पणन
वार्षिक सभा गोंधळात संपन्न,उत्तरे मिळाली नाही,शेतकऱ्यांत असंतोष !

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम यांनी आपले प्रास्तविक संपवत असताना अहवाल वाचन न होता व सभासदांना बोलण्याची संधी न देताच थेट वार्षिक सभा संपली असल्याचे जाहीर केल्याने मोठा गोंधळ उडाला असून या गोंधळात राष्ट्रवादी (आ.काळे ) गटाने बहिष्कार टाकून सभेतून बाहेर जाणे पसंत केल्याने सभासदांनी मोठा गोंधळ घातला मात्र कार्यकर्त्याने थेट दिलगिरी व्यक्त करून परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला तो पर्यंत बहुतांशी सभासदांनी काढता पाय घेतल्याने या सभेचा फज्जा उडाला असल्याचे दिसून आले आहे.

“कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासक राज संपल्यावर झालेल्या सन २०२२-२३ च्या निवडणुकीचा खर्च केवळ ६७ हजार असताना आज पुन्हा वित्तीय वर्षात त्यावर ०७.१३ लाख खर्च पुन्हा कसा दाखवला,या शिवाय बाजार समितीची ६० टनी काट्यावर गरज भागत असताना तो १०० टनी का करत आहे”-अर्जुन काळे,माजी उपसापती,पंचायत समिती,कोपरगाव.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज बाजार समितीच्या नजीक असलेल्या शेड मध्ये आयोजित केली होती.त्यावेळी कोल्हे गटाने आपले समर्थक शेतकऱ्यांत असंतोष असल्याची खात्री असल्याने मोठ्या संख्येनं उपस्थित ठेवले होते.मात्र त्यांना सभेचे अध्यक्ष सभापती रोहम यांच्या चुकीच्या बोलण्याने केवळ हात चोळत बसण्याशिवाय काहीही काम ठेवले नाही.त्यावेळी हा गोंधळ उडाला असून याबाबत कोपरगाव तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.त्यामुळे आ.आशुतोष काळे गटाने ठरल्या प्रमाणे सभा होत नसल्याने व उपस्थित मान्यवरांचा सत्कार त्यांच्याच संचालकांच्या हस्ते वारंवार होत असल्याने त्या सभेवर थेट बहिष्काराचे अस्राचा वापर करावा लागला त्यामुळे सत्ताधारी गटाची मोठी नाचक्की झाली असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान ही सभा प्रास्तविक संपताच रद्द केल्याची घोषणा सभापती साहेबराव रोहम यांच्या चांगलीच अंगलट आली असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे तेथील काँग्रेसचे शेतकरी आघाडीचे तालुकाध्यक्ष विजय जाधव यांनी आम्हांला बोलू द्या ही बाजार समिती शेतकऱ्यांची आहे.आम्ही काही अतिरेकी नाही असे म्हणत बोलण्याची संधी देण्याची मागणी केली होती.त्यापुढे अखेर त्यांनी नमते घ्यावे लागले आहे.
सदर प्रसंगी उपसभापती गोवर्धन परजणे,संचालक संजय शिंदे,अशोक नवले,कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,रामदास केकाण,संजीवनीचे संचालक विश्वास महाले,उपसरपंच विवेक परजणे,बाळासाहेब गोर्डे,खंडू फेफाळे,साईबराव लामखडे,रामचंद्र साळुंखे,रेवणनाथ निकम,प्रकाश गोंडे,शिवाजी देवकर,लक्ष्मण शिंदे,रामचंद्र साळुंखे,कोपरगाव बाजार समितीचे माजी सभापती संभाजी रक्ताटे,मुरलीधर वाकचौरे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर,माजी उपसभापती अर्जुन काळे,बाळासाहेब गोंडे,वाल्मीक भोकरे,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष कैलास रहाणे,माजी सरपंच विक्रम पाचोरे,भाऊसाहेब शेळके,द्यानेश्वर परजणे,सुनील कदम,मनीष शहा,भरत बोरनारे,सर्जेराव कदम,राजेंद्र परजणे,दिलीप बोरनारे,उत्तम चरमळ,रावसाहेब मोकळ,अरुण येवले,विलास वाबळे,संदीप देवकर,अंबादास पाटोळे,संजय होन,दिलीप ढेपले,लोकीचे सरपंच बोळींज,सचिव नानासाहेब रणशूर,सभासद,कर्मचारी आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

“जवळके येथील बाजार समितीला त्यांच्याच ग्रामसभेने ऑगस्ट २०१६ साली नकार दिला होता त्यामुळे जवळके येथे उपबाजार देऊ शकलो नाही.त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.व आगामी काळात नक्कीच विचार करू असे आपली मुदत संपली असताना खास साखरपाकातील उत्तर दिले आहे.त्यामुळे याभागातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
त्यावेळी प्रास्तविक करताना त्यांनी बाजार समितीने आज पर्यंत सव्वा दोन वर्षात केलेल्या कामाची जंत्री वाचून दाखवली आहे.त्यात बाजार समितीने कसा कारभार केला याचा पोवाडा गायला आहे.मात्र तो त्यांच्या सहकाऱ्यांना पचनी पडला असल्याचे दिसून आले नाही.त्यांनीही शेतकऱ्यांना न बोलून दिल्याबद्दल घरचा अहेर दिला आहे.त्यामुळे त्यांची चांगलीच नाचक्की झाली आहे.त्यावेळी ते बोलताना म्हणाले की,”ज्येष्ठ नेत्यांनी शेतकऱ्यांच्या संस्थेत राजकारण नका असे सांगून पायंडा पाडला आहे.आम्ही त्यावर काम करत असून त्याचे अनुकरण करत आहोत अशी सबब पुढे आणली आहे.यावेळी संस्थेचे ५.६३ कोटी उत्पन्न झाले आहे.खर्च ४४ टक्क्यावरून १९ टक्क्यांवर आणला आहे.०६ कोटींचे कामे केली आहे.बाजार समितीचे उत्पन्न ०९ लाखांवरून १९ लाखांवर वाढवले आहे.शेतकऱ्यांना ०१ कोटींचा रस्ता काँक्रीटीकरण केले आहे.यशवंत शॉपिंगचा रस्ता २९ लाखांचा झाला आहे.२५ लाख क्विंटल आवक विक्रमी वाढली आहे.सर्वाधिक कांदा आवक होत असून रोख देयके दिली जात आहे.बिल्डिंग दुरुस्ती चालू आहे.रंग रंगोटी सुरू आहे.शॉपिंग सेंटरचे काम सुरू आहे.१.७३ कोटींचे शेतकरी भवन बांधले जाणार आहे.त्यास ५० टक्के अनुदान मिळणार आहे.सौर योजना,स्वस्तात जेवण देणार आहे.स्वच्छता गृह बांधले आहे.बारामती येथील बाजार समिती पाहिली आहे.तेथे शेतकरी आणि जनावरे स्कॅन केले जात असून जाता आणि येताना यांनी आधुनिक नोंद करत कौतुकास्पद काम आहे.आम्ही सर्व संचालक त्याचे अनुकरण करत आहे.शिरसगाव तीळवणी येथे काँक्रीटीकरण केले जाणार आहे.बाजार समितीस स्थापनेपासून आजपर्यंत कधीही बक्षीस मिळाले नव्हते,ते आम्ही मिळवले आहे.कोपरगाव बाजार समितीत आता सहा तालुक्यातील कांद्यासह शेतमाल येत आहे.धामोरीत,रांजणगाव देशमुख येथे उपबाजार सुरू करणार आहे.मात्र जवळके येथे तेथील कार्यकर्ते गेली पंचवीस वर्षे उपबाजार सुरू करण्यासाठी पाठपुरावा असुरू असताना त्याला थेट बगल दिली आहे.त्याबाबत त्यांनी समर्थन करताना आमचे मित्र पत्रकार नानासाहेब जवरे यांची जुनी मागणी असून आम्ही त्याची दखल घेतली होती.मात्र त्यांच्या ग्रामसभेने एक ठराव पाठून सन-२०१६ साली उपबाजार रद्द करण्याचा ठराव केल्याने आमचा नाईलाज झाला असल्याचे सांगून बोळवण केली आहे.परिणामी आम्ही तो रांजणगाव देशमुख येथे तो मंजूर केल्याचे मल्लिनाथी केली आहे.मात्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मागील ग्रामसभेचा ठराव रद्द करता येत नाही याला न्यायालयाच्या निर्णयाला सोयिस्कर आपल्या सोयीने बगल दिली आहे असल्याचे उघड झाले आहे.विशेष म्हणजे त्याच रांजणगाव देशमुख येथील ग्रामसभेने या भागाचा विकास होत नसल्याने संतापून त्यांना कोपरगाव तालुक्यातून काढून अन्य राहाता किंवा संगमनेर तालुक्यात त्या गावाचा समावेश करावा असा ठराव मंजूर केला असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहे.त्याला गटविकास अधिकारी यांनी दुजोरा दिला आहे.त्यामुळे ही बाजार समिती नेमली कोणासाठी काम करत आहे असा गंभीर सवाल उपस्थित शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

कोपरगाव बाजार समितीने सोयाबीन खरेदी करताना हमाली-तोलाई जर सरकारने शासन आदेश काढून ४८ रुपये असताना शेतकऱ्यांकडून तुम्ही ७० रुपये कसे घेतले त्यांचे सचिव रणशुर यांनी समर्थन करताना हमाल त्यासाठी तयार नव्हते असे लंगडे समर्थन केले आहे.मात्र सरकारकडून नंतरची आलेली रक्कम शेतकऱ्यांना दिली का ? अशी विचारणा करून त्यांची कोंडी केली आहे.यावर त्यांनी सोयिस्कर मौन पाळले आहे.
त्यावेळी बोलताना ते म्हणाले की,”जवळके येथील बाजार समितीला ग्रामसभेने नकार दिला होता त्यामुळे जवळके येथे देऊ शकलो नाही.त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.व आगामी काळात नक्कीच विचार करू असे आपली मुदत संपली असताना खास साखरपाकातील उत्तर दिले आहे.दरम्यान सभापती साहेबराव रोहोम यांनी सभेचे कामकाज संपले असे जाहीर केले त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता.त्याला सचिव नानासाहेब रणशूर,विश्वास महाले,अरुण येवले,विक्रम पाचोरे आदींनी मध्यस्थी करून सभा संपली नसल्याचे सांगून एक संचालक यांनी दिलगिरी व्यक्त करून सचिव यांनी अहवाल वाचन सुरू केले आहे.व शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान ही सभा प्रास्तविक संपताच रद्द केल्याची घोषणा सभापती साहेबराव रोहम यांच्या चांगलीच अंगलट आली असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे तेथील काँग्रेसचे शेतकरी आघाडीचे तालुकाध्यक्ष विजय जाधव यांनी आम्हांला बोलू द्या ही बाजार समिती शेतकऱ्यांची आहे.आम्ही काही अतिरेकी नाही असे म्हणत बोलण्याची संधी देण्याची मागणी केली होती.त्यापुढे अखेर त्यांनी नमते घ्यावे लागले असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान बाजार समिती सर्वपक्षीय संचालकांनी आधी ठेवल्या प्रमाणे सभेचे कामकाज होत नाही हे पाहून आ.काळे गट चक्रावून गेला व त्यांनी या गोंधळातच तेथून निषेध करत ते सर्वच्या सर्व सभास्थान सोडून निघून गेले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे व्यासपीठावरील बहुतांशी खुर्च्या रिकाम्या दिसू लागल्या होत्या.
दरम्यान त्याला कोपरगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे यांनी त्यांचे जोरदार समर्थन केले व शेतकऱ्यांना बोलू देणार नाही तर कोणाला बोलू देणार आहे असा तिखट सवाल केला आहे.समिती सभासदांच्या बळावर चालते तुम्ही स्व.शंकरराव काळे,शंकरराव कोल्हे आदी नेत्यांची नावे घेता मग त्यांना बोलू का देत नाही.हेच ज्येष्ठ व स्वर्गीय नेत्यांचे आदर्श तुम्ही घेता का ? असा तिखट सवाल केला आहे.त्यामुळे हा घराचा अहेर आल्याने सत्ताधारी वर्गाला त्यांची चांगलीच चपराक बसली असल्याचे दिसून आले आहे.त्यावेळी त्यांनी वर्तमानात ६० टनी वजन काटा असताना व व्यापारी बाजार समितीच्या बाहेर स्वतःचे काटे उभारत असताना तुम्हाला १०० टनी काट्याची गरजच काय ? यामागे नेमके काय गौड बंगला आहे असा सवाल केला आहे.त्यामुळे पूर्वी ०७ लाखांचा वजन काटा २५ लाखांचा दाखवला असल्याची घटना पुन्हा उजळली गेली आहे.यावेळी पुढे बोलताना काळे म्हणाले की,”प्रशासक राज संपल्यावर झालेल्या सन २०२२-२३ च्या निवडणुकीचा खर्च केवळ ६७ हजार असताना आज पुन्हा वित्तीय वर्षात त्यावर ०७.१३ लाख खर्च पुन्हा कसा दाखवला असा खोचक टोला लगावला आहे.मात्र त्यावर सत्ताधारी वर्गाने सोयिस्कर मौन पाळले आहे.या शिवाय त्यांनी बाजार समितीत एकूण २० कामगारांची पदे निर्माण असताना त्यातील ११ कायम केलेली आहे.अद्याप ०९ जन कायम करण्याचे बाकी असताना आणखी ०७ मंजूर केल्याने त्याबत अर्जुन काळे यांनी सवाल निर्माण केला व जुने आधी कायम करा मगच बाकी लोकांची भरती करा.आधीचे भरलेले कर्मचारी नेत्यांचे आणि संचालकांचे कोणीतरी कार्यकर्ते आहे किंवा त्यांचे जवळचे आहे असा त्यांचा बचाव केला आहे.

दरम्यान सभा आटोपल्यावर बाजार समितीच्या कार्यालयात सर्व पदाधिकारी गेल्यावर सात्ताधारी गट आणि काळे गटात मोठी धुमचक्री झाल्याची खबर असून त्यावेळी संतापून सभापती यांनी,”आता येथून पुढे येणाऱ्या निवडणुका आता एकत्रित घेऊ देणार नाही तर आम्ही स्वतंत्र घेणार असल्याची” थेट नेत्यांच्या व्यतिरिक्त घोषणा केल्याने अनेकांना ईशान्य गडाची सर्व सूत्रे आता विद्यमान बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे आली असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
परिणामी माजी उपसभापती अर्जुन काळे यांच्या बोलण्याला शेतकऱ्यांतून मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळाले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे बाजार समितीच्या सत्ताधारी गटाला दोन पावले मागे सरावे लागले असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे.त्यावेळी त्यांना वाचविण्यासाठी त्यांचा संदीप देवकर हे समोर आले व त्याने,”त्यांना तसे म्हणावयाचे नव्हते” अशी बतावणी केली असता त्याला चांगलाच प्रतिकार झाला होता.मात्र काही संचालकांनी मध्यस्ती करून सभा संपली नाही असे जाहीर करून पुन्हा माईक घेऊन जाहीर करावे लागले आहे.त्यावेळी सभापती रोहोम यांच्या वतीने संदीप देवकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.त्यानंतर माजी सरपंच विक्रम पाचोरे यांनी सूत्र आपल्या हाती घेतले व सभापती व त्यांचे संचालक मंडळ यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून त्यांच्या चांगल्या कार्याचे कौतुक करून शेतकऱ्यांना न बोलू दिल्याबद्दल ही चूकच आहे.यात तिळमात्र शंका नाही अशी शालजोड्यात घालून खरडपट्टी काढली असल्याचे दिसून आले आहे.
यावेळी दादासाहेब बबन निकम यांनी प्रवेशद्वारासह शिरसगाव येथे पायाभूत सेवा सुविधा निर्माण कराव्या,प्रवेशद्वार सौर ऊर्जा,वीज निर्माण करावे,पथदिवे लावावे,शेतकऱ्यांना मागील अनुदान मिळावे आदी मागण्या केल्या आहेत.त्यावेळी सभापती रोहम यांनी प्रवेशद्वार मंजूर केल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान बाजार समिती सर्वपक्षीय संचालकांनी आधी ठेवल्या प्रमाणे सभेचे कामकाज होत नाही हे पाहून आ.काळे गट चक्रावून गेला व त्यांनी या गोंधळातच तेथून निषेध करत ते सर्वच्या सर्व सभास्थान सोडून निघून गेले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे व्यासपीठावरील बहुतांशी खुर्च्या रिकाम्या दिसू लागल्या होत्या.तर मागेही उपस्थितांनी काढता पाय घेतला असल्याचे दिसून आले आहे.त्याला पावसाचे झालेले वातावरण आधीच कारणीभूत ठरले हे वेगळे सांगणे न लगे.त्यावेळी काँग्रेसचे विजय जाधव यांच्यात आणि एका संचालकात चांगलीच उखडा उखडी झाली असल्याचे दिसून आले आहे.मात्र अर्जुन काळे यांनी वातावरण शांत केले आहे.
दरम्यान यावेळी माझी संचालक भरत बोरनारे यांनी सभासदांनी शांततेत मांडावे असे आवाहन करताना बाजार समितीने सोयाबीन खरेदी करताना हमाली-तोलाई जर सरकारने शासन आदेश काढून ४८ रुपये असताना शेतकऱ्यांकडून तुम्ही ७० रुपये कसे घेतले त्यांचे सचिव रणशुर यांनी समर्थन करताना हमाल त्यासाठी तयार नव्हते असे लंगडे समर्थन केले आहे.मात्र सरकारकडून नंतरची आलेले रक्कम दिली का ? अशी विचारणा करून त्यांची कोंडी केली आहे.यावर सोयिस्कर मौन पाळले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
यावेळी दादासाहेब बबन निकम यांनी शिरसगाव येथे पायाभूत सेवा सुविधा निर्माण कराव्या,प्रवेशद्वार सौर ऊर्जा,वीज निर्माण करावे,पथदिवे लावावे,शेतकऱ्यांना मागील अनुदान मिळावे आदी मागण्या केल्या आहेत.
दरम्यान यावेळी कोपरगाव बाजार समितीस जास्त शेतमाल विक्री करणारे शेतकरी बाबासाहेब पानसरे,विठ्ठल बाळासाहेब जाधव,संदीप सुरेश जाधव,उपबाजार तिळवणी येथील संदीप निकम,अशोक कृष्णराव गायकवाड,विकास शिंदे,भुसार माल विक्री रमेश शिवाजी क्षीरसागर,बाळासाहेब तुळशीराम आव्हाड,कमलेश दिघे,कांदा विक्री सर्वाधिक सेस बाबत ऋषिकेश सांगळे,महेंद्र ठक्कर,अप्पासाहेब सांगळे,गणेश सोमनाथ सोनवणे,रेवणनाथ निकम,पिराजी अशोक शिंदे,दिलीप भट्टड,ललितकुमार धाडीवाल,संतोष सांगळे,सोमनाथ गंगूले,मनोजकुमार रोठे,मन्सूर शेख,मापारी भाऊसाहेब शेळके,आदींना कृषी उत्पन्न बाजार समितीने शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह देऊन गौरवलं आहे.
यावेळी जनावरांच्या बाजारात पायाभूत सेवा सुविधा पुरवल्याबद्दल सभापती साहेबराव रोहोम यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा सत्कार जनावरांचे व्यापारी,भाजीपाला व्यापारी संघटनेने केला आहे.
यावेळी प्रारंभी सभास्थानी दिवंगत राष्ट्रीय नेते,राज्य पातळीवर मृत झालेले आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.यावेळी सूत्रसंचलन गणेश कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिव नानासाहेब रणशुर यांनी यांनी केले आहे.
दरम्यान सभा आटोपल्यावर बाजार समितीच्या कार्यालयात सर्व पदाधिकारी गेल्यावर सात्ताधारी गट आणि काळे गटात मोठी धुमचक्री झाल्याची खबर असून त्यावेळी संतापून सभापती यांनी,”आता येथून पुढे येणाऱ्या निवडणुका आता एकत्रित येवून घेणार नाही तर आम्ही स्वतंत्र घेणार असल्याची” थेट नेत्यांच्या व्यतिरिक्त घोषणा केल्याने अनेकांना ईशान्य गडाची सर्व सूत्रे आता विद्यमान बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे आली की काय असा सवाल खाजगीत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केला आहे.याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
—————————————–
*नियमित विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा’ वर क्लिक करा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.