न्यायिक वृत्त
विनयभंग प्रकरण,कोपरगावात आरोपीस एक वर्षाची शिक्षा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या महिलेस,”चोरीस गेलेली विद्युत मोटार तुला मिळवून देतो असे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्या प्रकरणातील आरोपी संतोष वायसे यास कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्या.श्रीमती स्मिता बनसोड यांनी दोष सिद्धीनंतर एक वर्षाची शिक्षा सुनावली असून त्यास एक हजारांचा दंड ठोठावला आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी संतोष वायसे याने सदर महिलेस,”आपण तुझी विद्युत मोटार मिळवून देतो” असे आमिष दाखवले होते.व तिला प्रेमसंबंध ठेवण्याची गळ घातली होती.त्यास अर्थातच सदर महिलेने नकार दिला होता.तरीही त्याने तीस “तू,माझ्याशी प्रेम संबंध ठेव तुला काही कमी पडून देणार नाही”असे म्हणून सदर महिलेचा पाठलाग करून तिंचा विनयभंग केला होता.त्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला होता.त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला हि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऱहिवासी आहे.तिची विद्युत मोटार चोरीस गेली होती.त्याबाबत तिने शोध घेतला असता ती मिळून आलेली नव्हती.त्यामुळे सदर महिला वैतागून गेली होती.त्याचा गैरफायदा उचलत त्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी संतोष वायसे याने सदर महिलेस आपण तुझी विद्युत मोटार मिळवून देतो असे आमिष दाखवले होते.व तिला प्रेमसंबंध ठेवण्याची गळ घातली होती.त्यास अर्थातच सदर महिलेने नकार दिला होता.तरीही त्याने तीस “तू,माझ्याशी प्रेम संबंध ठेव तुला काही कमी पडून देणार नाही”असे म्हणून सदर महिलेचा पाठलाग करून तिंचा विनयभंग केला होता.
सदर महिलेने या प्रकरणातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी संतोष तुळशीराम वायकर (वय-३२) याचे विरुद्ध रितसर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.न.१५१/२०१९ भा.द.वि.कलम ३५४(ड) अन्वये गुन्हा दाखल केला होता.त्याचा तपास पोलीस हे.कॉ.श्री.बाबर यांनी केला होता.
सदर गुंह्यातील आरोपी पोलिसांनी अटक करून त्यास कोपरगाव येथील कोपरगाव येथील प्रथमवर्ग कनिष्ठ न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले होते.त्यानंतर कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणातील संपूर्ण तपास करून आरोपी विरुद्ध रितसर दावा वरील न्यायालयात दाखल केला होंता.त्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली आहे.
त्याबाबत फिर्यादी महिलेच्या बाजूने सरकारी वकील श्रीमती ए.ए.शेख यांनी बाजू मांडली आहे.तर आरोपीच्या वतीने अन्य वकिलाने बाजू मांडली होती.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीस कोपरगाव येथील कनिष्ठ न्या.श्रीमती स्मिता बनसोड यांनी आरोपीस एक वर्षाची शिक्षा सुनावली असून त्यास एक हजारांचा दंड ठोठावला आहे.०१ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.तसेच तक्रारदार महिलेस आरोपीने ०४ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.सदर गुन्हाचा तपास हे.कॉ.श्री बाबर यांनी केला होता.तर पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक महिला फौजदार नंदा गलांडे यांनी काम पाहिले होते.दोष सिद्धी झाल्याने कोपरगाव तालुका पोलिस अधिकाऱ्यांचे व सरकारी वकील यांचे कौतुक होत आहे.