पणन
सोयाबीन खरेदी रक्कम शेतकऱ्यांच्या खाती वर्ग !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्य सरकारने सन-२०२४-२५ या वर्षी जाहीर केलेल्या सोयाबीन हमी भाव दराने ५५६ शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले सोयाबीनची रक्कम रुपये ०४ कोटी २० लाख २२ हजार २८० रुपये त्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्राने सलग दोन वेळा राज्याला सोयाबीन खरेदीची मुदत वाढ दिली आता पुन्हा सोयाबीन खरेदी साठी मुदत वाढीचा प्रस्ताव पणन विभागाने केंद्र सरकारला पाठवला आहे.मात्र त्याबाबत अद्याप खाली आदेश आलेला नाही अशी माहिती बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर यांनी दिली आहे.
राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून ५५२ खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी सुरू होती.०६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ५ लाख ११ हजार ६६७ शेतकर्यांकडून ११ लाख २१ हजार ३८४ मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी झालेली आहे.१४ लाख १३ हजार २६९ मेट्रिक टन पी पी एस खरेदी उद्दिष्ट्य राज्याला दिले होते.त्या उद्दिष्टाच्या जवळजवळ ८० टक्के सोयाबीन खरेदी राज्याने केली आहे.कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती त्याला अपवाद नाही त्यांनी चालू हंगामात सोयाबीन आधारभूत किंमत ४८९२ रुपये दराने ८ हजार ५९० क्विंटल सोयाबीन खरेदी केली होती.मात्र त्याचे देयके बाकी होती.ती मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सदर सोयाबीन खरेदीची रक्कम जमा झालेली आहे की नाही याची खातरजमा तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतः करून घ्यावी असे आवाहन उपसभापती गोवर्धन पर जणे यांनी केले आहे,ज्यांची हमी भावाची रक्कम जमा झालेले नाही त्यांनी बाजार समिती व्यवस्थापन यांचेशी संपर्क करावा असे आवाहन बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांनी शेवटी केले आहे.
राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्राने सलग दोन वेळा राज्याला सोयाबीन खरेदीची मुदत वाढ दिली आता पुन्हा सोयाबीन खरेदी साठी मुदत वाढीचा प्रस्ताव पणन विभागाने केंद्र सरकारला पाठवला आहे.सोयाबीन खरेदी केंद्रांवर रांगेत उभे असलेल्या शेतकर्यांच्या सोयाबीन खरेदी करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं मंत्री रावल यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.