पुरस्कार,गौरव
अखिल भारतीय आयुर्वेद महाअधिवेशनात डॉ.आव्हाड यांचा गौरव

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन येथे अखिल भारतीय आयुर्वेदाचे ५९ वे महाधिवेशन नुकतेच संपन्न झाले असून यात कोपरगाव येथील राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ.रामदास आव्हाड यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आला आहे.त्या बाबत कोपरगाव सह राज्यभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
सदर प्रसंगी पंजाब आयुर्वेद सलाहकार डॉ.राकेश शर्मा यांची अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे नूतन अध्यक्ष म्हणून तर डॉ.रामदास आव्हाड यांची महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन अध्यक्ष म्हणून सर्वानुमते पुन्हा फेरनिवड करण्यात आली आहे.राष्ट्रीय स्तरावर डॉ.आव्हाड यांच्या कार्याची दखल वेळोवेळी घेतली जात असून हि गोष्ट कोपरगावकरांसाठी गौरवास्पद मानली जात आहे.
अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे उदघाटन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज चौहान,राज्यपाल मंगुभाई पटेल,आयुषमंत्री,उच्च शिक्षणमंत्री,महासंमेलन अध्यक्ष पद्मभूषण डॉ.देवेंद्र त्रिगुणाजी सह अनेक उच्चपदस्थ यावेळी उपस्थित होते.चार दिवस चाललेल्या या अधिवेशनात काही निवडक प्रसिद्ध वैद्यांची आयुर्वेदावर व्याख्याने संपन्न झाली आहेत.
कोपरगाव येथील आयुर्वेदाचार्य व महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन अध्यक्ष डॉ.रामदास आव्हाड यांचे “पंचकर्म एक वज्रास्त्र” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले आहे.सम्पूर्ण भारतातून आलेल्या वैद्य गणासमोर डॉ.आव्हाड यांना सन्मानित करण्यात आले आहे.प्रदेश संमेलन अध्यक्ष म्हणून केलेल्या लक्षवेधी कार्याबद्दलही त्यांचा आयुर्वेद संशोधन अनुसंधाचे अध्यक्ष डॉ.नारायण आचार्य यांचे हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.आयुर्वेदाचे भविष्य उज्वल असल्याचे राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या वक्तव्यातून व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री चौहान व अन्य सर्व वक्त्यांनी आयुर्वेदाबद्दल गौरवोद्गार काढले.यावेळी पंजाब आयुर्वेद सलाहकार डॉ.राकेश शर्मा यांची अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे नूतन अध्यक्ष म्हणून तर डॉ.रामदास आव्हाड यांची महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन अध्यक्ष म्हणून सर्वानुमते पुन्हा फेरनिवड करण्यात आली आहे.राष्ट्रीय स्तरावर डॉ.आव्हाड यांच्या कार्याची दखल वेळोवेळी घेतली जात असून हि गोष्ट कोपरगावकरांसाठी गौरवास्पद मानली जात आहे .