जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

पोलिसांना मारहाण,कोपरगावात आरोपीं निर्दोष मुक्त

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील प्रगत शिवाजी रोड मित्र मंडळाच्या वतीने सन-२०१८ मध्ये काढलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत विसर्जन मार्गात अडथळा आणून बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्या प्रकरणी दाखल झालेल्या व पुढे न्यायालयात चाललेल्या खटल्यातील आरोपी सुमित किरण बिडवे यास कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले असल्याची माहिती अड्.जयंत जोशी यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान पोलिसास मारहाण केल्या प्रकरणातील आरोपी सुमित बिडवे याचे तर्फे अड्.जयंत जोशी यांनी पोलीस यंत्रणा आरोपी विरुद्ध राजकीय वादातून गुन्हा दाखल केल्याचा बचाव केला होता.तसेच या गुंह्यातील साक्षिदार,यांच्या विसंगती न्यायालयाचे निदर्शनास आणून दिल्या होत्या.व प्रथमदर्शनी हा गुन्हा शाबीत होत नसल्याचा युक्तिवाद केला होता व आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याची मागणी केली होती.त्यानुसार आरोपी निर्दोष मुक्त केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणूक सुरु असताना शहरातील प्रगत शिवाजी रोड मित्र मंडळाचे कार्यकर्ते सुमित किरण बिडवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर मिरवणुकीस अडथळा आणला होता असा पोलिसांचा आरोप होता.त्यात आरोपी सुमित बिडवे याने गणेश मिरवणुकीत ठरलेल्या नियमाच्या बाहेर जाऊन त्याचे उल्लंघन केले असल्याचा कोपरगाव शहर पोलिसांचा आरोप होता.व त्यानुसार त्यांनी आरोपी सुमित बिडवे याचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भा.द.वि.कलम ३५३,३३२,३२३,५०४,५०६,१४३,१४६,१४७,१४९ सह मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम ३७(१) (३) प्रमाणे फिर्याद दखल केली होती.त्याचे दोषारोप पात्र कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय यांचे पुढे दाखल झाले होते.

या प्रकरणी न्यायालयासमोर फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षिदार,तपासी अधिकारी बी.सी.नागरे,वैद्यकीय अधिकारी आदींच्या साक्षी नोंदविण्यात आल्या होत्या.

दरम्यान आरोपी तर्फे अड्.जयंत जोशी यांनी पोलीस यंत्रणा आरोपी विरुद्ध राजकीय वादातून गुन्हा दाखल केल्याचा बचाव केला होता.तसेच या गुंह्यातील साक्षिदार,यांच्या विसंगती न्यायालयाचे निदर्शनास आणून दिल्या होत्या.व प्रथमदर्शनी हा गुन्हा शाबीत होत नसल्याचा युक्तिवाद केला होता व आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याची मागणी केली होती.

दरम्यान न्यायालयाने सरकारी अभियोक्ता व आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रं.२ बी.एम.पाटील यांनी नुकतीच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.आरोपीतर्फे अड्.जयंत जोशी यांनी कामकाज पाहिले होते.त्यांना अड्.व्यंकटेश ख्रिस्ते,अड्.वाय.एच.दाभाडे,अड्.एस.डी.मोरे,अड्.एस.ए.जानीं आदींनी सहकार्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close