न्यायिक वृत्त
खुनाच्या आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध,आरोपीस शिक्षा !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सुरगाणा पोलीस ठाणे हद्दीतील बिवळ पोस्ट माणी येथील एक तर्फे प्रेमातुन वाद घालुन महिलेचा खुन करणा-या आरोपी रमेश परसराम गावंडे यास नाशिक येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने नुकतीच आजन्म कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.या प्रकरणी तपास वर्तमानात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले संदीप कोळी यांनी केला होता.त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर गुन्हयाचा तपास वर्तमानात कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले व यावेळी सुरगाणा पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले तत्कालीन पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी केला होता.त्यांनी आरोपी विरुध्द भक्कम पुरावा गोळा करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.त्यातून संबंधित आरोपीस ही शिक्षा झाली आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबतची सविस्तर घटना अशी की,”दि.१३ मार्च २०२३ रोजी ११ वाजता बिवळ गावी फिर्यादीचे राहते घराचे पडवीत ता.सुरगाणा येथे सदर गुन्हयायातील आरोपी रमेश परशराम गावंडे (वय-२४) याने फिर्यादीच्या सुनेस एक तर्फी प्रेम करत होता.त्यावरून त्याने वाद घालुन तिचे डोक्यात कु-हाडीने वार करून जिवे ठार मारले होते.त्या विरुद्ध सुरगाणा पोलिस ठाण्यात गुन्हा गु.र.नं १५/२०२३ भादवी ३०२ प्रमाणे गुन्हा दखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास वर्तमानात कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले व यावेळी सुरगाणा पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले तत्कालीन पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी केला होता.त्यांनी आरोपी विरुध्द भक्कम पुरावा गोळा करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता शैलेश सोनवणे तसेच पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर,सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री पाटील आदींनी वेळोवेळो मार्गदर्शन केले होते.
दरम्यान या खटल्यात सहाय्यक चौकशी अधिकारी म्हणुन व्हि.एस.गांगुर्डे यांनी काम पाहीले होते.यात गुन्हा साबित झाला असल्याचे उघड झाले आहे.या गंभीर घटनेचा काळजीपूर्वक तपास तत्कालीन सुरगाणा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी केला होता.त्याबद्दल नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायालय क्रं.05 चे जिल्हा न्यायाधिश जे.डी.वडणे यांचे न्यायालयात दाखल खटल्याची सुनावनी पुर्ण झाली होती.
दरम्यान या गुन्हयातील आरोपी रमेश परशराम गावंडे वय २४ रा.बिवळ,पोस्ट-माणी,ता.सुरगाणा,जि.नाशिक याचे विरूध्द आरोप सिध्द झाल्याने नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सदर आरोपीस सी.आर.पी.सी.२३५ (२) अन्वये दोषी ठरवुन भा.द.वि.कलम ३०२ नुसार आजन्म कारावास व १ हजार रुपये दंड केला आहे.दंड न भरल्यास ०६ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता शैलेश सोनवणे तसेच पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर,सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री पाटील आदींनी वेळोवेळो मार्गदर्शन केले होते.दरम्यान या खटल्यात सहाय्यक चौकशी अधिकारी म्हणुन व्हि.एस.गांगुर्डे यांनी काम पाहीले होते.यात गुन्हा साबित झाला असल्याचे उघड झाले आहे.या गंभीर गुन्ह्यातील आरोपीस शिक्षा झाल्याने पोलिस अधिकारी संदीप कोळी यांचे अभिनंदन होत आहे.



