न्यायिक वृत्त
अपघातात मुलीचा मृत्यू,चालकास मोठी शिक्षा !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील तिळवणी येथील उपबाजारात कांदे भरत असताना तेथील ट्रॅक्टर चालक आरोपी बाबासाहेब वाल्मिक शिंदे याने अपघात करून त्यात कुं.संगीता मगन पगारे (वय-२४) ही ठार झाली होती.त्या प्रकरणी झालेल्या गुन्ह्याची कोपरगाव येथील न्यायालयात सुनावणी होऊन त्यात आरोपी बाबासाहेब शिंदे यास भारतीय दंड संहिता,१८६० च्या कलम ३०४-अ अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यांसाठी त्यांना अठरा महिने सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी संजय खैरनार यांनी सुनावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

यातील ट्रॅक्टर अपघातात मयत मुलीच्या वतीने फिर्यादीचे सरकारी अभियोक्ता प्रदीप रणधीर यांनी यांनी जोरदार युक्तिवाद केला होता.तर आरोपींचे वकील यांनी आरोपीचा बचाव केला होता.न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीस गुन्हा सिद्ध झाल्याने भारतीय दंड संहिता,१८६० च्या कलम २७९ आणि मोटार वाहन कायदा,१९८८ च्या कलम १८४ अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे आणि त्यांना ६ (सहा) महिने सक्तमजुरी आणि ०१ हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.दंड न भरल्यास त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता,१९७३ च्या कलम २५५ (२) नुसार एक महिना साधी कारावास भोगावा लागेल.तसेच भारतीय दंड संहिता,१८६० च्या कलम ३०४-अ अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यांसाठी त्यांना १८ महिने सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”दि.१५ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास कोपरगाव बाजार समितीचा उपबाजार असलेल्या तिळवणी उपबाजार आवारात ट्रॅक्टर नं एम.एच.३२ ए.५८७२ वरील मालक व चालक बाबासाहेब वाल्मीक शिंदे रा.तिळवणी याने कृषी उत्पन्न उपबाजार समिती,शिरसगाव येथे यातील मयत मुलगी कु.संगिता मगन पगारे वर्ष रा.तिळवणी हि सदर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये कांदा भरत असताना यातील चालकाने त्याचा ट्रॅक्टर हयगयीने, अविचाराने,रस्त्याच्या परीस्थीतीकडे दुर्लक्ष करून अचानक भरगाव वेगात रेस करून पुढे चालवित घेवून जावून अपघात करून तिचे मृत्यूस कारणीभूत झाला होता.म्हणून शीला पोपट पगारे यांनी ट्रॅक्टर वरील चालकाविरूध्द कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करुन चौकशीनंतर नंतर कोपरगाव तालूका अ.मृ.नं.१७/२०२२ सी.आर.पी.सी. १७४ चे चौकशीत निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान याची सुनावणी कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी संजय खैरनार यांचे न्यायालयात नुकतीच संपन्न झाली आहे.यातील फिर्यादीचे वकील व सरकारी अभियोक्ता प्रदीप रणधीर यांनी यांनी जोरदार युक्तिवाद केला होता.तर आरोपींचे वकील यांनी आरोपीचा बचाव केला होता.न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीस गुन्हा सिद्ध झाल्याने भारतीय दंड संहिता,१८६० च्या कलम २७९ आणि मोटार वाहन कायदा,१९८८ च्या कलम १८४ अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे आणि त्यांना ६ (सहा) महिने सक्तमजुरी आणि ०१ हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.दंड न भरल्यास त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता,१९७३ च्या कलम २५५ (२) नुसार एक महिना साधी कारावास भोगावा लागेल.तसेच भारतीय दंड संहिता,१८६० च्या कलम ३०४-अ अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यांसाठी त्यांना १८ महिने सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.यातील आरोपीने दंड न भरल्यास त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम २५५ (२) नुसार सहा महिने सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.जर दंड भरला असेल तर १९७३ च्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३५७ (१) नुसार मृत संगीता मगन पगारेच्या कायदेशीर वारसांना ५० हजार रुपये भरपाई म्हणून देण्यात यावी असा आदेश पारित केला आहे.त्यामुळे तिळवणी,शिरसगाव येथील ग्रामस्थानी व फिर्यादीच्या कुटुंबाने न्यायालयांच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.



