जाहिरात-9423439946
पणन

वर्तमान सभापती खुर्ची कधी सोडणार ? याकडे संचालकांचे लक्ष !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊन आता अडीच वर्षाचा कालखंड उलटून गेला असून सभापती,उपसभापतींचे आवर्तन संपले आहे.उपसभापती गोवर्धन परजणे यांनी आपला राजीनामा कधीच सोपवला असून तो मंजूरही झाला आहे.याला चार महिन्याचा कालखंड उलटला आहे.मात्र तरीही कोल्हे गटाच्या सभापतींनी अद्याप आपला राजीनामा न सोपल्याने इच्छुकांची मोठी कुचंबना होताना दिसत आहे.त्यामुळे वर्तमान सभापती साहेबराव रोहोम यांना श्रेष्ठी नारळ कधी देणार याची चर्चा तालुक्यातील शेतकऱ्यांत मोठ्या प्रमाणावर रंगली आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय.

दरम्यान काही संचालक आपल्याला वरिष्ठ पदाची संधी मिळणार नसल्याने अस्वस्थ असल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्यातून वर्तमान पदाधिकाऱ्यांनी लाखांची कामे आणि कोटींची उड्डाणे ही बऱ्याच संचालकांच्या आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात खुपत आहे.त्यांनी सीमोलोंग्घन केले तर त्यांना नाव ठेवता येणार नाही.अन्य प्रवर्गातून आणि स्वबळावर निवडून आलेले संचालक जास्त वाट पाहतील अशी शक्यता नाही.त्यामुळे नेत्याना घाम फुटण्याची शक्यता आहे.

   कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून गणल्या गेलेल्या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊन पावणेतीन वर्षाची कालखंड लोटला आहे.त्यावेळी झालेल्या निवडणुकीत एकूण 18 जागांपैकी माजी आ.कोल्हे गटाला 07 जागा तर आ.आशुतोष काळे यांचे गटाला 06 जागा तर राजेश परजणे आणि नितीन औताडे गटाला प्रत्येकी 02 जागा मिळाल्या होत्या.या पैकी काळे आणि कोल्हे गटाला एकेक व्यापारी मिळाला होता.तर हमाल मापाडी जागा ही कोल्हे गटाच्या पारड्यात पडली होती.त्यावेळी सभापती पद हे काळे आणि कोल्हे या गटांना अनुक्रमे अडीच वर्षे देण्याचे ठरले होते.त्यात पहिल्यांदा कोल्हे गटाचे निष्ठावान सहकारी साहेबराव रोहोम यांना सभापती पदाची पहिल्यांदा संधी देऊन त्यांचा गुलाल उधळला गेला होता.तर उपसभापती पद हे काळे गटाचे निष्ठावान सहकारी गोवर्धन परजणे यांना मिळाल्याने त्यांची बल्लेबल्ले झाली होती.ठरल्याप्रमाणे काळे गटाचे शिलेदार उपसभापती गोवर्धन परजणे यांनी आपला कालावधी पूर्ण झाल्याने आपल्या पदाचा राजीनामा रीतसर सभापती यांचे कडे सुपूर्त केला होता.तो आगामी सभेत लागलीच मंजूर केल्याने ते सन्मानाने पायउतार झाले होते.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवार.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार प्रश्नांकित समजला जात आहे.त्यामुळे या गोष्टीचा कधी विस्फोट होईल हे सांगता येणार नाही वर्तमानात अशी स्थिती आहे.त्यामुळे नेत्यांनी आपला ‘सेफ्टी व्हॉल्व’ आधीच मोकळा केलेला बरा अशी चर्चा अंतर्गत वर्तुळात सुरू झाली आहे.एवढेच कशाला मागील मासिक मिटिंगमध्ये काही संचालक सदर मिटिंगवर बहिष्कार टाकणार असल्याची विश्वसनीय माहिती आमच्या प्रतिनिधीच्या हाती आली होती.

   दरम्यान सभापतीपदाची मुदत संपूनही रोहोम यांनी मात्र खुर्ची सोडली नव्हती.त्यामुळे काळे आणि कोल्हे यांच्या इच्छुकांत चलबिचल न झाली तर नवल होते.त्यामुळे आता ही अस्वस्थता वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे.नेत्यापुढे कोणी बोलताना दिसत नसले तरी आपल्या अंगाखांद्यावर गुलाल उधळून घेण्याची आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सिंहासह काबीज करण्याची कोणाची इच्छा नसणार ? मात्र नेत्याना सांगायचे कोणी आणि मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी इतकाच काय तो प्रश्न शिल्लक आहे.मात्र आता आगळीक घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.विहिरीतील पाणी उपसा केले नाही तर ते थांबून थोडेच राहणार आहे.ते आपला दुसरा मार्ग शोधायला वेळ लागणार नाही हे नेत्यांनी जाणून घेण्याची गोष्ट आहे.त्यामुळे ही अनिश्चिता धोक्याची घंटा समजली जात आहे.आधीच कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार प्रश्नांकित समजला जात आहे.त्यामुळे या गोष्टीचा कधी विस्फोट होईल हे सांगता येणार नाही वर्तमानात अशी स्थिती आहे.त्यामुळे नेत्यांनी आपला ‘सेफ्टी व्हॉल्व’ आधीच मोकळा केलेला बरा अशी चर्चा अंतर्गत वर्तुळात सुरू झाली आहे.एवढेच कशाला मागील मासिक मिटिंगमध्ये काही संचालक सदर मिटिंगवर बहिष्कार टाकणार असल्याची विश्वसनीय माहिती आमच्या प्रतिनिधीच्या हाती आली होती.शिवाय अनेक ठिकाणी गरज नसताना उपबाजार मंजुरी करून त्यावर झालेली पैशाची उधळपट्टी शेतकऱ्यांच्या नजरेतून सुटलेली नाही.मात्र त्यांनी त्यावेळी योगायोगाने दम धरला हे नेत्यांच्या नशिबाने चांगले झाले असे मानण्यास जागा आहे.राजकारणात भिकेत कोणी राज्य देत नाही हे खरे आहे.त्यामुळे जो तो आपल्या संधीच्या शोधात असतो.आणि अशी संधी काळे गट अथवा अन्य गटाने उपलब्ध करून दिली तर सत्ताधारी गटाच्या हाती धुपाटणे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे ज्याचे त्याला देणे कधीही उत्तम ठरते.त्या न्यायाने नेते बोध घेतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.याबाबत आमच्या प्रतिनिधीने वर्तमान सभापती यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते होऊ शकला नाही.त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समोर आली नाही.

   दरम्यान काही संचालक आपल्याला वरिष्ठ पदाची संधी मिळणार नसल्याने अस्वस्थ असल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्यातून वर्तमान पदाधिकाऱ्यांनी लाखांची कामे आणि कोटींची उड्डाणे ही बऱ्याच संचालकांच्या आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात खुपत आहे.त्यांनी सीमोलोंग्घन केले तर त्यांना नाव ठेवता येणार नाही.अन्य प्रवर्गातून आणि स्वबळावर निवडून आलेले संचालक जास्त वाट पाहतील अशी शक्यता नाही.त्यामुळे नेत्याना घाम फुटण्याची शक्यता आहे.आगामी काळात काय होणार हे लवकरच समजणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close