जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

कोपरगावात गंगागिरीजी महाराज महाविद्यालयातर्फे…याचा यांचा सत्कार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील श्री सद्गुरू गंगागीरिजी महाराज महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य संदीप वर्पे यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झालेबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला आहे.

दि.३१ जुलै रोजी सातारा येथे पार पडलेल्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.त्यांच्या निवडीबद्दल महाविद्यालयातील सर्व रयत सेवकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.त्या निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

सदर प्रसंगी महाविद्यालयाच्या कला विभागाचे उपप्राचार्य प्रो.डॉ.सुभाष रणधीर,परीक्षा अधिकारी डॉ.देविदास रणधीर,रजिस्टार सुनील ठोंबरे,कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप यांच्या हस्ते वर्पे यांचा सत्कार संपन्न झाला.यावेळी प्राचार्य डॉ.सानप यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close