न्यायिक वृत्त
…’त्या’ वृत्तातील चुकीच्या नावाबद्दल दिलगिरी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव साठवण तलावाची नुकतीच मंजूर झालेली १३१.२४ कोटींच्या निविदा व पाणी मंजुरीला (३.३२ द.ल.घ.मी.) खो घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात माजी आ.कोल्हे गटाचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी दाखल झालेली जनहित याचिका (सिव्हिल अप्लिकेशन क्र.-७९६३/२०२२) उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावल्याची बातमी जनशक्ती ‘न्यूजसेवा’ (newsseva.in) या कोपरगाव येथून प्रसिद्ध होणाऱ्या पोर्टलवर दि.११ जुलै २०२२ रोजी (न्यायिक वृत्त क्रं.९१९८४ दि.११ जुलै २०२२) प्रसिद्ध झाली आहे.
‘त्या’ वृत्तात राज्य सरकारी पक्षाचे वकील अड्.डी.आर.काले’असल्याने.या नाव साधर्म्यामुळे अनावधानाने व नजर चुकीने,” माजी आ.कोल्हे गटाचे शहराध्यक्ष ‘दत्ता काले’ यांची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली” असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.त्यात कोणालाही दुखावण्याचा वा बदनाम करण्याचा हेतू नव्हता.याबद्दल,’जनशक्ती न्यूजसेवा’ पोर्टल दिलगिरी व्यक्त करत आहे.