भारतीय रेल्वे
रेल्वे अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी!

न्युजसेवा
संवत्सर (प्रतिनिधी)
नव्याने जाहीर जाहीर झालेल्या पुणे विभागांतर्गत दौंड-मनमाड दुहेरी रेल्वे मार्गावर दोन्ही बाजूंनी संरक्षण व्यवस्था बसविण्यात आल्याने शेतकरी,ग्रामस्थ आणि त्यांचे शेत रस्ते बंद झाल्याने मोठी कोंडी निर्माण झाल्याचे पार्श्वभूमीवर खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच पुणे विभागातील रेल्वे अधिकाऱ्यांचा दौरा आयोजित केला होता.त्यात कोपरगाव तालुक्यातील संवत्सरसह अन्य गावांचा दौरा संपन्न झाला असून त्यावर मार्ग काढण्यासाठी आगामी महिन्यात दि.१३ ऑगस्ट रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात बैठक आयोजित केली असल्याची माहिती खा.वाकचौरे यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने दिली आहे.

खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत पुणे रेल्वे विभागाचे सेफ्टी ऑफिसर देवेंद्रकुमार यांनी नुकतीच कोपरगाव तालुक्यात भेट दिली असून त्यावेळी त्यांनी प्रामुख्याने आचलगाव,खिर्डी गणेश,संवत्सर,पुंणतांबा,पढेगाव,कान्हेगाव,लाडगाव,पढेगाव येथील भूमिगत रस्त्याची आवश्यकता असलेल्या ठिकाणी समक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.
शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या रेल्वेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व प्रत्यक्ष पाहणी करणेसाठी दिनांक १९ जुलै रोजी रेल्वेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे प्रमुख उपस्थितीत भेट दिली असून त्यात सेफ्टी ऑफिसर देवेंद्रकुमार यांचा समावेश होता.त्यावेळी त्यांनी प्रामुख्याने आचलगाव,खिर्डी गणेश,संवत्सर,पुंणतांबा,पढेगाव,कान्हेगाव,लाडगाव,पढेगाव येथील भूमिगत रस्त्याची आवश्यकता असलेल्या ठिकाणी समक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.ज्या ठिकाणी त्यांचे पातळीवर शक्य होईल त्या ठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.संपूर्ण भारतभर हे बॅरिगेट लावलेले असून सर्वच ठिकाणी अडचणी असल्याची माहिती सांगितली असून हा धोरणात्मक भाग असल्याचे सांगितले आहे.तरीही त्यावर खा.वाकचौरे यांनी कोपरगांव तालुक्यातील वरील गांवाच्या नागरिकांची १३ ऑगस्ट २०२५ रोजी कोपरगांव तहसिल कार्यालयात यावर काय उपाय करता येईल त्या संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केलेली असून या बैठकीसाठी नागरिकांनी दुपारी २ वाजतां बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन शेवटी केले आहे.

सदर प्रसंगी संवत्सर ग्रामपंचायतचे उपसरपंच विवेक परजणे,ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे,लक्ष्मणराव परजणे,शिवाजी गायकवाड,गणेश साबळे,बबनराव परजणे,बाळासाहेब दहे, कैलास सोनवणे,राजेंद्र भोकरे,राजेंद्र रानोडे, कडलग,रमेश भोकरे,बाबुराव मैंद,अनिल परजणे,झाडगे,बापूराव परजणे,नंदू परजणे, अनिल रोहोम,सतिष भारुड,उध्दव ससाणे, किरण ससाणे,लक्ष्मणवाडी येथील ग्रामस्थ यांचेसह परिसरातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.त्यामुळे रेल्वेनाजिकच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.