गुन्हे विषयक
वकिलाच्या विरूध्द एट्रोसिटीचा गुन्हा दाखल !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथील रहिवासी व कोपरगाव येथील न्यायालयात आपली सेवा बजावत असलेले वकील गौरव गुरसळ यांचे विरूध्द पोलिस सेवेत उपनिरीक्षक पदावर आपले कर्तव्य बजावत असलेले मातोश्रीनगर राहुरी येथील वर्तमानात फिर्यादी दुर्गेश सुखलाल वाघ यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात शेतजमिनीत असलेले भिंत पाडली असल्याचे कारणावरून वकील गुरसळ यांचेसह त्यांची आई,वडील गंगाधर गुरसळ,मुलगा अनिरुद्ध गुरसळ,पत्नी मीनाक्षी गुरसळ असा पाच जणांवर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्याने शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती हे पुढील तपास करत आहे.

‘अॅट्रॉसिटी कायदा’म्हणून ओळखले जाते,हा भारतातील अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) च्या सदस्यांवरील अत्याचार आणि गुन्हे थांबवण्यासाठी तयार करण्यात आलेला एक महत्त्वाचा कायदा आहे.या कायद्याचा मुख्य उद्देश दलित आणि आदिवासी समाजाला संरक्षण देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हा आहे.मात्र याबाबत बऱ्याचदा याचा राज्यात नागरिक गैरवापर करताना आढळून येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा,१९८९, ज्याला सामान्यतः ‘अॅट्रॉसिटी कायदा’ म्हणून ओळखले जाते, हा भारतातील अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) च्या सदस्यांवरील अत्याचार आणि गुन्हे थांबवण्यासाठी तयार करण्यात आलेला एक महत्त्वाचा कायदा आहे.या कायद्याचा मुख्य उद्देश दलित आणि आदिवासी समाजाला संरक्षण देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हा आहे.मात्र याबाबत बऱ्याचदा याचा राज्यात नागरिक गैरवापर करताना आढळून येत आहे ही चिंताजनक बाब बनली आहे.मात्र मुर्शतपूर शिवारातील घटनेबाबत आताच काही मत व्यक्त करणे घाईचे ठरेल.
याबाबत फिर्यादी दुर्गेश वाघ आणि कोपरगाव येथील न्यायालयात आपली सेवा बजावत असलेले वकील गौरव गुरसळ यांची मुर्शतपूर शिवारात शेजारी शेजारी शेतजमीन आहे.त्यांचा गट क्रमांक 73\4 असा आहे.म्हणजेच ते दोघे बांधभाऊ आहे.त्यांच्यात आपापसात काही वर्षांपूर्वी समझोता होऊन त्यांनी आपल्या शेताच्या बांधावर एकत्र येऊन संमतीने भिंत बांधली होती.मात्र नंतर दि.20 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता आरोपी वकील गौरव गुरसल यांनी उत्खंकाच्या (जे.सी.बी.)साहाय्याने चालकास सांगून तेथे हजर राहून आपली भिंत पाडली असल्याचा दावा केला आहे.याबाबत त्यांना लक्ष्मीनगर येथील कमानी जवळ दुपारी 4.30 वाजता विचारणा केली असता त्यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करून आपल्याशी झटापट केली असून त्यास त्यांचा मुलगा अनिरुद्ध गुरसळ आदींनी सहाय्य केले आहे.माझे खिशातील रोख रुपये 06 हजार रुपये काढून घेतले आहे.आपण या कृतीस विरोध केला असता.त्यांचे वडील गंगाधर गुरसळ,त्यांची पत्नी मीनाक्षी गुरसळ त्यांची आई पूर्ण नाव माहिती नाही आदींनी आपल्याला वाईटसाईट शिवीगाळ केली असल्याचा आरोप आपल्या फिर्यादीत केला आहे.दरम्यान या गुन्ह्यात कायद्याचे रक्षण करणारे दोन्ही घटक गुंतले असल्याने जनतेने काय बोध घ्यावा असा सावल ग्रामस्थांतून विचारला जात आहे.
दरम्यान याबाबत वकील गौरव गुरसळ यांचे म्हणणे असे की,’आपण त्यावेळी समझोता करून भिंत बांधली होती.मात्र जमिनीची मोजणी केली आणि बांध सरकला तर एकमेकांनी तो समजुतीने सरकून घ्यायचा असा करार झाला होता.आपण या बाबत कोपरगाव भूमी अभिलेख विभागाकडून रितसर मोजणी केली असता सदर भिंत ही आपल्या जामीन हद्दीत आली होती.शिवाय ती कलली होती.त्यामुळे शेतात काम करणे व मशागत करणे अवघड बनले होते.त्यामुळे आपण कल्पना देऊन ही कृती केली असल्याचा दावा केला आहे व हा गुन्ह्याचा आरोप फेटाळला आहे.त्यामुळे याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.501\2025 भारतीय न्याय संहिता कलम 329(1),329(3),324(5),119(1),352,189(2),190,अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कलम 3(1)(जी),3(1)(आर)3(1)एस.3(2)(व्ही ए.)दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती हे करीत आहेत.
————————-
*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.



