न्यायिक वृत्त
…’त्या’ गुन्ह्यातील स्वीय सहाय्यकाचा जामीन फेटाळला !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या मोहिनिराजनगर या ठिकाणी ऐन शारदीय नवरात्र उत्सव जोरात सुरू असताना तीन गटात तुंबळ हाणामारीतील एकूण १८ जणांना अटक करण्यात आली होती.त्यांना पुन्हा सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी शहर पोलिसांनी मागील सप्ताहात कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचें न्या. डी.डी.अलमले यांचेसमोर हजर केले असता यातील प्रमुख आरोपी अरुण जोशी यांचेसह राजेंद्र जोशी,शुभम जोशी आदी तीन आरोपींचा अटक पूर्व जामीन फेटाळला असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा आ.आशुतोष काळे गटास धक्का समजला जात आहे.

राकेश माणगावकर हे पोलिस निरीक्षक असताना गणेश विसर्जनाच्या दिवशी धिंगाणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना धरून आणल्यावर सायंकाळी सातच्या सुमारास अशीच मद्य प्राशन करून सत्ताधारी गटाच्या एका नगरसेवकाने पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली होती.”मी कोण आहे ? तुम्हाला माहिती आहे का ? असे म्हणुन पोलिस अधिकाऱ्यांचा उपमर्द केला होता.त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यास रिंगणात घेऊन त्यांचा बेत पहिला होता.त्यानंतर बेताल वर्तन करणाऱ्या आरोपींना सोडण्यास नेत्यांचे फोन बंद झालेच पण गुन्हेगारी किमान पातळीवर आली होती हे विशेष !
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरात मागील महिन्यात दि.२५ सप्टेंबर रोजी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास सत्ताधारी राष्ट्रवादीचे आ.काळे गट,मनसे विरूध्द शिवसेना (ऊ.बा.ठा.) गटात रस्त्यावरून गाडी घालण्याच्या कारणावरून दोन गटात तलवार,लोखंडी रॉड,क्रिकेटचे स्टंप,लाकडी काठ्या,दगड विटांनी तुंबळ हाणामारी होऊन त्यात यमानाजी सुंबे व द्यानेश्वर भांगरे आदी दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह विवेक राजेंद्र आव्हाड,गौरव सुनील मोरे,अविनाश नामदेव गीते,दत्तात्रय रंगनाथ पंडोरे,हिराबाई राजेंद्र आव्हाड तर दुसऱ्या गटातील सुनील योगेश गोर्डे,वनिता नारायण गोर्डे,अरुण बाजीराव जोशी,राजेंद्र बाजीराव जोशी,शुभम राजेंद्र जोशी आदी १० जण गंभीर जखमी झाले होते.

यातील ४१ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता तर त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणला प्रकरणी अन्य १९ आरोपीवर असे एकूण ६० हून अधिक आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.या हाणामारीचे स्वरूप इतके गंभीर होते की रस्त्यावर दगड,विटांचा मोठा खच पडला होता.ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राडा झाल्याने याची किंमत सत्ताधारी गटाला चुकवावी लागणार असे संकेत मिळत असून यातील प्रमुख आरोपी व आ.काळे यांचे स्विय सहाय्यक अरुण जोशी हा आणि त्याचे अन्य शहर पोलिसांवर हल्ला करणारे साथीदार फरार आहेत.

दरम्यान जे 18 आरोपी याआधी अटक झाले आहे ज्यांची न्यायालयीन कोठडी संपली आहे त्यांची सुनावणी आज पूर्ण झाली आहे तर काहींची उद्या सुनावणी संपन्न होणार असून दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर उद्या जिल्हा व सत्र न्यायालय आदेश देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान या गुन्ह्यात कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी यमानाजी सुंबे व द्यानेश्वर भांगरे आदी दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह दहा जण जखमी झाले होते.त्यामुळे या घटनेला गंभीर परिणाम लाभले होते.याची गंभीर दखल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली होती.हा सरकारी कामात अडथळा करण्याचा गुन्हा दखल होऊ नये यासाठी शिर्डीत जावून लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे प्रयत्न केले होते.मात्र पोलिसांवर हल्ला हा प्रकार पोलिसांनी गंभीर घेतला होता.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोपरगाव शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कंबर कसली असल्याने त्यात पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे दिसून आले होते.त्यामुळे आता पोलिस काय कारवाई करणार याकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागून होते.मात्र पोलिसांनी यातील पोलिसांवर हात उचलणाऱ्या आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आ.काळे यांच्या स्वीय सहाय्यक अरुण जोशी सह त्याचे नातेवाईक आणि अन्य सहकारी यांचे विरूध्द गुन्हा दाखल केल्याने याकडे कोपरगाव सह जिल्ह्याचे लक्ष लागून होते.यातील आ.काळे यांचा स्विय सहाय्यक अरुण जोशी,राजेंद्र जोशी,शुभम जोशी आदी तीन आरोपी फरार होऊन जवळपास 19 दिवस उलटले आहे.त्यामुळे या आरोपींची मोठी गोची झाली असल्याचे समजते.सत्ताधारी गट असतानाही त्यांना पोलिसांनी थारा न दिल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.आता सदर आरोपी उच्च न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी जाणार का ? असा सवाल निर्माण झाला आहे.
दरम्यान राकेश माणगावकर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक असताना सन -2019-20 साली त्यावेळी गणेश विसर्जनाच्या दिवशी धिंगाणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना धरून आणल्यावर सायंकाळी सातच्या सुमारास अशीच मद्य प्राशन करून सत्ताधारी गटाच्या एका अती उत्साही स्व.नगरसेवकाने पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली होती.”मी कोण आहे ? तुम्हाला माहिती आहे का ? असे म्हणुन पोलिस अधिकाऱ्यांचा उपमर्द केला होता.त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यास रिंगणात घेऊन त्यांचा बेत पहिला होता.त्यानंतर बेताल वर्तन करणाऱ्या आरोपींना सोडण्यास नेत्यांचे फोन बंद झाले होते व गुन्हेगाराला मोठया प्रमाणावर आळा बसला होता.या घटनेमुळे त्या घटनेला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.
————————————
*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.