जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

‘त्या’ चोरीतील आरोपिंना कोपरगावात एक दिवसांची पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील दि.२२ ऑगष्ट रोजी सायंकाळी ०६ वाजेच्या नंतर रात्री कधीतरी तहसील कार्यालयाशेजारी मैदानातील उभ्या असलेल्या ट्रकमधील (क्रं.एम.एच.१२,एफ.सी.६९१५) मधील दहा टायर मढील इंधन टाकीतील सुमारे १४ हजार २५३ रुपये किमतीचे १५० लिटर डिझल आरोपीनीं चोरून नेले होते या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील चार आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी काल रात्री ११.२३ वाजता अटक करून त्यांना कोपरगाव येथील न्यायदंडाधिकारी तिसरे यांचे समोर हजर केले असता त्या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी गणेश मोरे,सचिन साळवे,अरुण सोनकांबळे,इक्बाल शहा यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याचे हद्दीत अशीच इंधन चोरीची घटना घडली होती.त्या बाबत त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होते.मात्र पोलिसांना आरोपी सापडत नव्हते.त्या बाबत संशयित म्हणून वावी पोलीसांनी कोपरगाव तालुक्यातील आरोपीनां हिसका दाखवला असता त्यांनी कोपरगावच्या चोरीची कबुली दिली होती.त्यामुळे त्या गुन्ह्यातून या चारही आरोपींना इकडे कोपरगावकडे हस्तांतरित केले होते.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरातील फिर्यादी आयुब फकीर महंमद कच्छी (वय-४५) रा.महादेव नगर यांनी आपली ट्रक (क्रं.एम.एच.१२,एफ.सी.६९१५) हि तहसील कार्यालयाचे मैदानात दि.२२ ऑगष्ट रोजी सायंकाळी सहा वाजता उभी करून ठेवली असता रात्री कधीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दहा टायर मधील इंधन टाकीतील सुमारे १४ हजार २५३ रुपये किमतीचे १५० लिटर डिझल अज्ञात माध्यमाने काढून घेतले होते.व फरार झाले होते या प्रकरणी फिर्यादी ट्रक चालक यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.२६१/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये दाखल केला होता.मात्र आरोपींचा शोध शहर पोलिसांना लागला नव्हता.त्या मुळे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांपुढे या आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते.

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याचे हद्दीत अशीच घटना घडली होती.त्या बाबत त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होते.मात्र पोलिसांना आरोपी सापडत नव्हते.त्या बाबत संशयित म्हणून वावी पोलीसांनी कोपरगाव तालुक्यातील आरोपी गणेश मच्छीन्द्र मोरे,(वय-२२)रा.धारणगाव,कोपरगाव,सचिन संजय साळवे,(वय-२९) गजानननगर कोपरगाव,अरुण अनिल सोनकांबळे,(वय-३०) रा.गजानननगर कोपरगाव,इक्बाल आरिफ शहा (वय-२८)रा.धारणगाव कोपरगाव यांना दि.०६ ऑक्टोबर रोजी रात्री ११.२३ वाजता अटक केली होती.त्या नंतर पोलीस तपासात त्यांना पोलिसांना आपला हिसका दाखवला असता त्यांनी,”आपण कोपरगाव येथेही चोरी केल्याची कबुली दिली होती.त्या बाबत वावी पोलिसांकडून कोपरगाव पोलिसांनी त्यांना नुकतेच कोपरगाव येथील शहर पोलिसांकडे वर्ग केले होते.

त्यांना आज कोपरगाव येथील दंडाधिकारी तिसरे यांचे समोर हजर केले असता त्या बाबत सरकारी अभियोक्ता एस.ए.व्यवहारे यांनी कोपरगाव पोलिसांच्या वतीने बाजू मांडली व “आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करायचा आहे.आरोपींचे आणखी कोण कोण साथीदार आहेत याचा तपास करायचा आहे.व अन्य किती गुन्हे केले याबाबत तपास करायचा असल्याचा दावा” करून आरोपीना पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.न्यायालयांने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून एक दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.आरोपींच्या वतीने श्रीरामपूर येथील वकील यांनी बाजू मांडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close