जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पणन

शेतकऱ्यांचे कांदा अनुदान तत्काळ द्या-…यांच्या सूचना

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे पाच हजार शेतकऱ्यांचे कांद्याचे ०८कोटींचे अनुदान मिळाले आहे.तर उर्वरित ५२ लाखांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळवून द्यावे लागेल असे आवाहन संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आज कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना विवेक कोल्हे.

“गत पंचवीस वर्षात मागणी करूनही अद्याप जवळके येथे उपबाजार सुरू झालेला नाही,”दुष्काळातील तेरा गावे उपेक्षित जगणे का जगत आहेत.तो पाकव्याप्त काश्मीर आहे का ? सदर गाव तेरा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असून ते चौफुलीवर वसले आहे.शेजारी काकडी (शिर्डी) विमानतळ असून त्या गावावरून शिर्डी पालखी मार्ग जात आहे.शेजारी सूरत-चेन्नई मार्ग जात असून भविष्यात त्या ठिकाणच्या जवळच इंटरचेज होत आहे.त्याचा व शिर्डीच्या बाजारपेठेचा मोठा फायदा होऊन समितीच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते”-नानासाहेब जवरे,कार्यकर्ते,जवळकें.

  

   कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दुपारी ०१ वाजता मर्यादित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बाजार समितीच्या आवारात मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.सदर प्रसंगी बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम हे अध्यक्षस्थानी होते.

 

दरम्यान सत्कार सोहळ्यात जवळपास एक तास गेल्याने सभासद वैतागले असल्याचे दिसून आले आहे.मात्र उशिराने संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्यामुळे उशीर केल्याचे उपस्थितांच्या लक्षात आल्याने त्यांनी डोक्याला हात लावला आहे.

   सदर प्रसंगी बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके,अर्जुन काळे,सुनील देवकर,माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,कारखान्याचे माजी संचालक विश्वास महाले,संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे,बाजार समिती संचालक खंडू फेफाळे,अशोक नवले,संजय शिंदे,
राजेंद्र खिलारी,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शरद थोरात,सुभाष दवंगे,मनीष शहा,माजी उपसभापती राजेंद्र निकोले,सर्जेराव कदम,साहेबराव लामखडे,लक्ष्मण शिंदे,शिवाजी देवकर,रामदास केकाण,रमेश घोडराव,ऋषिकेश सांगळे,रावसाहेब मोकळं,रेवणनाथ निकम,विजय डांगे,रामचंद्र साळुंके,बाळासाहेब गोरडे,भाजप युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे,भरत बोरनारे,डॉ.देवकर आदी मान्यवरांसह बहुसंख्येने शेतकरी सभापती उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या वतीने बोलताना राजेंद्र खिलारी दिसत आहेत.

  

“कोपरगाव शेतकऱ्यांना रोख देयके मिळतात मात्र तिळवणी येथे शेतकऱ्यांना ती पंधरा दिवस भेटत नाही.बाजार समितीचे शेड व्यापाऱ्याऐवजी शेतकऱ्यांना का उपलब्ध होत नाही;भाजीपाला मार्केट मध्ये थेट गुडघ्याइतके पाणी असते.तो गटारी शेजारी भरवला जातो त्याने शहरातील नागरिकांना अशुद्ध भाजीपाला खावा लागतो याला जबाबदार कोण”- सुभाष दवंगे,माजी अध्यक्ष,कोपरगाव तालुका भाजप.

   सदर प्रसंगी पूढे बोलताना ते म्हणाले की,”संचालक मंडळ कौतुकास पात्र आहे असून त्यांनी समितीच्या नफ्यात मोठी वाढ केली आहे.तालुक्यात राजकारण कोठे करायचे हे ज्यांना समजते त्या माजी मंत्री काळे व कोल्हे या ज्येष्ठ नेत्यांचे स्मरण केले व सहकारी संस्था टिकल्या पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.त्यासाठी शेतकऱ्यांची संस्था टिकली पाहिजे म्हणूनच आपण अन्य नेत्यांची मदत घेऊन बिनविरोध निवडणूक केली असल्याच्या घटनेस दुजोरा दुजोरा दिला आहे.वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी सूचना करणाऱ्या शेतकऱ्यांचे त्यांनी कौतुक केले आहे.सभेच्या आधी विशिष्ट कालावधीत सूचना घेण्याचे आवाहन त्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे.त्यामुळे नंतर सांगतो म्हणण्याची वेळ येणार नाही; संचालक मंडळाने आपापसात भांडणे करून महत्वाचा वेळ वाया घालवू नका असे आवाहन करून त्यांचे उपस्थितांसमोर कान टोचले आहे.शेतकऱ्यांना माल विक्रिनंतर रोख रकमेची सेवा सुरू ठेवावी असे आवाहन करून त्यांनी बाजार समितीच्या ८८ लखांच्या ठेवी वाढून त्या दिड कोटींवर गेल्याचा गौरव केला आहे.त्यातील ०६ कोटींचे विविध विकास कामे कोपरगावसह विविध उपबाजारात सुरू असल्याचे सांगितले आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीचे एकूण व्यवहार हे ४०० कोटींच्यावर गेले असल्याचे सांगून पदाधिकारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे व आगामी काळात समितीने शाश्वत उत्पन्न वाढ करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.चंबडी बाजार,भाजीपाला बाजारास जागा निर्माण करून शेड तयार करावे.तिळवणी येथे शेतकऱ्यांना व्यवहारासाठी राष्ट्रीयकृत बँक शाखा सुरू करावी असे आवाहन केले आहे.संचालक मंडळाने भांडणे करून वेळ वाया घालवू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.

बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा विवेक कोल्हे यांनी शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे.

  

“आ.आशुतोष काळे यांनी दिलेले पाणी शुध्दीकरण यंत्र वापरले असते तर बाजार समितीचा पाण्याचा वार्षिक खर्च कमी झाला असता.सभापती रोहोम यांनी १०० टनी काटा घेण्याची घोषणा केली.त्याची खरच गरज आहे का ? मात्र त्याचे लिलाव सात हजार इतके कमी का होत आहे”- अर्जुन काळे,माजी सभापती,कोपरगाव पंचायत समिती.

सदर प्रसंगी प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम यांनी केले आहे.त्यावेळी त्यांनी माजी मंत्री शंकरराव काळे,शंकरराव कोल्हे,नामदेवराव परजणे यांनी राजकारण बाजूला ठेवून संस्था टिकवली असल्याचा दावा करून कोपरगाव बाजार समितीने विंचूर आणि लासलगाव बरोबर विकास साधला असल्याचा दावा केला आहे.गत आर्थिक वर्षात २५ लाख क्विंटल विक्रमी आवक झाली असल्याचा दावा केला आहे.बाजार समितीस गत वर्षात २ कोटी तर यावर्षी १.६० लाखांचा नफा झाला असल्याचा दावा केला आहे.पारदर्शक कारभार केला असून त्यातून विविध सुविधा निर्माण केल्या जाणार आहे.नवीन वजन काटा उपलब्ध करून दिला आहे.एक हजार मेट्रिक गोदाम निर्माण केले आहे.विश्रामगृह उपलब्ध केले जाणार आहे.जनावरांच्या बाजारात पिण्याच्या पाण्यासाठी नवीन हौद निर्माण केले आहे.याशिवाय नवीन शेड,दावणी निर्माण केल्या जात आहे.नवीन रस्ता ०९ लाखांचे दोन रस्ते मंजूर केले आहे दुर्लक्षित भाजीपाला मार्केट व तिळवणी उपबाजार येथे मध्ये स्वच्छतागृह निर्माण केले जाणार आहे.भाजीपाला लिलावासाठी नवीन ओटे निर्माण केले जात आहे.सि.सी.टी.व्ही.बसवणार आहे.धामोरी उपबाजार उद्घाटन करणार आहे.

   माजी सभापती अर्जुन काळे यांनी,”आमदार काळे यांनी दिलेले पाणी शुध्दीकरण यंत्र वापरले असते तर पाण्याचा वार्षिक खर्च कमी झाला असता.साहेबराव रोहोम यांनी १०० टनी काटा घेण्याची घोषणा केली.त्याची खरच गरज आहे का ? मात्र त्याचे लिलाव सात हजार इतके कमी का होत आहे असा कडवा सवाल विचारला आहे.व त्याची गरज नाही असा दावा केला आहे.जगभर जागतिक तापमान कमी करण्यावर भर दिला जात असताना बाजार समिती वृक्षारोपण वर खर्च कमी का करते असा सवाल विचारला आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीने स्वतःचा पेट्रोल पंप सुरू करावा.रंग कामाचा खर्च का दाखवला आहे.इमारतीला तो दिसत नाही तो आतून दिला का असा खोचक सवाल केला आहे.सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याकडून प्रशासकांनी पैसे घेणे योग्य नाही” असा आरोप करून थेट हल्ला चढवला  आहे.

   सदर प्रसंगी राजेंद्र खिलारी यांनी शेतकऱ्यांना आपल्या शेतमालास किमान आधारभूत किंमत का मिळत नाही असा सवाल करून शेतकऱ्यांचे क्रेट लगेच मिळत नसल्याचे तक्रार केली आहे.तर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे यांनी तिळवणी येथे शेतकऱ्यांना रोख देयके भेटत नाही.शेड शेतकऱ्यांना का उपलब्ध होत नाही याचा जाब विचारला आहे.भाजीपाला मार्केट मध्ये थेट गुडघ्याइतके पाणी असते.तो बाजार गटारी शेजारी भरवला जातो त्याने शहरातील नागरिकांना अशुद्ध भाजीपाला खावा लागतो.भाजीपाला मार्केट साठी शेड तातडीने निर्माण करा अशी मागणी केली आहे.सदर सभेस सहकार प्रतिनिधी गैरहजर असल्याबद्दल राजेंद्र खिलारी यांनी शेवटी खेद व्यक्त केला आहे.शेतमाल शेतकरी स्वतः उतरवत असतील तर हमाली,तोलाई बंद का केली जात नाही असा सवाल केला आहे.

   सदर प्रसंगी नानासाहेब जवरे यांनी,”गत पंचवीस वर्षात मागणी करूनही अद्याप जवळके येथे उपबाजार सुरू झालेला नाही,”दुष्काळातील तेरा गावे उपेक्षित जगणे का जगत आहेत.तो पाकव्याप्त काश्मीर आहे का ? सदर गाव तेरा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असून ते चौफुलीवर वसले आहे.शेजारी काकडी (शिर्डी) विमानतळ असून त्या गावावरून शिर्डी पालखी मार्ग जात आहे.शेजारी सूरत-चेन्नई मार्ग जात असून भविष्यात त्या ठिकाणच्या जवळच इंटरचेज होत आहे.त्याचा व शिर्डीच्या बाजारपेठेचा मोठा फायदा होऊ शकतो.मात्र याकडे सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याचा खेद व्यक्त करून तो त्वरित सुरू करण्याचे आवाहन केले आहे व त्यास काय अडचण आहे अशी विचारणा केली आहे.टी मागणीस माजी सरपंच विक्रम पाचोरे यांनी दुजोरा दिला आहे.त्यावेळी बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांनी सदर उपबाजार मंजूर होऊन जिल्हाधिकारी पातळीवर आला होता.मात्र जवळके ग्रामपंचायतीने ठराव देऊन ‘तो’ रद्द केल्याचा आरोप केला आहे.त्यावेळी माजी सरपंच बंडू थोरात यांनी त्याचे घाईघाईने खंडण केले आहे.यावर नानासाहेब जवरे यांनी बाजार समितीचे उपबाजार मंजुरीचे नेमके धोरण काय आहे.पंचवीस वर्ष आधीच्या गावाची मागणी आधी मंजूर होणार की;नंतर प्रस्ताव दिलेल्या ग्रामपंचायतीचा असा कडवा सवाल विचारला आहे.त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम यांनी आपण हा विषय संचालक मंडळात घेऊन मार्गी लावू असे तत्कालिक आश्वासन दिले आहे.

   सदर प्रसंगी पदमकांत कुदळे यांनी मार्गदर्शन केले आहे.दरम्यान बाजार समितीचे माजी संचालक भरत बोरनारे यांनी,”आ.आशुतोष काळे यांनी दिलेला पाणी शुध्दीकरण प्रकल्प बंद का आहे.गाळ्यांच्या निविदा प्रसिद्ध करून ते का दिले जात नाही याचा जाब विचारला आहे.

   दरम्यान सदर प्रसंगी शेतकरी श्री गव्हाणे यांनी उपबाजार तिळवणी येथे चांगले काम सुरू असल्याचा दावा केला आहे.त्या ठिकाणी चलचित्रण सुरू करावे शेतकऱ्यांना निवासस्थान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे.

   सदर प्रसंगी कांदा विक्री करणारे तन्मय ज्ञानेश्वर परजणे,संदीप देवकर,संदीप जाधव,यांचा सत्कार करण्यात आला आहे.उपबाजार तीलवणी येथील शेतकरी दादासाहेब बाबासाहेब निकम,सोमनाथ हरिशंद्र शिंदे,अजय भीमराव शिंदे,पंढरीनाथ बापूराव निघोट,महेंद्र ठक्कर,संतोष कुमार ठक्कर,गणेश सोनवणे,निलेश सोनवणे,जगदीश भट्टड,ज्येष्ठ मापारी बाळासाहेब गीते,हमाल रामनाथ शेळके आदींचा सन्मानचिन्ह व शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.

   दरम्यान सत्कार सोहळ्यात जवळपास एक तास गेल्याने सभासद वैतागले असल्याचे दिसून आले आहे.मात्र उशिराने संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्यामुळे उशीर केल्याचे उपस्थितांच्या लक्षात आल्याने त्यांनी डोक्याला हात लावला आहे.

   सदर प्रसंगी अहवाल वाचन बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांनी केले तर सूत्रसंचलन गणेश कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बाजार समिती संचालक खंडू फेफाळें यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close