जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

धर्माला राजाश्रय दिल्यानेच मतदार संघाचा विकास-काशिकानंद महाराज

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
   
  
   शिर्डी लोकसभा मतदार संघातील माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे कार्य नक्कीच समाजाला दिशादर्शक असून त्यांनी मतदार संघात केलेले कार्य आजही पथदर्शी असून त्यांनी धर्माला राजाश्रय दिला होता त्यामुळे मतदार संघात मोठा विकास होवू शकला असल्याचे प्रतिपादन शिर्डी येथील संत ज्ञानेश्वर आश्रमाचे महंत काशिकानंद महाराज यांनी नुकतेच शिर्डी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

शिर्डी येथील साई अर्पण संस्थेमार्फत आयोजित कार्यक्रमात बोलताना शिर्डी येथील संत ज्ञानेश्वर आश्रमाचे महंत काशिकानंद महाराज दिसत आहे.

   

“माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी उत्तर अ.नगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पासाठी दिल्लीतील केंद्रीय जलआयोगाच्या सतरा पैकी चौदा मान्यता मिळविण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीला बरोबर घेऊन मोठे योगदान दिले आहे.वर्तमान राजकीय व्यवस्था बे-भरवशाची झालेली असताना त्यांनी राजकीय व्यवस्थेवर विश्वास निर्माण करण्यासाठी मोलाची भूमिका निभावली आहे.त्याचा त्यांना आगामी काळात नक्कीच लाभ होणार आहे”-अड्.अजित काळे,उपाध्यक्ष,प्रदेश शेतकरी संघटना.

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी स्थापन केलेल्या साई अर्पण फौंडेशनच्या वतीने शिर्डी लोकसभा मतदार संघातील साधू,संत,किर्तनकार,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,आदर्श अंगणवाडी सेविका आदी मान्यवरांचा सत्कार आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.

  

सदर प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे हे दिसत आहे.

“शेतकरी राजा असून त्यांने संप केला तर चालणार नाही आणि तो कोणालाही परवडणारा नाही.त्यावेळी प्रभू रामचंद्रांचे वनवासात जाण्याचे उदाहरण देऊन सत्ताधारी वर्गाने समाजभान ठेवणे राज्यकर्त्यांसह प्रत्येक समाजघटकांचे काम आहे.’शेतकऱ्यांनी पिकवले नाही आणि पिकू द्यायचे नाही’ असे ठरवले तर किती अनर्थ होईल म्हणून त्यांच्या दुःखाला दाद द्यावी लागेल”-सरला दिदी,ओम शांती ओम,कोपरगाव.

सदर प्रसंगी श्रीक्षेत्र कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमाचे सार्थकानंद महाराज,राजनंदगिरीजी महाराज,लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे,टाकळीभान येथील फटांगरे महाराज,कैलास महाराज दुशिंग,लहानु महाराज दादू,श्रीरामपूर येथील कृष्णानंद महाराज,ओम शांतीच्या सरला दिदी,चैताली दीदी,प्रदेश शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,’झी’ वाहिनीवरील लिटल स्टार गायक गौरी पगारे,मेजर महेन्द्र सोनवणे,वसंतदादा मल्टिस्टेट बँकेचे अध्यक्ष मुकुंद शिनगर,अंगणवाडी सेविका संघटनेच्या सौ.वाकचौरे,माजी खा.वाकचौरे यांच्या धर्मपत्नी सरस्वती वाकचौरे,रोहित वाकचौरे,अंगणवाडी संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्ष सुमनताई सप्रे,खंडेराव महाराज पठारे,आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक,महिला उपस्थित होत्या.

    त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”माजी खा.वाकचौरे यांनी शिर्डी येथील साईबाबा संस्थांनच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले आहे.त्यांनी वारकरी संप्रदायाची मोठी सेवा केली आहे.सप्ताह काळात महाप्रसादासाठी त्यांनी संस्थानच्या माध्यमातून अनेक संस्था आणि ग्रामस्थांना मदत केली आहे.मतदार संघातील,सर्व देवस्थानाची ५५० सामाजिक मंदिरे आणि कामे करुन मोठे धार्मिक कार्य केले आहे.त्यांनी आधी जाहीर करून त्यांना मिळणारे वेतन स्वतः घेतले नाही तो सर्व देवस्थानांना दिला आहे.हा त्याग नक्कीच लक्षवेधी आहे.त्यामुळे त्यांची किर्ती देशात सर्वदूर पोहचली आहे.त्यांच्यासारख्या नेत्यांची गरज मतदार संघालाच नाही तर आज देशाला आहे.धर्माला राजआश्रय ज्यावेळी दिला जातो त्यावेळी त्या धर्माचा विकास समाजाची भरभराट होते.मतदार संघात त्यांनी केलेले कार्य जनतेच्या कायम स्मरणात राहील असा विश्वास व्यक्त केला आहे.त्यांनी मतदार संघातील समाजकार्य करताना त्यांनी धर्म कार्य मोठ्या प्रमाणावर केले आहे.शिर्डी हे तीर्थक्षेत्र पंढरपूरशी जोडले असल्याचे पाहून मोठे धार्मिक कार्य केले असल्याचा दावा त्यांनी शेवटी केला आहे.

   सदर प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी म्हटले आहे की,”माजी खा.वाकचौरे व माझा संबंध लोकसभा कालावधी संपल्यावर आला त्यात त्यांनी उत्तर अ.नगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्प आणि कालव्यांसाठी दिल्लीतील केंद्रीय जल आयोगाच्या सतरा पैकी चौदा मान्यता मिळविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.वर्तमान राजकीय व्यवस्था बे-भरवशाची झालेली असताना त्यांनी राजकीय व्यवस्थेवर विश्वास निर्माण करण्यासाठी मोलाची भूमिका निभावली आहे.न्याय व्यवस्थेत सामान्यांच्या मागणीला मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण होतात.पण माजी खा.वाकचौरे यांनी निळवंडे प्रकल्पासाठी कालवा कृती समिती बरोबर काम करून मोलाची भूमिका निभावली आहे.हि माहिती निळवंडे कालवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी गावोगाव सांगितली आहे.वर्तमान काळ शेतकऱ्यांसाठी प्रतिकूल ठरत असून राज्यात ०२ हजार ५०० वर तर  रोज साधारण ०८ आत्महत्या होत असताना संतांनी शेतकऱ्यांच्या व्यथांना न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.आज दिल्लीत शेतकरी आपल्या शेतमालाला किमान आधारभूत किंमतीसाठी मोठा लढा देत असून राज्यातील शेतकऱ्यांनी पेटून उठण्याची गरज निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे.श्रीरामपूर येथील ‘ट्रॅक्टर रॅली’त शेतकऱ्यांनी मोठे योगदान दिले असल्याचे सांगून या लढ्यात रामदास स्वामी सारखी भूमिका साधू संतांनी निभावणे गरजेचे बनले आहे.व हा गंभीर प्रश्न केंद्र व राज्य सरकारमधील राज्यकर्त्यासमोर आणणे गरजेचे आहे.माजी खा.वाकचौरे यांनी आपल्या कामातून मोठी किर्ती निर्माण केली आहे.कोणत्याही नेत्याला समाज कामाच्या माध्यमातून लक्षात ठेवतो.त्यात माजी खा.वाकचौरे यांचे काम प्रामाणिक आहे.ते जमिनीवर चालणारे व जनतेच्या समस्यांची जाण असलेले नेते असून आगामी काळात संपन्न होणाऱ्या निवडणुकीत नक्कीच ते यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

   सदर प्रसंगी सरला दिदी बोलताना म्हणाल्या की,”शेतकरी राजा असून सर्वांनी संप केला तर चालेल पण शेतकऱ्यांनी केलेला संप चालणार नाही आणि तो कोणालाही परवडणारा नाही.त्यावेळी प्रभू रामचंद्रांचे वनवासात जाण्याचे उदाहरण देऊन सत्ताधारी वर्गाने समाजभान ठेवणे राज्यकर्त्यांसह प्रत्येक समाजघटकांचे काम आहे.’शेतकऱ्यांनी पिकवले नाही आणि पिकू द्यायचे नाही’ असे ठरवले तर किती अनर्थ होईल म्हणून त्यांच्या दुःखाला दाद द्यावी असे सांगून राज्यकर्त्यांचे लक्ष वेधले आहे.खा.वाकचौरे यांच्या सारख्या नेत्यांची शिर्डीला गरज आहे.त्यांची समाजाच्या विकासाची मोठी तळमळ असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

   सदर प्रसंगी उपस्थित संत,महंत,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते आदींचा सन्मान चिन्ह,फेटा,शाल,हार देऊन सत्कार करण्यात आला आहे.

   सदर प्रसंगी प्रास्तविक माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री.थोरात यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार महेंद्र सोनवणे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close