भारतीय रेल्वे
…या रेल्वे स्थानकावर दीर्घ पल्ल्याच्या गाड्या थांबवा-मागणी

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
कोपरगाव रेल्वे स्थानकावर अनेक गाड्यांचा थांबा बंद केल्याने शिर्डीच्या साईनाथांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याने सदर स्थानकावर पूर्ववत थांबा सुरू करावाअशी मागणी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचेकडे नुकतीच केली आहे.

दरम्यान मागणी केलेल्या गाडीचे नाव आणि तिचा क्रमांक दर्शवला आहे.काकीनाडा एक्सप्रेस 17205 / 17206,सिकंदराबाद एक्सप्रे-17001 / 17002,विजयवाडा एक्सप्रेस-17207 / 17208,कामायनी एक्सप्रे-22455 / 22456,पाटलीपुत्र एक्सप्रेस-22223 / 22224 आदींचा समावेश आहे.

देशात आणि राज्यात रेल्वेची गरज अनेक पातळ्यांवर आहे,ज्यात प्रवासासाठी,मालवाहतुकीसाठी,आर्थिक विकासासाठी आणि सामाजिकदृष्ट्या एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.रेल्वे ही एक जलद,सुरक्षित आणि किफायतशीर वाहतुकीचे साधन आहे,जी लाखो लोकांना दररोज प्रवास करण्यासाठी मदत करते.रेल्वे देशभरात प्रवास करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे,जी लोकांना दूरच्या ठिकाणी सहजपणे पोहोचायला मदत करते.या शिवाय रेल्वे प्रवास इतर वाहतूक साधनांपेक्षा तुलनेने अधिक आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर आहे.रेल्वे प्रवास रस्ते किंवा हवाई प्रवासापेक्षा अधिक सुरक्षित मानला जातो,कारण रेल्वे मार्गावर अपघात होण्याची शक्यता कमी असते.त्यामुळे या रेल्वेची मागणी मोठी असते.त्यातले त्यात साईबाबांची शिर्डी नजीक असल्याने व पूर्वीपासून याच ठिकाणी थांबा असल्याने या ठिकाणी मोठी रेल्वे प्रवाशांची गर्दी असते.मात्र अलीकडील काळात शिर्डीचे वादातीत महत्व वाढले आहे.परिणामी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने या मार्गावरील रेल्वे कोपरगाव स्थानकावर थांबण्याचे प्रमाण कमी झाले आहे.परिणामी प्रवाशी,साईभक्त,उद्योजक,व्यापारी आदींना या मुळे मोठी गैरसोय झाली आहे.मात्र याबाबत व्यापारी महासंघाने खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे लक्ष वेधून घेतले आहे.व त्यांनी कोपरगाव येथील रेल्वे स्थानकाचा जलद गाड्यांचा थांबा पूर्ववत सुरुवात करावा अशी महत्वपूर्ण मागणी केली आहे.
दरम्यान या निवेदनावर व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष व कोपरगाव तालुका रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुधीर एस.डागा यांनी स्थानक प्रमुख भैरव प्रसाद यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे.या निवेदनाच्या प्रती कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे आणि कोपरगाव रेल्वे विभाग प्रमुख,अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

मागणी केलेल्या गाडीचे नाव आणि तिचा क्रमांक दर्शवला आहे.काकीनाडा एक्सप्रेस 17205 / 17206,सिकंदराबाद एक्सप्रे-17001 / 17002,विजयवाडा एक्सप्रेस-17207 / 17208,कामायनी एक्सप्रे-22455 / 22456,पाटलीपुत्र एक्सप्रेस-22223 / 22224 आदींचा समावेश आहे.दरम्यान या मागणीला कोपरगाव येथील विविध व्यापारी संघटना,रिक्षा संघटना आणि स्थानिक नागरीकांनीही आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे.