जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पाणी पुरवठा,स्वच्छता विभाग

जलजीवन मिशन योजने अंतर्गत कोपरगाव तालुक्यात भूमिपूजन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

जलजीवन मिशन योजने अंतर्गत कुंभारी गावासाठी ९ कोटी २३ लाख व नाटेगावला १ कोटी १६ लाख रुपये निधी मिळाला आहे.या पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

देशातील प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी केंद्र सरकारने जल जीवन अभियानाअंतर्गत २०२१-२२ या वर्षासाठी महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत वाढ करुन तो निधी ०७,०६४.४१ कोटी इतका वाढवला आहे.२०२०-२१ मध्ये हा निधी १,८२८.९२ कोटी रुपये इतका होता.केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या निधीत चारपट वाढ करतांनाच २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरांत नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी राज्याला आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.त्यानुसार निधीत चार पट वाढ करून दिली आहे.

देशातील प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी केंद्र सरकारने जल जीवन अभियानाअंतर्गत २०२१-२२ या वर्षासाठी महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत वाढ करुन तो निधी ०७,०६४.४१ कोटी इतका वाढवला आहे.२०२०-२१ मध्ये हा निधी १,८२८.९२ कोटी रुपये इतका होता.केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या निधीत चारपट वाढ करतांनाच २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरांत नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी राज्याला आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.वर्ष २०२१-२२ साठी २,५८४ कोटी रुपये निधी १५ व्या वित्त आयोगाने शिफारस केलेल्या अनुदान स्वरूपात महाराष्ट्राला देण्यात आला.यात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थां-पंचायत राज संस्थासाठी जल आणि सार्वजनिक स्वच्छता कार्यांसाठी निधी देण्यात आला आहे.तसेच, २०२५-२६ पर्यंतच्या पाच वर्षांसाठी,ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थासाठी १३,६२८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.त्या निधीवरून कोपरगाव तालुक्यात वादंग उठले आहे.मात्र याच निधीतून हि योजना मार्गी लागली आहे.त्याचे भूमिपूजन आ.काळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी ह.भ.प.उंडे महाराज,माजी पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव आसने,माजी पंचायत समिती सदस्य श्रावण आसने,बबनराव बढे,शिवाजीराव घुले,सरपंच प्रशांत घुले,उपसरपंच दिगंबर बढे,पंचायत समिती अभियंता उत्तम पवार,शाखा अभियंता लाटे,वाघ,दिघे,सातपुते,डी.ओ. रानमाळ,ग्रामसेवक भीमराज बागुल,ठेकेदार पी.के.काळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की,”मागील अडीच वर्षात विकासाचा अनुशेष भरून काढतांना मतदार संघातील अनेक गावातील रस्ते,वीज,पाणी अशा प्रश्नांबरोबरच अनेक वर्षापासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजना मार्गी लावल्या.रस्त्यांचा विकास झाल्यामुळे व पिण्याच्या पाण्याचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे नागरिकांच्या बहुतांश अडचणी दूर झाल्या आहेत.परंतु विकास कामांबरोबरच शिक्षण देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.त्यासाठी शाळांना आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.योगायोगाने रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाची जबाबदारी आपल्याकडे आहे मीदेखील मदत करण्यास तयार असून ग्रामस्थांनी देखील शाळेसाठी वर्गणी जमा करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.त्याला प्रतिसाद देत ह.भ.प.उंडे महाराज यांनी कुंभारीच्या गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयासाठी २१ हजार रुपयांची देणगी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close