जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

खुनातील आणखी एक आरोपीस बेड्या ठोकल्या !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदेकसारे येथील काटवनात शनिवार दि.०९ ऑगस्ट रोजी आपली खून केलेली पहिली पत्नी वनिता हिरामण मोहिते हिचा तिचा आरोपी पती संजय हिरामण मोहिते याला अटक केल्यानंतर कोपरगाव शहर पोलिसांनी त्याला सहाय्य करणारा त्याचा मेहुणा (लहान बायकोचा भाऊ) गजानन मोतीराम मोहिते याला बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव येथून शोधून अटक केली असून त्याला कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.एस.केळकर यांच्यासमोर हजर केले असता त्याला न्यायालयाने ०५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

 

दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांना आणखी एक यश मिळाले असून आरोपीचा खुनात सहभागी मेहुणा गजानन मोहिते फरार झाला होता.मात्र त्याच्या मागावर असलेले पोलिस निरिक्षक कुंभार यांचे पथकाने त्याला नागपूर पर्यंत पायपीट करून अखेर जेरबंद केले आहे.पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदेकसारे येथील काटवनात शनिवार दि.०९ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजेच्या पूर्वी अज्ञात आरोपीने साधारण ४५ वय असलेल्या महिलेचा अज्ञात कारणाने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे उघड झाले होते.ही घटना उघड झाल्यावर चांदेकसारे शिवारात खळबळ उडाली होतो.याबाबत चांदेकसारे येथील महिला पोलिस पाटील मीराबाई रोकडे यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.तो पासून शहर पोलिसांनी हा तपासासाठी शोध मोहीम राबवली होती.अखेर या तपासात पोलिसांना निर्णायक यश मिळाले आहे.त्यांनी मयत महिलेचा पती संजय मोहिते यास सावळीविहिर जवळून तो पळून जाण्याचा तयारीत असताना त्याला अटक केली होती.त्याला कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंभार यांनी काल कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे समोर आरोपी संजय मोहिते यास हजर केले त्याला न्यायदंडाधिकारी जे.एस.केळकर यांनी त्यास ०६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असताना शहर पोलिसांना आणखी एक यश मिळाले असून आरोपचा खुनात सहभागी मेहुणा गजानन मोहिते फरार झाला होता.मात्र त्याच्या मागावर असलेले पोलिस निरिक्षक कुंभार यांचे पथकाने त्याला नागपूर पर्यंत पायपीट करून अखेर जेरबंद केले आहे.

  दरम्यान त्याला कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंभार यांनी आज कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे समोर आरोपी संजय मोहिते यास हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायदंडाधिकारी जे.एस.केळकर यांनी त्यास ०५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

  दरम्यान या खटल्यात आरोपीच्या वतीने ॲड.नितीन गंगावणे यांनी काम पाहिले तर सरकारी पक्षाच्या वतीने अभियोक्ता प्रदीप रणधीर व शैलेश देसले यांनी काम पाहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close