न्यायिक वृत्त
…या न्यायालयाने केली आरोपींची निर्दोष मुक्तता

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कासली शिवारातील रहिवासी असलेला फिर्यादी नानासाहेब मालिक ओंकार विठ्ठल मालीक श्रावण मालीक यांच्यामध्ये विहिरीवर इलेक्ट्रिक मोटर बसवण्याच्या वादावरून ऑगस्ट 2019 मध्ये तुंबळ हाणामारी झाली होती.त्या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी नुकतीच संपन्न झाली असून यातील आरोपी ओंकार मालीक व त्यांचा बंधू श्रावण मालीक या दोघांना कोपरगाव येथील अतीरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती जे.एस.केळकर यांनी निर्दोष मुक्त केले आहे.

दरम्यान कासली येथील या खटल्यात एकूण गुणदोषावर साक्ष पुरावे झाले होते.दरम्यान यातील सात साक्षीदार सरकारी वकील शैलेश देसले यांचे कडून व सरकारच्या वतीने तपासण्यात आले होते.त्यामध्ये आरोपीतर्फे ऍड.सुयोग बाळासाहेब जगताप यांनी उलट तपास घेतला होता.त्यात त्यांनी आरोपीचे वतीने बाजू मांडली होती.त्यांचा युक्तिवाद न्यायालयाने गृहीत धरला असल्याचे उघड झाले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील कासली शिवारातील रहिवासी असलेला फिर्यादी नानासाहेब मालीक व आरोपी ओंकार मालीक यांच्यात व विहिरीवर इलेक्ट्रिक मोटर बसवण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी झाली होती.याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात 30 ऑगस्ट 2019 रोजी गु.र.क्रं.122/2019 अन्वये गुन्हा दाखल झाला होता.त्यावरून तत्कालीन पोलीस निरीक्षक याचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय पवार यांनी तपास करून दोषारोप पत्र दाखल केले होते.त्यात फिर्यादी नानासाहेब मालिक व त्यांचा मुलगा,वडील आदी तीन जण त्यांच्या शेतात आले असता आरोपी ओंकार मालीक व श्रावण मालीक यांनी त्यांना लाकडी काठीने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून मोठी दुखापत केली होती.दरम्यान त्यात त्यांचे दोन दात पाडल्याचा आरोप आरोपी ओंकार विठ्ठल मलिक व श्रावण विठ्ठल मलिक यांच्यावर दाखल करण्यात आला होता .
सदर खटल्यात अतीरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती जे.एस.केळकर यांच्यापुढे आर.सी.सी.359/2019दाखल होऊन भा.द.वी.323,324,325 व 34 अन्वये दोषारोप निश्चित करण्यात आले होते.त्या खटल्यात एकूण गुणदोषावर साक्ष पुरावे झाले होते.दरम्यान यातील सात साक्षीदार सरकारी वकील शैलेश देसले यांचे कडून व सरकारच्या वतीने तपासण्यात आले होते.त्यामध्ये आरोपीतर्फे ऍड.सुयोग बाळासाहेब जगताप यांनी उलट तपास घेतला होता.त्यात त्यांनी आरोपीचे वतीने बाजू मांडली होती.त्यांचा युक्तिवाद न्यायालयाने गृहीत धरला असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती जे.एस.केळकर यांनी आरोपी विरुद्ध सबळ पुरावा न आल्याने व साक्षपुराव्यातील विसंगती ग्राह्य धरून आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.आरोपीतर्फे ऍड.सुयोग बाळासाहेब जगताप यांनी बाजू मांडली होती.त्यांना ऍड.भारती काटकर व अजिंक्य वाकचौरे आदींनी सहकार्य केले होते.या निकालाबाबत आरोपी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने समाधान व्यक्त होत आहे.


