जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
भारतीय रेल्वे

शेतकऱ्यांच्या समस्या सोडण्यास अग्रक्रम -…या नेत्याचे आश्वासन 

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या रेल्वेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयात दुपारी ०२ वाजता खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली आहे.त्यानंतर त्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थळ पाहणी करण्याचे आदेश देऊन तक्रारी निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत.

"रेल्वेच्या आधुनिकिरणाचे काम सुरू असून त्याचा वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी उपयोग होणार आहेच.पण शेतकऱ्यांच्या कमाल पातळीवर जाऊन समस्या सोडवणे गरजेचे आहे यावर भर दिला आहे. व आगामी काळात यासमस्या सोडवण्यासाठी पुन्हा एक बैठक घेण्यात येणार आहे"-खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी लोकसंभा मतदार संघ.

भारतीय रेल्वेने आपले आधुनिकिरण करण्याचे धाडसी काम वेगाने सुरू केले आहे.विशेषता मेट्रो मार्गाचा विस्तार आणि त्यावर वाढविण्यात येणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात येत आहे.त्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेग वाढून खर्च कमी होत आहे.त्यामुळे राज्यासह देशात वंदे भारत,आणि तत्सम मेट्रो गाड्यांचे स्वागत होत आहे तर दुसरीकडे रेल्वेचा वेग वाढविण्याच्या नादात रेल्वे मार्गांना झपाट्याने रेल्वे संरक्षक कठडे (बॅरिकेट) बसविण्यासाठी व भुयारी मार्ग काढण्याच्या कामास वेग आला असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.मात्र यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून हा रेल्वेमार्ग जात आहे त्यांना विचारात घेताना दिसत नाही.परिणामस्वरूप त्यांच्या शेतात जाण्याचे मार्ग बंद होताना दिसत आहे.काही ठिकाणी अद्याप भुयारी मार्ग तयार झालेले नाही.त्यामुळे नागरी वस्तीचे थेट विभाजन होऊन त्यांच्यात संपर्क तुटत आहे.अशीच अवस्था कोपरगाव,राहाता,श्रीरामपूर,राहुरी तालुक्यात होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी मोठे अडथळे निर्माण झाले आहे.त्यातून मार्ग काढण्यासाठी मागील महीण्यात शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुणे रेल्वे विभागाचे अधिकारी यांचे उपस्थितीत शिर्डीत बैठक घेऊन खिर्डी गणेश,बोलकी,आचलगाव,संवत्सर (लक्ष्मणवाडी) येथील स्थळ पाहणी केली होती.त्यानुसार काल १३ ऑगस्ट रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते.

दरम्यान काल खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीची पाहणी आज सकाळी कोपरगावचे  तहसीलदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी रेल्वे,जलसंपदा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ०७ गावांपैकी संवत्सर येथे स्थळ पाहणी केली असून तेथील ०४ प्रकरणांचा अभ्यास करून सर्वसंमतीने तोडगा काढला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

  सदर प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदय राजेश परजणे,उबाठा शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,राष्ट्रवादीचे प्रवक्ते संदीप वर्पे,मुकुंद सिनगर,शिवसेनेचे शहराध्यक्ष सनी वाघ,विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष किरण खर्डे,तालुकाध्यक्ष गंगाधर रहाणे,संजय दंडवते,कोपरंगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी,नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते,चंद्रशेखर कुलथे,संवत्सर ग्रामपंचायतचे उपसरपंच विवेक परजणे,धर्मा जावळे, कोपरगाव रेल्वे उपविभागाचे अनुज शुक्ला,श्री मिश्रा,सेनेचे कार्यकर्ते इरफान शेख, तानाजी लामखडे,महेश परजणे आदींसह कोपरगाव,संबधित येवला येथील पालखेड पाटबंधारे डावा कालवाचे कार्यालयाचे निर्णयक्षम अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,मंडळ अधिकारी,तलाठी उपस्थित होते.

  त्यावेळी खा.वाकचौरे यांनी अंचलगाव,खिंडी गणेश,संवत्सर,वारी,शिंगवे,धनगरवाडी,येलमवाडी पुणतांबा शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत व महसूल,रेल्वे,जलसंपदा विभागाला समक्ष भेटी देऊन मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.

  त्यावेळी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी रेल्वेच्या आधुनिकिरणाचे काम सुरू असून त्याचा वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी उपयोग होणार आहेच.पण शेतकऱ्यांच्या कमाल पातळीवर जाऊन समस्या सोडवणे गरजेचे आहे यावर भर दिला आहे. व आगामी काळात यासमस्या सोडवण्यासाठी पुन्हा एक बैठक घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.दरम्यान संवत्सर येथील गावअंतर्गत वाद वगळता बैठक शांततेत पार पडली आहे.शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

  दरम्यान काल खा. वाकचौरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीची पाहणी आज सकाळी कोपरगावचे  तहसीलदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी रेल्वे,जलसंपदा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ०७ गावांपैकी संवत्सर येथे स्थळ पाहणी केली असून तेथील ०४ प्रकरणांचा अभ्यास करून सर्वसंमतीने तोडगा काढला आहे.तर सोमवारी कोपरगाव मंडळ आणि मंगळवारी वारी कान्हेगाव येथील तक्रारींचा निपटारा करणार असल्याची माहिती नायब तहसीलदार सातपुते यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close