जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पणन

… या बाजार समितीच्या आवारात होणार शेतकरी भवन !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कोपरगावसह राज्यातील ११६ बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी १०३.९८ कोटी आणि अस्तित्वातील शेतकरी भवनांच्या दुरुस्तीसाठी २८.५० कोटी याप्रमाणे एकूण १३२.४८ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.त्यात कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा उल्लेख असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांच्या प्रसिध्दी कार्यालयाने दिली आहे.

  

दरम्यान या खेतकरी भवनाच्या प्रशासकीय मंजुरी नंतर मात्र आ.काळे आणि माजी आ.कोल्हे यांची श्रेयासाठी लढाई चालू न झाली तर नवल मानले जाईल.कारण या आधीच गोंधळात संपन्न झालेल्या वार्षिक सभेत सभापती साहेबराव रोहोम यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शेतकरी भवन मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती दिली होती.

    राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांना मुक्कामाची सोय आणि मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी शेतकरी भवन बांधणे.तसेच अस्तित्वात असलेल्या शेतकरी भवनाची दुरुस्ती करणे यासाठी १९ डिसेंबर,२०२३ च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.या योजनेस २०२३-२४,२०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन आर्थिक वर्षांसाठी मान्यता देण्यात आली होती.यासाठी ११६ बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी १०३.९८ कोटी आणि अस्तित्वातील शेतकरी भवनांच्या दुरुस्तीसाठी २८.५० कोटी याप्रमाणे एकूण १३२.४८ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.या योजनेस मिळत असलेला प्रतिसाद विचारात घेऊन पुढे २०२६-२७ आणि २०२७-२८ या दोन आर्थिक वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.२०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत शेतकरी भवन बांधण्याचे ७९ नवीन प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी ४५ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.

  

 दरम्यान बांधकाम झाल्यावर सदर वास्तूचा देखभाल खर्च,दैंनदिन खर्च,वीज,पाणी देयके,मनुष्यबळ खर्च बाजार समितीने करावयाचा आहे.हा निर्णय आजच जाहीर झाला आहे.त्याचे कोपरगाव बाजार समिती कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी स्वागत केलं आहे.

  दरम्यान त्यात कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या शेतकरी भवनाचा समावेश आहे.त्यासाठी ०१ कोटी ७३ लाख ८० हजार ६०५ रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.यानंतर या शेतकरी भवनास सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मान्यता प्रदान केल्यानंतरच याचे काम सुरू होणार आहे.या एकूण कामात बांधकामासाठी ०१ कोटी ३० लाख ७३ हजार ५४४ रुपये,गौण खनिज स्वामित्व मूल्य ०२ लाख १७ हजार ४०० रुपये,गुण नियंत्रणासाठी ०१ लाख ४७ हजार ७३० जी.एस.टी.साठी २५ लाख ३६ हजार ६२३ रुपये,मजुरांचे विमा संरक्षणासाठी ८३ हजार १४५ रुपये,इलेक्ट्रिक चार्जेस ०६ लाख ५३ हजार ६७८ रुपये व अन्य चार्जेस ०६ लाख ७८ हजार ४८५ रुपयांचा समावेश आहे.त्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेच्या दिनांक १९ डिसेंबर २०२३च्या अटी शेती लागू राहणार आहे.हा मंजूर निधी दोन टप्प्यात विभागून देण्यात येणार आहे.

   दरम्यान बांधकाम झाल्यावर सदर वास्तूचा देखभाल खर्च,दैंनदिन खर्च,वीज,पाणी देयके,मनुष्यबळ खर्च बाजार समितीने करावयाचा आहे.हा निर्णय आजच जाहीर झाला आहे.त्याचे कोपरगाव बाजार समिती कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी स्वागत केलं आहे.दरम्यान या प्रशासकीय मंजुरी नंतर मात्र काळे आणि कोल्हे यांची श्रेयासाठी लढाई चालू न झाली तर नवल मानले जाईल.कारण या आधीच गोंधळात संपन्न झालेल्या वार्षिक सभेत सभापती साहेबराव रोहोम यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शेतकरी भवन मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती दिली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close