”या शाखेच्या माध्यमातुन मिळणाऱ्या रोजगाराच्या विविध संधी व त्यासाठी आत्मसात करावयाचे कौशल्य” यावर माहिती दिली आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रोहमारे यांनी शुभेच्छा देतांनाच महविद्यालयात संपन्न होत असलेल्या विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे कौतुक केले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी प्रास्तविक करताना,”बी.सी.ए.विभागाचे महत्व नमूद करतांनाच रोजगार उपलब्धतेसाठी संभाषण कौशल्य आत्मसात असणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
या प्रसंगी सूत्रसंचालन प्रो.डॉ.विजय ठाणगे यांनी केले आहे तर प्रा.रईस शेख,प्रा.पंकज पाटील यांनीं उपस्थितांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close