न्यायिक वृत्त
बगाटे यांची साई संस्थानच्या पदावर नियमबाह्य नेमणूक,उच्च न्यायालय
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उच्च न्यायालयात शिर्डी येथील माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी नवीन विश्वस्त मंडळ नेमण्या साठी जन हित याचिका दाखल केली होती.त्यावर अंतिरीम आदेशान्वये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने,प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर,अतिरिक्त आयुक्त नाशीक,सह धर्मदाय आयुक्त नगर व मुख्य कार्यकारी अधिकारी शिर्डी यांची तद्थ समिती गठीत करून त्यांना धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार व आदेश दिले होते व त्या नुसार सदर समिती आजवर साईबाबा संस्थानचे काम पहात आहे.
“दि.१९ मार्च २०२१ रोजी औरंगाबाद येथील उच्च न्यायालय खंडपीठाचे न्या.एस.व्ही.गंगापूरवाला व न्या.एस.डी.कुलकर्णी यांनी कान्हूराज बगाटे यांची साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली त्यावेळेस ते आय.ए.एस.अधिकारी नव्हते व त्यामुळे त्यांची नेमणूक उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश उल्लंघन करणारी आहे”-उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खण्डपीठ.
दरम्यान याचिकाकर्ते यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सनदी अधिकाऱ्यांमधून नेमण्यासाठी दिवाणी अर्ज दाखल केला होता.
त्यावर आज दिनांक १९मार्च २०२१ रोजी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे न्या.एस.व्ही.गंगापूरवाला व न्या. एस.डी.कुलकर्णी यांनी कान्हूराज बगाटे यांची साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली त्यावेळेस ते आय.ए.एस.अधिकारी नव्हते व त्यामुळे त्यांची नेमणूक उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश उल्लंघन करणारी आहे असे नमुद करत राज्य शासनाच्या सदर नेमणुकीच्या धोरणा बद्दल नाराजी व्यक्त करत कठोर शब्दात ताशेरे ओढलेले आहेत.
यापुढे साईबाबा संस्थान शिर्डीयेथे मुख्य कार्यकारी अधिकारी सनदी अधिकारी मधून नेमावा असे आदेश राज्य शासनाला दिले आहेत.विश्वस्त मंडळ दोन महिन्यात येईल अशी हमी राज्य शासनाच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आली याचिका कर्त्याच्या वतीने अॅड प्रज्ञा तळेकर अॅड उमाकांत औटे व अॅड आजिंक्य काळे काम पाहात आहे.तर शासनाचे वतीने अॅड डी आर काळे काम पाहात आहे.दरम्यान या आदेशाने राज्य सरकारचा भोंगळ कारभार न्यायालयाने पुन्हा एकदा उघड केला आहे.