न्यायिक वृत्त
निवडणुकीच्या धामधुमीत पी.ए.ची सुनावणी पुढे ढकलली !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या मोहिनीराजनगर येथे शारदीय नवरात्र उत्सवात तीन गटात तुंबळ हाणामारीतील एकूण १८ जणांना अटक करण्यात आली होती.यातील फरार प्रमुख आरोपी अरुण जोशी,त्याचा भाऊ राजेंद्र जोशी व त्यांचा पुतण्या शुभम जोशी आदी तीन जणांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली असली तरी त्यांना अद्याप जामीन मिळाला नाही त्यांनी त्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पुन्हा एकदा उंबरठा झिजवला असून त्याची सुनावणी सरकारी पक्षाने वेळ मागून घेतल्याने आगामी 27 नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलली असल्याचे माहिती हाती आली आहे.त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीपासून त्यांना वंचीत राहावे लागणार असल्याचे उघड झाले आहे.

आरोपी अरुण जोशी याने पुन्हा एकदा जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता.त्याची सुनावणी नुकतीच काल 10 नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयासमोर संपन्न झाली असून सरकारी पक्षाच्य्या पोलिसांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागून घेतल्याने न्यायालयाने ती आगामी गुरुवार दि.27 नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.त्यामुळे ऐन निवडणुकीत त्याची उणीव सत्ताधारी गटास जाणवणार आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरात दि.२५ सप्टेंबर रोजी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास सत्ताधारी राष्ट्रवादीचे आ.काळे गट,मनसे विरूध्द शिवसेना (ऊ.बा.ठा.) गटात राहाता येथील इसमाने रस्त्यावरून गाडी घालण्याच्या कारणावरून दोन गटात तलवार,लोखंडी रॉड,क्रिकेटचे स्टंप,लाकडी काठ्या,दगड विटांनी तुंबळ हाणामारी होऊन त्यात यमानाजी सुंबे व द्यानेश्वर भांगरे आदी दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह विवेक राजेंद्र आव्हाड,गौरव सुनील मोरे,अविनाश नामदेव गीते,दत्तात्रय रंगनाथ पंडोरे,हिराबाई राजेंद्र आव्हाड तर दुसऱ्या गटातील सुनील योगेश गोर्डे,वनिता नारायण गोर्डे,अरुण बाजीराव जोशी,राजेंद्र बाजीराव जोशी,शुभम राजेंद्र जोशी आदी १० जण गंभीर जखमी झाले होते.यातील ४१ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता तर त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणला प्रकरणी अन्य १९ आरोपीवर असे एकूण ६० हून अधिक आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.या हाणामारीचे स्वरूप इतके गंभीर होते.या प्रकरणी पोलिसांवर हात उचलण्याने पोलिस अधिकाऱ्यांनी जोशी बंधूंवर विशेष कृपा केली होती.परिणामी त्यातून सुटकेचा मार्ग अवघड जात होते.उच्च न्यायालयात तर न्यायालयाने त्यांना,”तुम्ही अर्ज काढून घेणार की,मला तो फेटाळावा लागेल” असा स्पष्ट भाषेत इशारा दिला होता.त्यावेळी त्यांनी उच्च न्यायालयात काही तासांचा वेळ मागून घेतला व मोठा खल केला होता.व त्यानंतर काही वकील आणि आरोपी यांनी वेळाने तो अर्ज अखेर काढून घेण्याची नामुष्की ओढवली होती.हा प्रकार ऐन दिवाळीच्या दिवशी घडला होता.दरम्यान त्यांनी तब्बल महिनाभर त्यांनी पोलिसांना चकवले होते मात्र जिल्हा व सत्र न्यायालय,उच्च न्यायालयात कोठेही जामिनासाठी आपली डाळ शिजत नाही असे दिसल्यावर त्यांनी आपल्या तलवारी म्यान करून सपशेल शरणागती पत्करली होती.त्यानंतर पोलिसांनी अचानक ‘यू ‘ टर्न घेऊन पोलिस कोठडी मागण्या ऐवजी न्यायिक कोठडी मागितल्याने अनेकांना धक्का बसला होता.त्यानंतर त्यांनी आपल्या सुटकेसाठी जामीन मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.मात्र फिर्यादी पक्षाचे वकील जयंत जोशी यांनी पोलिसांच्या या भूमिकेवर कडक भूमिका येऊन त्यांना उघडे केले होते.त्यामुळे त्यांचा जामीन मिळण्याचा मार्ग आक्रसून गेला होता.त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (अरुण बाजीराव जोशी विरूध्द राज्य सरकार) जामीन अर्ज (क्रमांक 2171\2015) दाखल केला होता.त्याची सुनावणी नुकतीच काल 10 नोव्हेंबर रोजी 2025 रोजी उच्च न्यायालयाचे न्या.मेहरोज के.पठाण यांचे समोर संपन्न झाली असून सरकारी पक्षाच्य्या पोलिसांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागून घेतल्याने न्यायालयाने ती आगामी गुरुवार दि.27 नोव्हेंबर 2025 रोजी ठेवली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे ऐन कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत आ.आशुतोष काळे यांना स्विय सहाय्यक अरुण जोशी याची उणीव भासणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान उच्च न्यायालयात संपन्न झालेल्या या सुनावणीत आरोपीच्या वतीने ॲड.आर.आर.तांदळे व ऍड.नितीन गवारे यांनी काम पाहिले आहे तर सरकारी पक्षाचे वतीने ॲड.संजय गायकवाड यांनी काम पाहिले आहे.आता कोपरगाव तालुक्यातील नागरिकांचे येत्या 27 नोव्हेंबर 2025 रोजी औरंगाबाद खंडपीठात संपन्न होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागून राहिले आहे.


