न्यायिक वृत्त
‘त्या’गंभीर गुंह्यातील आरोपीस पाच दिवसाची पोलीस कोठडी

न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला आरोपी सुदेश सखाहारी थोरात (वय-५०) याने आपले वडील वडील सखाहारी चंदू थोरात (वय-८०) हे एकत्र राहत असताना त्यांचा खून केल्या प्रकरणी कोपरगाव येथील न्यायालयाने आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती चौकशी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुदेश थोरात यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर भा.द.वी.३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून कोपरगाव वरिष्ठ स्तर न्यायालयापुढे हजर केले असता आरोपी सुदेश थोरात यास १ नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत असे की,”२३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास,”वडिलांनी आपल्याला दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही” या किरकोळ कारणावरून आरोपी मुलगा सुदेश थोरात याने वडीलांना केलेल्या मारहाणीत सखाहारी चंदू थोरात (वय-८०) या वयोवृद्ध वडीलास मुलाने दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणामुळे लाकडी दांडक्याने डोक्यावर व पायावर हातावर जबरी मारहाण करून गंभीर जखमी केले होते.
सदरची घटना २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली घटनेनंतर याची माहिती कोणाला न देता जखमीला तसेच घरात ठेवून पळून गेला व सकाळी,”आपल्या वडिलांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मारहाण केली आहे” असा बनाव आरोपी सुदेश थोरात यांने केला होता.या घटनेनंतर नजीकच्या ग्रामस्थांनी जखमीस तात्काळ सखाहारी चंदू थोरात यांना तत्काळ.दुसऱ्या दिवशी सकाळी साईबाबा संस्थान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते,मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले होते.या गंभीर घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय अधिकारी संजय सातव पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.यावेळी संशयित सुदेश थोरात यांची पोलिसांनी आपला पोलिसी हिसका दाखविल्यावर त्याने या खुनाची कबुली दिली होती.
दरम्यान या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर भा.द.वी.३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून कोपरगाव वरिष्ठ स्तर न्यायालयापुढे हजर केले असता आरोपी सुदेश थोरात यास १ नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
या घटनेने जवळकेसह कोपरगाव राहाता तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.शिर्डी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील हे करीत आहे.