न्यायिक वृत्त
बाललैंगिक अत्याचार प्रकरण,’त्या’ शिक्षकास तीन दिवसांची पोलीस कोठडी !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी नजीक असलेल्या शाळेतील शिक्षक (वय-४७) आरोपी विरुद्ध शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थिनीसोबत (वय-१३) बाल लैंगिक अत्याचार छळ केल्या प्रकरणातील आरोपी शिक्षक यास पोलिसांनी अटक करून त्यास कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न न्यायालय क्रं.१ समोर हजर केले असता त्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण ‘त्या’ संशयित आरोपी शिक्षकास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान त्यास काल दि.९ ऑक्टोबर रोजी चौकशी अधिकारी सुरेश आव्हाड यांनी संशयित आरोपी शिक्षकास कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न न्यायालय क्रं.१ समोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यास तीन दिवसांची म्हणजेच दि.१२ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोपरगाव तालुक्यातील वारी नजीक असलेल्या शाळेतील विद्यार्थिनी (वय-१३) हिचा त्याच शाळेतील सावळीविहिर येथे रहिवासी असललेल्या शिक्षकाने दि.२० जून २०२२ पासून ते दि.२३ जुलै २०२२ पर्यंत सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.४५ दरम्यान वेळोवेळी संबंधित शाळेत विनयभंग केला असून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते.त्यामुळे पालकांत भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.त्या शिक्षकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दि.८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल केला होता.त्याबाबत शालेय अंतर्गत समितीने चौकशी केली होती.त्यातही तथ्यांश आढळला होता.त्यानंतर फिर्यादी महिलेने संबधीत शिक्षकाविरुद्ध व कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत तिच्या फिर्यादी आईच्या वतीने (वय-४५) रा.कोपरगाव यांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दि.८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल केला होता.त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते.व मुलींच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता.व आरोपीस शासन होणे गरजेचे बनले असल्याचे ग्रामस्थ व नागरिकांचे म्हणणे आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२८६/२०२२ भा.द.वि.कलम ३५४(अ)(आय)सह बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ११,१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.आरोपीस शिक्षकास कोपरगाव तालुका पोलिसांनी काल रात्री ११.३६ वाजता वारी नजीकच्या एका ठिकाणाहून येथुन अटक केली होती.
दरम्यान काल दि.९ ऑक्टोबर रोजी ‘जनशक्ती न्यूजसेवा’ या वृत्त संकेत स्थळावर सदर बातमीत अनावधानाने अल्पकाळ स्थळ निर्देश झाला होता.त्याबद्दल एका सुज्ञ वाचकाने सदर बाब लक्षात आणून दिली त्याबद्दल ‘जनशक्ती न्यूजसेवा’ वृत्त संकेत स्थळ ‘त्या’ वाचकांचे जाहीर आभार मानत असून त्या अल्पकाळासाठी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत दिलगिरी व्यक्त करत आहे.
दरम्यान त्यास काल दि.९ ऑक्टोबर रोजी चौकशी अधिकारी सुरेश आव्हाड यांनी संशयित आरोपी शिक्षकास कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न न्यायालय क्रं.१ समोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यास तीन दिवसांची म्हणजेच दि.१२ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.