न्यायिक वृत्त
…’त्या’ आरोपींना न्यायालयीन कोठडी,नाशिक कारागृहात होणार रवानगी!

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या मोहिनिराजनगर या ठिकाणी ऐन शारदीय नवरात्र उत्सव जोरात सुरू असताना तीन गटात तुंबळ हाणामारीतील एकूण १८ जणांना अटक करण्यात आली होती.त्यांना पुन्हा सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी शहर पोलिसांनी आज कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी केळकर मॅडम यांचे समोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान आज न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेल्या आरोपींना नाशिक रोड कारागृहात होणार असल्याची माहिती आहे.दरम्यान आ.आशुतोष काळे यांचे स्विय सहाय्यक अरुण जोशी सह अन्य जण अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.ते अटक पूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरात मागील महिन्यात दि.२५ सप्टेंबर रोजी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास सत्ताधारी राष्ट्रवादीचे आ.काळे गट,मनसे विरूध्द शिवसेना (ऊ.बा.ठा.) गटात रस्त्यावरून गाडी घालण्याच्या कारणावरून दोन गटात तलवार,लोखंडी रॉड,क्रिकेटचे स्टंप,लाकडी काठ्या,दगड विटांनी तुंबळ हाणामारी होऊन त्यात यमानाजी सुंबे व द्यानेश्वर भांगरे आदी दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह विवेक राजेंद्र आव्हाड,गौरव सुनील मोरे,अविनाश नामदेव गीते,दत्तात्रय रंगनाथ पंडोरे,हिराबाई राजेंद्र आव्हाड तर दुसऱ्या गटातील सुनील योगेश गोर्डे,वनिता नारायण गोर्डे,अरुण बाजीराव जोशी,राजेंद्र बाजीराव जोशी,शुभम राजेंद्र जोशी आदी १० जण गंभीर जखमी झाले होते.यातील ४१ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता तर त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणला प्रकरणी अन्य १९ आरोपीवर असे एकूण ६० हून अधिक आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.या हाणामारीचे स्वरूप इतके गंभीर होते की रस्त्यावर दगड,विटांचा मोठा खच पडला होता.ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राडा झाल्याने याची किंमत सत्ताधारी गटाला चुकवावी लागणार असे संकेत मिळत आहेत.

दरम्यान आज सर्व 18 अटक आरोपींना आज दुपारी 3.30 वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी केळकर मॅडम यांचेसमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यात खळबळ उडून दिलेल्या या घटनेत यमानाजी सुंबे व द्यानेश्वर भांगरे आदी दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह विवेक राजेंद्र आव्हाड,गौरव सुनील मोरे,अविनाश नामदेव गीते,दत्तात्रय रंगनाथ पंडोरे,हिराबाई राजेंद्र आव्हाड तर दुसऱ्या गटातील सुनील योगेश गोर्डे,वनिता नारायण गोर्डे,अरुण बाजीराव जोशी,राजेंद्र बाजीराव जोशी,शुभम राजेंद्र जोशी आदी १० जण गंभीर जखमी झालेत्यात यमानाजी सुंबे व द्यानेश्वर भांगरे आदी दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह विवेक राजेंद्र आव्हाड,गौरव सुनील मोरे,अविनाश नामदेव गीते,दत्तात्रय रंगनाथ पंडोरे,हिराबाई राजेंद्र आव्हाड तर दुसऱ्या गटातील सुनील योगेश गोर्डे,वनिता नारायण गोर्डे,अरुण बाजीराव जोशी,राजेंद्र बाजीराव जोशी,शुभम राजेंद्र जोशी आदी १० जण गंभीर जखमी झाले होते.परिणामी वरिष्ठ पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी लक्ष घालून ही घटना हाताळली होती.यातील प्रमुख आरोपी व आ.आशुतोष काळे यांचे स्विय सहाय्यक अरुण जोशी हा अद्याप फरार असल्याची माहिती आहे.तो अटकपूर्व जामीन घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान यातील माजी नगरसेवक अनिल उर्फ कालु आप्पा आव्हाड त्याचे सोबत,सोनु कैलास आव्हाड,अनुप उर्फ आन्या विनायक आव्हाड,रोहीत माळी,अवधुत शिंदे,कैलास आव्हाड,विनायक आव्हाड,दत्तु पंडोरे,किरण आव्हाड,अरुण बाजीराव जोशी,राजेंद्र बाजीराव जोशी,शुभम राजेंद्र जोशी,मयुर संजय सुपेकर,अजय छबुराव सुपेकर,अजिंक्य गणेश काकडे,निलेश बापुराव काकडे,अक्षय मिनानाथ आंग्रे,राहुल सतिष काकडे,संजय उर्फ भैय्या सुपेकर व त्याचे मंडळातील ४५ ते ५५ लोकांपैकी १६ जणांना अटक करण्यात आली होती.त्यानंतर त्यातील दोन उपचार घेणारे दोन आरोपी गौरो मोरे आणि अविनाश गीते आदी दोघांना अशा एकूण १८ जणांना नंतर अटक करण्यात आली होती.
दरम्यान आज त्यांची सहा दिवसांची पोलिस कोठडी संपली होती.त्यांना आज पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्री.पवार यांनी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी केळकर मॅडम यांचे समोर हजर केले असता त्यांना दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने दिनांक 01 ऑक्टोबर रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.तथापि पोलिसांना मध्येच अमित शहा यांच्या अधिकृत दौऱ्याने या कामाकडे दुर्लक्ष करावं लागलं होते.कोपरगाव शहर पोलिसांनी त्यांना तातडीने सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी ताबडतोब अटक केली जाऊ शकत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.ती आज खरी ठरली असून या सर्व आरोपींना आज दुपारी 3.30 वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी केळकर मॅडम यांचेसमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.त्यांची रवानगी नाशिक रोड कारागृहात होणार असल्याचे समजत आहे.
दरम्यान या घटनेतील आरोपी आ.काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण जोशी आणि त्यांचे सहकारी अद्याप फरार असल्याने त्यांचा पोलिस शोध घेत आहे.मधील अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याने पोलिसांना तितका वेळ मिळाला नव्हता त्यामुळे आता मात्र पोलिस अधिकारी त्या कामासाठी मुक्त झाले असून लवकरच या फरार आरोपींना अटक होऊ शकत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने ऍड.शैलेश देसले यांनी काम पाहिले त्यांना सहाय्यक अभियोक्ता उत्तम पाईक यांनी सहकार्य केले तर आरोपींच्या बाजूने ॲड.जयंत जोशी,सहाय्यक वकील ॲड.मोरे,ॲड.शिंदे आदींनी काम पाहिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
____________________________
*नियमित विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.