जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

सिनेसृष्टीचा प्रवास खडतर-…या अभिनेत्याची कबुली

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
   
   नागरिकांना सिनेसृष्टीमध्ये जे ग्लॅमर झगमगाट दिसतो त्यावर मोहित होवून या क्षेत्राची निवड करू नका.कुठल्याही क्षेत्रापेक्षा या क्षेत्रातील प्रवास जरा जास्तच खडतर असल्याची कबुली प्रसिद्ध सिने अभिनेते प्रसाद ओक यांनी कोपरगाव येथे बोलताना दिली आहे.

“आपल्या देशातील तरुणाईच्या अलौकिक बुद्धिमत्तेवर व ज्ञानावर आपला देश महासत्ता होणार आहे.माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी आपला देश महासत्ता होण्याचे स्वप्न पहिले आहे.देशाला महासत्ता करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.


      कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ईयत्ता १० वी १२ वीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविलेल्या गुणवंतांचा व त्यांच्या पालकांचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते व प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

  सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक मंडळ,पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा.जी.प.प.स.सदस्य,माजी नगरसेवक,कार्यकर्ते,विद्यार्थी,शिक्षक व पालक बहूसंख्येने उपस्थित होते.

कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शालांत परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेली विद्यार्थिनी कु.तेजस्विनी औताडे हिचा तिची आई सोनाली दिपक औताडेसह सत्कार करताना प्रसिद्ध सिनेअभिनेते प्रसाद ओक दिसत आहे. 

    त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”ज्याप्रमाणे दहावी बारावीच्या पेपर वर पुढचे आयुष्य अवलंबून असते त्याप्रमाणे मुलांना काय वाटतं,कशात करिअर करावं व त्यांचा कल काय आहे ? हे पालकांनी बघणं महत्त्वाचं आहे त्यामुळे पालकांनी मुलांच्या मागे न लागता त्यांच्या उद्देशाच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे.माझ्या पाठीमागे माझे पालक उभे राहिले म्हणून मी तुमच्यापुढे उभा आहे.शिक्षक,आई वडील यांना गुरु मानून त्यांच्या प्रती आयुष्यभर श्रद्धा ठेवा तुम्हाला नक्की यश मिळणार.दहावी आणि बारावी हा आपल्या कारकिर्दीचा करिअरचा पाया असतो.तुमच्या कुटुंबाला तुमच्या शाळेला तुमच्या गावाला तुमचा नितांत अभिमान वाटेल अशी कामगिरी करा असे आवाहन करून त्यांनी आयोजक आ.काळे यांच्या कार्याचे शेवटी प्रसाद ओक यांनी कौतुक केले आहे.

   सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे म्हणाले की,”आपल्या देशातील तरुणाईच्या अलौकिक बुद्धिमत्तेवर व ज्ञानावर आपला देश महासत्ता होणार आहे.माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी आपला देश महासत्ता होण्याचे स्वप्न पहिले आहे.देशाला महासत्ता करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.त्यामुळे आपण यापुढील काळात ज्या क्षेत्रात काम करणार आहात त्या क्षेत्रात आपल्या बुद्धीमत्तेचा व ज्ञानाचा उपयोग देश महासत्ता होण्यासाठी करा.गुणवंतांच्या यशामध्ये सर्व पालकांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे देखील मोठे योगदान असून ते देखील अभिनंदनास पात्र आहेत.दहावी बारावी हि जीवनाची सुरुवात असून या वयामध्ये अनेक मन विचलित करणाऱ्या बाबी असतात यामध्ये सोशल मीडियाचा देखील मोठा वाटा आहे.मात्र कुठल्याही प्रकारचे बंधन नसतांना देखील गुणवंतांनी आपल्या मनाला आवर घालून मिळविलेले यश निश्चितपणे अभिमानास्पद आहे.भावी जीवनात देखील अशा मन विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहून यश संपादित करा व आपले उज्वल भविष्य घडवा. शिकून मोठे जरूर व्हा त्याच बरोबर या देशाचा आदर्श नागरीक होवून देशाच्या प्रगतीसाठी आपल्या अलौकिक बुद्धीचा उपयोग करा व आपल्या कोपरगावचे व आपल्या पालकांचे नाव उज्वल करा असे आवाहन आ.काळे यांनी शेवटी केले आहे.

    सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक पद्मकांत कुदळे यांनी केले तर सूत्रसंचालन कृष्णा आढाव यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार संचालक अरुण चन्द्रे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close